सावंतवडी : ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथे ५० वी राष्ट्रीय कुमार गट कॅरम स्पर्धा पार पडली. सावंतवाडी येथील केशर राजेश निर्गुण हीने २१ वर्षांखालील मुलींच्या गटात उपविजेतेपद पटकावत सिंधुदुर्गची मान पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर उंचावली. या स्पर्धेमधे केशर एयरपोर्ट ऑथॉरीटी ऑफ इंडिया ( AAI ) तर्फे सहभागी झाली होती. तर सिंधुदुर्गची दुसरी आघाडीची कॅरमपटू महाराष्ट्राच्या संघातून या स्पर्धेत याच वयोगटातून सहभागी झाली होती.
उपांत्य फेरीच्या आधीच या दोघी एकमेकांसमोर आल्या. दिक्षावर मात करत केशरने उपान्य फेरी गाठली. उपउपान्त्य फेरीत दिल्लीच्या साक्षी गेहलोतवर तर उपान्त्य फेरीत तामिळनाडूच्या व्ही मित्रा (Indian Oil ) वर दोन सरळ सेटमधे सहज मात करत केशरने अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत केशरची गाठ पारंपारीक प्रतिस्पर्धी ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकर ( Jain Irrigation ) बरोबर पडली. समृद्धीने उपान्त्य फेरीत पहिला सेट गमावल्या नंतर संघर्षपूर्ण लढतीत तामिळनाडूच्या भरगत निशावर विजय मिळवला. अंतिम फेरीत समृद्धीने केशरला प्रतिकाराची फारशी संधी न देता १८ – ०६, २१- ०६ असा सरळ सेटमधे तिच्यावर विक्रय मिळवला. त्यामुळे केशरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मधुरा देवळे ( मुली १८ वर्ष)गटात प्रथम क्रमांक गोल्ड व मिहीर शेखने ( मुलं / २१ वर्ष) गटात प्रथम क्रमांक गोल्ड मिळवला. तर आयुष गरुड याने ( मुलं १८ वर्ष) गटात तिसरा क्रमांक ब्रान्झ प्राप्त केला. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे विजेत्या मधुराला दहा हजार रुपये,मिहीरला दहा हजार रुपये तर आयुषला पाच हजार रुपये- रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
तसेच तनया पाटील, सिमरन शिंदे, सोनाली कुमारी यांनी अनुक्रमे ५,६,७, तर आकांक्षा कदमने ५, ओमकार वडर ६ आणि ओजस जाधव याने ४ था क्रमांक मिळवून या स्पर्धेत महाराष्ट्राची छाप पडली. ज्युनियर मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात तामिळनाडूला हरवून ( गोल्ड मेडल) विजेतेपद पटकवले. तर मुलांचा संघ तामिळनाडू विरुद्ध अंतिम सामन्यात पराभूत झाल्याने त्यांना ( सिल्व्हर मेडल) उपविजेतेपदाचा मान मिळाला. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावातीने विजयी संघास २१ हजार रुपये व उपविजयी संघास १४ हजार रुपये चे रोख बक्षीस देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे.
