भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केलेत. संजय राऊत यांनी मागील काही दिवसांमध्ये माझ्या कुटुंबाविरोधात वेगवेगळे आरोप केल्यानंतर त्यांना कोणतेही कागदपत्रं सादर करता आली नाहीत. म्हणूनच आता मुख्यमंत्र्यांनी माझ्या कुटुंबियांना अटक करण्याचे आदेश दिलेत, असं सोमय्या म्हणालेत.

“गेल्या आठ दिवसात संजय राऊत यांनी चार वेगवेगळे आरोप केले परंतु त्यांनी एकही कागद दाखविला नाही. त्यानंतर जेव्हा मी उद्धव ठाकरे यांचे थोतांड उघडकीस आणले त्यानंतर कालच मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश दिले की किरीट सोमय्या, मेधा सोमय्या आणि नील सोमय्या यांना अटक करा. त्यामुळे आम्ही सगळे महाराष्ट्राला घोटाळा मुक्त करण्यासाठी जेलमध्ये जायला तयार आहोत,” असं सोमय्या म्हणाले आहेत.

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
kerala politics rahul gandhi
“राहुल गांधींचा ‘डीएनए’ तपासायला हवा, ते गांधी असण्याबद्दल संशय”, केरळमधील नेत्याची टीका
पिंपरी : मावळमध्ये विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई; भाजप नेत्याचा इशारा
jayant patil praful patel
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”, पटेलांच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणाले, “त्यांना पक्षसंघटना…”

काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन निकॉन इन्फ्रामध्ये किरीट सोमय्या यांच्या परिवाराची आणि पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील वाधवान यांची भागीदारी असल्याचा आरोप केला होत . त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी त्यांना लवकरच ठाकरे सरकार अटक करणार असल्याचा दावा केलाय.

नक्की वाचा >> माझे ते फोटो प्रताप सरकनाईकने काढले, आता माझा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की…”; सोमय्यांचा हल्लाबोल

मुंबईतील बिल्डर, व्यापारी यांना ईडीच्या नावे धमक्या देऊन किरीट सोमय्यांनी आतापर्यंत शेकडो कोटी जमा केले आहेत. त्यातील किती टक्के ईडीला गेले हे ते बाहेर सांगत असतात. किरीट सोमय्या आणि त्यांचा बिल्डर मित्र अमित देसाई यांनी जमिनीच्या मालकाला ईडीच्या नावे धमकी देऊन १०० कोटींचा प्लॉट मातीमोल भावात आपल्या नावे करुन घेतला. त्यातील १५ कोटी रुपये किरीट सोमय्यांनी ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्याला नेऊन दिले असा आणखी एक आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. मुंबईत प्रसारमाध्यांशी बोलताना संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट करावं नाहीतर मी जाहीर करणार असा इशाराही त्यांनी दिला होता.

त्या फोटोंवरुन टीका…
यासोबतच किरीट सोमय्या यांचा मंत्रालयातील व्हायरल झालेला फोटो याबाबत किरीट सोमय्या यांनी त्यांच्या सुरक्षा संदर्भातील तक्रार महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडे केली होती ज्यामध्ये केंद्र सरकारने दिलेल्या सुरक्षा अहवालात हा फोटो प्रताप सरनाईक यांनी काढला असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता प्रताप सरनाईक यांना कधी अटक करणार असा सवाल किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.