मुरुड शहरातील प्रतिष्ठित व्यापारी कीर्ती प्रवीणचंद्र शहा यांची नगर परिषद दक्षता समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र तहसीलदार अजय पाटणे यांनी त्यांना दिले आहे. कीर्ती शहा हे मुरुड तालुका अल्पसंख्याक तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. सार्वजनिक वितरण प्रणालीतील समस्या दूर करायचा व गोरगरीब जनतेस धान्य व इतर वस्तू लवकरात लवकर देण्याचा माझा प्रयत्न असेल. पालकमंत्री तटकरे यांनी केलेल्या नियुक्तीबद्दल आभार व्यक्त केले. जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दांडेकर, नगरसेवक नितीन पवार, पाणीपुरवठा सभापती अविनाश दांडेकर, शहर अध्यक्ष हसमुख जैन यांनी अभिनंदन केले.