कोल्हापूर : राजर्षी शाहू जन्मस्थळाचे कामकाज समाधानकारक सुरू आहे. या ठिकाणी समस्यांबाबत लवकरच बैठक घेऊन परिपूर्ण अशा शाहू जन्मस्थळाचे लोकार्पण लवकरच घेऊ. त्यासाठी निधीही कमी पडणार नाही, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी शनिवारी येथे दिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी त्यांच्या जन्मस्थळी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना वरीलप्रमाणे भावना व्यक्त केल्या. आमदार अमल महाडिक, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, पुरातत्त्व विभागाचे उदय सुर्वे, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, पुराभिलेख सहसंचालक दिपाली पाटील उपस्थित होते.
त्यांनी शाहू जन्मस्थळ येथील छायाचित्र प्रदर्शनाची पाहणी केली. शाहू जयंतीदिनी सुरू झालेल्या होलोग्रफिक शोच्या ठिकाणी थिएटरची पाहणी करून शाहू महाराजांवरील लघुपट व होलोग्रफिक शो पाहिला.