scorecardresearch

Premium

कोल्हापुरातील राजाराम कारखान्याचे ‘ते’ १२७२ सभासद अपात्र; महाडिक गटाला धक्का!

निवडणुकीपूर्वी महाडिक गटाने १२७२ सभासद वाढवले होते. त्याला विरोधी सतेज पाटील गटाने प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांच्याकडे याचिका दाखल केली होती.

satej patil
कोल्हापुरातील राजाराम कारखान्याचे ‘ते’ १२७२ सभासद अपात्र; महाडिक गटाला धक्का! (संग्रहित छायाचित्र)

कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम सहकारी कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र ठरले आहेत. याबाबत प्रादेशिक साखर सहसंचालकांनी गुरुवारी निकाल दिला आहे. यामुळे सत्ताधारी महाडिक गटाला धक्का बसला आहे. राजाराम कारखान्याच्या सभासद यादीवरून राजकारण तापले होते. निवडणुकीपूर्वी महाडिक गटाने १२७२ सभासद वाढवले होते. त्याला विरोधी सतेज पाटील गटाने प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांच्याकडे याचिका दाखल केली होती. गाडे यांच्या समोर या अपात्र सभासदांबाबत सुनावणी होऊन ते १२७२ सभासद अपात्र झाले. त्यामध्ये शौमिका महाडिक, ग्रीष्मा महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबातील १० जणांचा समावेश आहे. हा निकाल आमदार सतेज पाटील गटाच्या बाजूने लागला आहे.

हेही वाचा : मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारची विनंती फेटाळली; म्हणाले, “अध्यादेशात…!”

mohite patil group won all 21 seats in the sri shankar co operative sugar factory elections
शंकर साखर कारखान्यावर मोहिते-पाटील गटाचे सर्व २१ जागांवर वर्चस्व
Jayant Patil son
जयंत पाटील यांना मुलाच्या राजकीय भवितव्याची काळजी
Cases registered against BJP workers for Slogans in support of MLA Gaikwad in Ulhasnagar
उल्हासनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, न्यायालय परिसरात आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
Supriya Sule on Ulhasnagar Firing
“आता अमित शाह यांनाच…”, भाजपा आमदाराच्या गोळीबार प्रकरणावर सुप्रिया सुळेंचा संताप

हेही वाचा : तीन पानी GR काढत महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे पाटील यांना केली ‘ही’ विनंती

याबाबत आमदार सतेज पाटील म्हणाले कि, सर्वसामान्य सभासदांच्या पाठबळावर आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. या निवडणुकीमध्ये एकूण १२ हजार ३३६ इतके मतदान झाले. त्यामध्ये या अपात्र सभासदांच्या मतदानाचा समावेश होता. म्हणजे नियमित ११ हजार सभासदांचे मतदान झाले होते. यापैकी ५००० ते ५५०० मतं आमच्या आघाडीला मिळाली. त्यामुळे खऱ्या सभासदांचा कौल आमच्या आघाडीला मिळाला होता हे सिध्द झाले आहे. या अपात्र सभासदांमुळे आमच्या उमेदवारांना १२०० ते १२५० मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. जर हे अपात्र सभासद मतदानास पात्र झाले नसते, तर आज कारखान्यावर आमचीच सत्ता आली असती. अखेर सत्याचा विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान, राजाराम कारखान्याची झालेली निवडणूक बेकायदेशीर असून फेर निवडणुक घ्यावी अशी मागणी आमदार सतेज पाटील गटाने केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kolhapur rajaram factory 1272 members disqualified shock to mahadik faction css

First published on: 07-09-2023 at 17:21 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×