कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढी विरोधात मंगळवारी २० गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. ग्रामीण भागातील व्यवहार आज ठप्प झाले होते.
कोल्हापूर महापालिकेची स्थापना झाल्यापासून अद्यापही हद्दवाढ झाली नाही. सध्या पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी हद्दवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज शहरालगतच्या २० गावांमध्ये बंद पाळण्यात आला.
सकाळपासूनच ग्रामीण भागातील सर्व दुकाने बंद होती. सर्वप्रकारचे व्यवहार ठप्प झाले होते. ग्रामस्थांनी एकत्रित येऊन हद्दवाढी विरोधात घोषणाबाजी केली. कोल्हापूर महापालिका नागरी सुविधा पुरवण्यात अकार्यक्षम ठरले असताना ती ग्रामीण भागाला न्याय काय देणार असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. हद्दवाढ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण यांनी सर्वच गावांमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले.
शोले स्टाईल आंदोलन
दरम्यान, पुलाची शिरोली या गावांमध्ये तरुणांच्या एका गटा पाने ण्याच्या टाकीवर चढून हद्दवाढ विरोधात आंदोलन केले. या शोले स्टाईल आंदोलनाची चर्चा सुरू होती.