रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील धामेली (भोजनेवाडी) गावातील वधू आणि एअर इंडिया या प्रतिष्ठित विमान कंपनीमध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेल्या अपर्णा महाडिक (वय ३५) यांचे गुरुवारी गुजरातमध्ये झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या धाडसी अपर्णा यांच्या जाण्याने कोकणावर शोककला पसरली आहे. कोकणच्या मातीतून आकाशात झेपावलेली एक जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ कन्या या अपघातात हरपली आहे.

क्रू मेंबर असलेल्या अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या एअर इंडियाच्या सेवेत कार्यरत होत्या.

अपर्णा गुरुवारी नेहमीप्रमाणे ड्युटीवर असताना, तांत्रिक बिघाडामुळे बोईंग विमान अपघात घडला आणि या दुर्घटनेत अपर्णा यांना प्राण गमवावे लागले. त्यांचे पती अमोल महाडिक हेही एअर इंडियात कार्यरत असून अपर्णा यांच्या अपघाती निधनाची वार्ता समजताच त्यांच्या कुटुंबिय, नातेवाईक व सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली.

धामेली गावातही या बातमीने शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या अंत्यविधीची माहिती नातेवाईकांकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या दुर्दैवी घटनेवर अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी अपर्णा यांच्या निधनावर शोक व्यक्त करत म्हटले, “अपर्णा महाडिक यांच्या अपघाती निधनाने रायगड रत्नागिरी जिल्ह्यांनी एक जबाबदार, कर्तबगार महिला गमावली आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.”