कोकणातील सर्वात जुन्या शिक्षण संस्थापकी एक असणाऱ्या कोकण एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेला सोमवारी शंभर वर्ष पुर्ण झाली आहेत. कोकणातील रायगड, सिंधुदूर्ग आणि ठाणे जिल्ह्यात संस्थेच्या शंभरहून अधिक शैक्षणिक संकूले कार्यरत आहेत. ज्यात पन्नास हजारहून अधिक विद्यार्थी ज्ञानार्जनाचे काम करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ख्रिस्ती मिशनरी शाळांचे प्रस्त वाढत असतांना मराठी भाषिकांसाठी ज्ञानार्जनाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी साठी कोकणातील चार तरुण एकत्र आले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या धर्तीवर एखादी संस्था कोकणात कार्यरत असावी अशी त्यांची इच्छा होती. यातूनच वासुदेव गणेश रानडे, केशव रावजी आठवले, गणेश दामोदर टिल्लू आणि सिताराम विनायक घाटे या चौघांनी १९१७ साली कुलाबा स्टुडंटस् असोसिएशन ही संस्था उदयास आली. सरदार रावसाहेब बिवलकर यांना संस्थेचे अध्यक्षपद देण्यात आले. यानंतर संस्थेनी शैक्षणिक कामाला सुरवात केली. पुढे याच संस्थेचे रुपांतर कोकण एज्युकेशन सोसायटीत करण्यात आले.

चार ध्येयवेड्या तरुणांनी सुरु केलेल्या या संस्थेचा आज वटवृक्ष झाला आहे. सुरवातीला अलिबाग पुरता मर्यादीत असणारा संस्थेचा पसारा आता सिंधुदूर्ग आणि ठाणे जिल्ह्यातही पसरला आहे. आज संस्थेची १०२ शाळा आणि महाविद्यालये कार्यरत आहेत. याच ५० हजारहून अधिक विद्यार्थी ज्ञानसाधनेचे काम करत आहे. २ हजार ८८ कर्मचारी संस्थेत आपली अविरत सेवा देत आहे. गुणवत्ता पुर्ण शिक्षण, प्रशिक्षित अध्यापक वर्ग, आणि शिक्षणेत्तर उपक्रमांमुळे कोकणातील विश्वासार्ह आणि अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून कोकण एज्युकेशन सोसायटी नावारुपास आली आहे. ४३ मराठी माध्यम शाळा, १८ एंग्रजी माध्यम शाळा, २ होमिओपॅथीक मेडीकल कॉलेज, ५ व्यवसाय अभ्यासक्रम शाळा. १५ महाविद्यालये व ज्युनिअर कॉलेज आज संस्थेच्या माध्यमातून चालविले जात आहेत.

शंभर वर्षांच्या वाटचालीत संस्थेनी अनेक स्थितंतरे पाहिली. काळानूसार संस्थेचा घटनेत मुलभुत बदल केले गेले. शैक्षणिक पध्दतीतही बदल होत गेला. दर्जेदार शिक्षणपध्दतीमुळे संस्थेनी प्रतिकूल परिस्थितीत आपली विश्वासार्हता टिकून ठेवली. शैक्षणिक शाळा चालवितांना डोनेशन्स घ्यायची नाहीत आणि शिक्षकांची नियुक्ती करतांनाही गुणवत्तेलाच प्राधान्य द्यायचे हे दोन नियम संस्थेने आजतागायत पाळले आहेत. त्यामुळे जनमानसात आजही संस्थेबद्दल आदर कायम आहे. स्वातंत्रोत्तर काळात संस्थेनी शिक्षण संस्था वाढवण्यावर फार जोर दिला नाही. मात्र माजी आमदार तथा विरोधीपक्षनेते दत्ता पाटील यांनी संस्थेचे कार्याध्यक्षपद स्विकारल्यानंतर संस्थेच्या विस्ताराला गती मिळाली. कोएसोच्या १९७७ साली २४ शाळा कार्यरत होत्या. हिच संख्या १९९७ पर्यंत १०७ पर्यंत वाढली. पण नंतरच्या काळात हि संख्या १०२ पर्यंत खाली आली.

ग्रामिण भागातील मुलांना अभियांत्रिकी पदवी घेता यावी यासाठी संस्थेनी पेण येथे इंजिनिअरींग कॉलेज काढले होते.

मात्र विद्यार्थी संख्ये आभावी बंद पडले. मुंबई परीसरातील सुरु झालेल्या ३६ इंजिनिअरींग कॉलेज आणि रायगड जिल्ह्यातील लोणेरे अभियांत्रिकी विद्यापिठामुळे विद्यार्थ्यांनी या इंजिनिअरींग कॉलेज कडे पाठ फिरवली, तेव्हा पासून यापुढे संस्थेचा पसारा वाढवायचा नाही अशी भुमिका संस्थाचालकांनी घेतलीआहे.

शिक्षण क्षेत्रातही प्रचंड स्पर्धा आहे अशावेळी संस्थेच्या शाळेतून तयार होणारे विद्यार्थी या स्पध्रेला तोंड देवू शकतील अशा पदधतीने घडवण्याकडे संस्थेचा नेहमीच कल राहिला आहे .संस्थेच्या शाळेमधून शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत . मराठी माध्यमाबरोबरच इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढून संस्थेने ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची कवाडे खुली करून दिली .

आजच्या व्यापारी युगात शिक्षण संस्था म्हणजे व्यवसायाचे साधन म्हणून पाहिले जाते मात्र कोकण एज्युकेशन सोसायटीने हे कटाक्षाने टाळले .

जिल्ह्य़ातील दुर्गम भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण कसे मिळेल याकडे संस्थेने अधिक लक्ष दिले . आणि त्याचमुळे आज ग्रामीण भागातील मुले शिक्षण घेत आहेत . केवळ कोकणच्या शैक्षणिक प्रगतीचे ध्येय डोळयासमोर ठेवत,शिक्षण क्षेत्रातील बाजारीकरणाला छेद देत व्रतस्थपणे चालवलेल्या या कार्याची पुढील वाटचाल म्हणूनच शंभरीतही दिमाखात सुरू आहे.

आगामी काळात शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यावर आम्ही भर देणार आहोत. त्यासाठी शाळांमधील पायाभुत सुविधांचे सक्षमीकरण केले जाईल. शासनाच्या मानकांनुसार प्रत्येक शाळा आदर्श कशी ठरेल याचाही प्रयत्न केला जाईल. स्पध्रेच्या युगात ग्रामिण भागातील मुले कमी पडू नयेत यावरही भर दिला जाईल

–  संजय पाटील अध्यक्ष कोकण एज्युकेशन सोसायटी.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konkan education society golden jubilee
First published on: 20-12-2017 at 03:12 IST