जिल्हा परिषद निकालाने पक्षाची रणनीती

स्थापनेपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या स्व. विलासराव देशमुख यांच्यासह शिवराज पाटील आणि शिवाजीराव निलंगेकर पाटील या दिग्गज नेत्यांच्या लातूरमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. नगरपालिकांपाठोपाठ जिल्हा परिषदेत यश मिळवून भाजपने काँग्रेसचा बालेकिल्ला मोडून काढला आहे.

महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर उस्मानाबाद जिल्हय़ात लातूरचा समावेश होता. तेव्हाही एकत्रित जिल्हय़ावर काँग्रेसचीच पकड होती. जिल्हा विभाजनानंतर काँग्रेसने ही पकड फारशी कधी ढिली पडू दिली नाही. केद्रात व राज्यात भाजपची सत्ता व विलासराव देशमुखांच्या निधनानंतर पराभूत मानसिकतेत गेलेला काँग्रेस पक्ष हे कच्चे दुवे हेरून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी गड हाती घ्यायचे नियोजन केले अन अशक्य वाटणारी मोहीम फत्ते केली.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होण्याअगोदरच काँग्रेसमध्ये गुदमरून गेलेल्या सरदारांनी भाजपशी संधान साधणे सुरू केले होते. पक्षाची प्रकृती मजबूत करण्यासाठी काँग्रेसमधील सरदारांना अभय देत त्यांचा विधिवत पक्षप्रवेश घडवून आणला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संभाजी पाटील शिरूर अनंतपाळकर यांच्या प्रवेशाने शिरूर अनंतपाळ व परिसरातील पक्षाची पकड अधिक घट्ट झाली. अहमदपूरचे अपक्ष आमदार विनायकराव पाटील यांचा ऐन निवडणुकीच्या दरम्यान भाजपातील प्रवेश किल्ल्याची तटबंदी मजबूत करण्याच्या दृष्टीने यशस्वी ठरला. उदगीरचे काँग्रेसचे माजी आ. चंद्रशेखर भोसले यांच्या अकाली निधनाने त्या परिसरात काँग्रेस पोरकी झाली. नगरपरिषद निवडणुकीतील दारुण पराभवामुळे जिल्हय़ातील काँग्रेस कार्यकत्रे पुरते नामोहरम झाले होते. जिल्हय़ात काँग्रेसच्या प्रचाराची धुरा कोणी सांभाळायची? असा प्रश्न पडला असतानाच विलासराव देशमुखांचे कनिष्ठ सुपुत्र धीरज देशमुख हे जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाचे उमेदवार असतील असे जाहीर करत संपूर्ण देशमुख कुटुंबाने प्रचाराची सूत्रे आपल्या हाती घेतली. मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जाणारे आ. दिलीपराव देशमुख यांनी जिल्हा िपजून काढला. आमदार अमित देशमुख यांनी नियोजनाची बाजू सांभाळली. काँग्रेस कार्यकत्रे धीरज देशमुखांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करण्यासाठी अधीर झाले होते खरे मात्र निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी देशमुखांना इतके अधीर होऊ नका, थोडीशी उसंत घ्या असा संदेश देत धीरज देशमुखांना निवडून दिले पण काँग्रेसच्या वाटय़ाला ५८ पकी केवळ १५ च जागा दिल्या.

भाजपाने मागील निवडणुकीतील आठ जागांवरून घोडदौड करत ३६ चा आकडा गाठला. राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ जागांवरून पाच जागांवर तर शिवसेनेला सहा जागांवरून केवळ एका जागेवर समाधान मानण्याची वेळ आली.

पालकमंत्री हे बालकमंत्री आहेत असा आरोप केला गेला. आमच्या घरात लहान मुलेही लाल दिव्याशी खेळतात हेही बोलून झाले मात्र संभाजी पाटील निलंगेकर यांनी मतदारांच्या हृदयाला भिडणारे प्रश्न उपस्थित केले. मी कुठला मंत्री नाही, सेवक आहे शिवाय लाल दिवा हा लोकांनी दिलेली जबाबदारी आहे याची मला जाणीव असून आजवर ज्यांनी लाल दिवा वापरला त्यांच्या घरातील लहान मुलेच काय आता ज्येष्ठांनाही खेळण्यातील लाल दिव्यासोबतच यापुढे खेळावे लागेल असे सांगितले. शिवाय जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद वातानुकूलित गाडीत फिरणाऱ्यांच्या हातात न देता ज्याच्या मनगटात नांगर धरण्याची क्षमता आहे अशा सामान्य शेतकाऱ्याला दिले जाईल. आपण पदावर जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपल्या भावाला निवडणूक लढवण्यास परवानगी राहणार नाही हे पालकमंत्र्यांचे म्हणणेही सामान्य माणसांपर्यंत चांगले पोहोचले. परिणामी अनेक तालुक्यांतून काँग्रेस हद्दपार झाली.

मांजरा परिसरातील साखर कारखान्यामुळे उसाप्रमाणेच काँग्रेस मजबूत असल्याचा समज होता मात्र दुष्काळामुळे ऊस जसा कमी झाला त्याच प्रमाणात काँग्रेसचे सामान्य माणसाच्या मनातील स्थानही आता कमी झाल्याचे निवडणूक निकालाने स्पष्ट केले. लातूर तालुक्यातील १० पकी तीन जागा भाजपाने जिंकल्या. रेणापूर तालुक्यात सर्व पंचायत समिती सदस्य भाजपाचे निवडून आले.

अहमदपूर, चाकूर, शिरूर अनंतपाळ, देवणी या चार तालुक्यांत काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळवता आली नाही. उदगीर नगरपरिषदेनंतर पंचायत समितीही निर्णायकपणे भाजपच्या ताब्यात गेली. जिल्हय़ातील १० पैकी सात पंचायतींवर भाजपचे वर्चस्व तर तीन पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसला सत्ता राखता आली. जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालाने सत्तेचा केंद्रिबदू आता देशमुखांच्या घरापासून सरकला असून तो भाजपचे पालकमंत्री संभाजी पाटील यांच्याकडे झुकला असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपातील जुन्या-नव्या मंडळींना एकत्र करून, पक्षातील मतभेद विसरून काँग्रेसला पराभूत करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न केले अन् त्यात ते यशस्वी झाले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ शिवराज पाटील चाकूरकरांनी केला अन् कव्हेकरांना पराभवाला सामोरे जावे लागले. चाकूरकरांच्या शब्दाला लोक किंमत देत नाहीत असा संदेशच मतदारांनी पोहोचवला. हे सहज घडले की घडवले गेले? याची चर्चा मतदारांत सध्या रंगते आहे. ‘यशाला नाना धनी, अपयशाला नाही कोणी’ या म्हणीची प्रचीती देशमुख घेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालानंतर दोन महिन्यांतच होऊ घातलेल्या लातूर महापालिकेवर भाजपानर्े  लक्ष केंद्रित केले आहे. पन्नास नगरसेवक असलेल्या काँग्रेसला महापालिका टिकवण्याचा घोर लागून आहे .

  • जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालानंतर दोन महिन्यांतच होऊ घातलेल्या लातूर महापालिकेवर भाजपाने आपले सर्व लक्ष केंद्रित केले आहे. पन्नास नगरसेवक असलेल्या काँग्रेसला महापालिका टिकवण्याचा घोर लागून आहे तर एकही सदस्य नसलेल्या भाजपाला विजयाचा विश्वास आहे.नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमधील यशाने भाजपच्या आशा महापालिकेसाठी पल्लवित झाल्या आहेत.
  • भाजपाने मागील निवडणुकीतील आठ जागांवरून घोडदौड करत ३६ चा आकडा गाठला. राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ जागांवरून पाच जागांवर तर शिवसेनेला सहा जागांवरून केवळ एका जागेवर समाधान मानण्याची वेळ आली.
  • पालकमंत्री हे बालकमंत्री आहेत असा आरोप केला गेला. आमच्या घरात लहान मुलेही लाल दिव्याशी खेळतात हेही बोलून झाले
  • मात्र संभाजी पाटील निलंगेकर यांनी मतदारांच्या हृदयाला भिडणारे प्रश्न उपस्थित केले. मी कुठला मंत्री नाही, सेवक आहे शिवाय लाल दिवा हा लोकांनी दिलेली जबाबदारी आहे याची मला जाणीव असून आजवर
  • ज्यांनी लाल दिवा वापरला त्यांच्या घरातील लहान मुलेच काय आता ज्येष्ठांनाही खेळण्यातील लाल दिव्यासोबतच यापुढे खेळावे लागेल असे सांगितले.