वाई:सातारा शहरातील शिवतीर्थ पोवई नाक्याच्या चौकाला लोकनेते स्व.बाळासाहेब देसाई यांचे नाव देण्याचा विषय नियोजन मंडळ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत पुढे आल्याने शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे.शहरातील नागरीक युवक आणि सर्वांनी समाज माध्यमासह सर्व स्तरातून नव्या नावाने विकसनास तीव्र विरोध व्यक्त करत सातारकर नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

सातारा पालिकेच्या वतीने पोवई नाक्यावरील शिवतीर्थ परिसर विकसित करण्यात येत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी या कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खास बाब म्हणून आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही निधीसाठी प्रयत्न केले होते. हे काम तातडीने व दर्जेदार व्हावे यासाठी खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आग्रही आहेत. तशा सूचना त्यांनी सातारा पालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पोवई नाक्यावरील शिवतीर्थ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. शिवतीर्थ भव्यदिव्य व देखणे व्हावे अशी शिवप्रेमींची इच्छा असून त्यानुसार काम करण्यात येत आहे. पालिकेने शिवतीर्थ परिसरात ऐतिहासिक आराखडा (लूक)केला आहे .

शिवतीर्थ विकसित करण्यावरून सातारच्या दोन्ही राज्यांमध्ये श्रेयवाद सुरू असतानाच या सात रस्ता चौकाला लोकनेते स्व बाळासाहेब देसाई चौक असे नामकरण करण्याचा विषय पुढे आल्याने सातारा शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या विषयावरून सातारकर नागरिकांनी समाज माध्यमासह सर्व स्तरावर तीव्र भावना व्यक्त केल्या असून या नामकरणाला विरोध दर्शविला आहे. याबाबत सोमवारी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रातील कामांची यादी समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाली. या यादीत पहिल्या क्रमांकाचा विषयावर पोवई नाक्यावरील बाळासाहेब देसाई चौक (आयलँड) विकसित करणे या कामाचा समावेश नियोजन मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला आहे. या पत्रावरून समाज माध्यमात जोरदार चर्चा झाली सुरू आहे. सातारा शहरातील नागरिक यावर तीव्र भावना व्यक्त करत आहेत. दिनांक १६ जून रोजी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा नियोजन अधिकारी पालिकेचे मुख्याधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. आयलँड चे सुशोभीकरण करण्याबाबत या बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे.

पोवई नाका परिसराला लोकनेते बाळासाहेब देसाई चौक हे नाव देण्याच्या हालचाली प्रशासनाकडून पालकमंत्र्यांच्या सुचने प्रमाणेसुरू झाल्या आहेत . या निर्णयाविरोधात सातारकरांनी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.छत्रपती कल्पना राजे भोसले यांनी तातडीने शिवतीर्थ परिसराला भेट दिली. मंगळवारी सकाळी पाहणी केली या स्मारक परिसरात शिवस्मारकाव्यतिरिक्त आणखी काही नको अशी स्पष्ट सूचना करत शिवतीर्थ स्मारकाचे काम दर्जेदार होण्याचा आग्रह धरला आहे.

सातारकरांच्या अस्मितेवरील घाला हाणून पाडला जाईल; रंजना रावत

शिवतीर्थ पोवईनाका परिसराशी सातारकरांच्या अस्मिता जोडलेल्या आहेत . येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा सातारकरांना नेहमीच प्रेरणा देत आला आहे . शिवप्रभुंपेक्षा दिगंत किर्तीचे कोणी होईल किंवा कोणी असेल असे वाटत नाही. याठिकाणी अन्य कोणाच्या नावाने काही करण्याचे कोणी धाडस करु नये.अधिकार गाजवून, तमाम जनतेच्या अस्मितेवर घाला घालण्याचा कोणी प्रकार जर करीत असेल तर तो जनतेच्या माध्यमातुन हाणुन पाडला जाईल असा इशारा सातारच्या माजी नगराध्यक्षा रंजना रावत यांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवतीर्थ पोवई नाका येथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे स्मारक आहे.या स्मारकाचे सध्या सर्वांच्या सहकार्याने आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने पालिकेच्या माध्यमातुन चांगले सुशोभिकरण होत आहे. सातारकरांनाच नव्हे तर येथुन जाणा-या येणा-या सर्वांनाच हा शिवस्मारक परिसर प्रेरणा देणारा आहे. या प्रेरणास्थानाचे ठिकाणी अन्य काही महापुरुषांचे स्मारक किंवा आयलँड करण्याचे कोणी प्रयत्नात असेल तर जनतेच्या अस्मितेवर तो घाला असेल. स्वराज्याचे शिल्पकार शिवप्रभुंचे कर्तुत्व झाकाळले जाईल असे काही कोणी काही करण्याचा प्रयत्न जरी केला असे प्रयत्न हाणुन पाडले जातील.लोककल्याणकारी शिवप्रभुंची तुलना अन्य कोणाशी हावू शकणार नाहीच आणि तसा प्रयत्न देखिल कोणी करु नये अशी माफक अपेक्षा देखिल रावत यांनी व्यक्त केली आहे.