वाई: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली असून या निवडणुका एकत्रीत लढविण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

सध्या मुख्यमंत्री महाबळेश्वर येथील दरे गावी आहेत. तेथे ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी आज रविवारी दिवसभर शेतात काम केले. शेतातील पिकांची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. मसाल्याची पिके या हवेत चांगली येत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण मिळेपर्यंत फी मध्ये सवलत देण्याचाही विचार शासन पातळीवर सुरू आहे. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. त्यांच्यासाठी चांगले काही करता येईल ते करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये मराठा समाज असे नाही तर सर्व समाजांच्या मुलांना याचा फायदा व्हायला हवा असा विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आणखी वाचा-जतमधील अर्धा किलो सोने फसवणुकीत पोलीस, राजकीय व्यक्तींचा सहभाग; माजी आमदार जगतापांचा आरोप

भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा आमच्या महायुतीची बैठक झाली आहे. आमच्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली असून या निवडणुका एकात्रीत लढविण्याचा निर्णय झाला आहे. राज्य सरकारच्या कामकाजाचे मोजमाप नक्की लोक करतील. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जनता विरोधकांना सडेतर उत्तर देईल. लोकसभेला राज्यात महायुतीच्या ४५ जागा आल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी साताऱ्यातील दरे येथे बोलताना व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले विरोधकांना काही काम धंदा राहिला नाही, रोज आरोप करणे हे एकच काम विरोधकांना राहिले आहे. मात्र आम्ही कामातून विरोधकांच्या आरोपांना उत्तर देत आहोत. त्यांनी इगो ठेवून बंद केलेले प्रकल्प आम्ही सुरू करतोय, असे राज्यकर्ते नसतात. अहंकारी वृत्ती ठेवून राज्य चालत नाही. विरोधकांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नसून आमची आम्ही काम करत आहोत. आम्ही सकाळी उठल्यापासून विकासाचे प्रकल्प पुढे नेत आहोत. हे आपण सर्वजण पाहत आहात. जे कोण बोलत आहेत त्यांच्यावर मला काही बोलायचं नाही. जिल्हा तालुका आणि गाव पातळीवर राज्य आणि केंद्र सरकारने केलेले काम तळागाळात पोहोचण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व पातळ्यांवर समन्वय ठेवून काम केले जाणार आहे. आज मला जास्त राजकीय काही बोलायचं नाही असं ही मुख्यमंत्री म्हणाले.