वाढत्या इंधन दराचा अर्थनियोजनावर नेमका परिणाम काय?

या कार्यक्रमात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर हे संकल्प आणि अर्थसिद्धी या दिशेने हे मार्गदर्शन करतील.

(संग्रहित छायाचित्र)

‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमात गिरीश कुबेर यांचे मार्गदर्शन; येत्या शनिवारी विरारमध्ये कार्यक्रम

अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात आलेल्या पाच लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य नेमके काय व कशासाठी आहे? तसेच महागाई व चलनाचा विद्यमान दर गृहित धरून वार्षिक ८ टक्के विकास दर गाठता येणे शक्य आहे काय?  याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात हेलकावे खाणाऱ्या इंधन दराचा तसेच केंद्रीय अर्थसंकल्पाच्या रूपाने महाग झालेल्या इंधन दराचा भारतीयांच्या अर्थनियोजनावर नेमका काय परिणाम होईल. याबाबतचे सविस्तर विवेचन येत्या शनिवारी विरारमध्ये होणार आहे.

बॅसिन कॅथॉलिक को-ऑपरेटिव्ह बँक लि. प्रस्तुत ‘लोकसत्ता विश्लेषण’ हा कार्यक्रम शनिवार, २० जुलै २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता सुरू होणार आहे. या कार्यक्रमात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर हे संकल्प आणि अर्थसिद्धी या दिशेने हे मार्गदर्शन करतील.

मदर वेरोणिका हॉल, कार्मेल कॉन्वेंट हायस्कूल, आब्राहाम नाका, नंदाखाल, विरार (पश्मिच) येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास  प्राधान्य, तसेच काही जागा राखीव असेल. प्राप्तीकर रचनेत फारसा बदल झाला नसताना कर वजावटीकरिता दिलेल्या सवलती कितपत फायदेशीर आहेत?  हे यावेळी उलगडले जाईल. सामान्यांच्या जीवनमानावर केंद्रीय अर्थसंकल्पाचा परिणाम काय? अर्थसंकल्पाचा विविध माध्यम, स्वरूपात उहापोह होत आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पातील तरतुदींनी सकल राष्ट्रीय उत्पादन वाढणार का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. अर्थसंकल्पातील समाविष्ट उपाययोजनांनी करदात्यांना लाभ झाला काय वा त्यांच्या जीवनमानावर त्याचा परिणाम होणार काय, याबाबत विश्लेषण केले जाईल.

कधी?

शनिवार, २०  जुलै सायंकाळी ५.३० वाजता.

कुठे?

मदर वेरोणिका हॉल, कार्मेल कॉन्वेंट हायस्कूल, आब्राहाम नाका, नंदाखाल, विरार (पश्चिम)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Lokasatta analysis program guidelines of girish kuber abn