संगमनेर : अचानक बिबट्या घरात घुसल्याने जीव वाचवण्यासाठी घरातील लोक कसेबसे बाहेर पडले. मदतीसाठी आलेल्या एकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत घराची कडी लावून बिबट्याला आत कोंडले. मात्र त्यामुळेच मोठी गर्दी होऊन लाठी चार्ज करायची वेळ आली, असा आरोप संबंधितावर ठेवण्यात आला होता. कनिष्ठ न्यायालयाने त्याला शिक्षा बजावली होती. जिल्हा न्यायालयाने मात्र त्याची निर्दोष मुक्तता केली.   

हेही वाचा >>> Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजने’च्या अर्ज प्रक्रियेमुळे महिलांच्या बँक खात्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर; आदिती तटकरेंनी दिले आदेश!

ही आगळी वेगळी घटना आणि खटल्याबाबतची माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील माळीझाप येथे ३ एप्रिल २०१४ रोजी भाऊसाहेब आल्हाट यांच्या राहत्या घरात ही घटना घडली होती. आल्हाट यांच्या घरात घुसलेल्या बिबट्याची माहिती मिळताच अकोले तालुका भाजपचे सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक आणि स्थानिक रहिवाशांनी आल्हाट कुटुंबीयांना घराबाहेर काढत घराला बाहेरून कुलूप लावून बिबट्याला घरात कोंडले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली होती. आल्हाट यांच्या घरात बिबट्याला कोंडल्याची वार्ता आजूबाजूच्या पंचक्रोशीत पसरली. त्यामुळे नागरिकांनी बिबट्याला कोंडलेल्या ठिकाणी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा >>> Nitesh Rane on Munawar Faruqui: “लातों के भूत…” मुनव्वर फारुकीच्या दिलगिरीनंतरही नितेश राणेंचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गर्दीमुळे घटनास्थळी आलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यासाठी अडथळे येत होते. त्यामुळे वनविभागाने घटनास्थळी असलेल्या पोलिसांना बघ्यांचा जमाव पांगविण्याच्या सूचना केल्या. अखेरीस जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. मंडलिक यांनीच घराला बाहेरून कुलूप लावून बिबट्यास घरात कोंडल्याने हा सर्व प्रकार घडल्याचे सांगत पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. पुढे कनिष्ठ न्यायालयात हा खटला चालला. कनिष्ठ न्यायालयाने मंडलिक यांना दोषी ठरवत शिक्षा आणि दंड केला होता. त्यानंतर मंडलिक यांनी या विरोधात जेष्ठ विधीज्ञ अनिल आरोटे यांच्यामार्फत संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप घुमरे यांच्यासमोर या खटल्याचे काम सुरू होते. सुनावनीनंतर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश घुमरे यांनी अकोले न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द ठरवत सबळ पुराव्याअभावी मंडलिक यांची निर्दोष मुक्तता केली. तब्बल दहा वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला.