मदन भोसलेंनी कॉंग्रेसला रामराम करावा आणि मोदी लाटेवर स्वार होवून भाजपातून येत्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे, असा सूर बहुसंख्य कार्यकर्त्यानी केल्याने मदन भोसलेंना मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन कार्यकर्त्यांना शांत करावे लागले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर आयोजित काँग्रेस कार्यकत्यार्च्यांच्या मेळाव्यात मदन भोसलेंना कार्यकर्त्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले.
मुख्यंमत्र्यांनी वाई विधानसभा मतदारसंघातून लढावे, आम्ही त्यांना येथून निवडून आणू अशी मागणी प्रांतिककडे आपणच केली आहे. जागावाटपात वाई मतदार संघ काँग्रेसलाच सुटेल. येथून मुख्यमंत्र्यांनी निवडणूक लढवावी मी त्यांच्यासाठी थांबायला तयार आहे. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची असेल अशी मागणी मी स्वत व वाई, खंडाळा महाबळेश्वर तालुका आणि जिल्हा कार्यकारिणीने प्रदेशाध्यक्ष व प्रांतिककडे केली आहे. त्याचा निर्णय येत्या आठ दहा दिवसात अपेक्षित आहे. जर येथून मुख्यमंत्री निवडणूक लढवणार नसतील तर आपणही आघाडीकडून निवडणूक लढवणार नाही. या वेळी कार्यकत्रे सांगतील तो निर्णय घ्यायला मी तयार आहे परंतु आघाडीकडून व अपक्ष निवडणूक लढवणार नाही असेही त्यांनी सांगितले. प्रांतिकचा निर्णय येईपयर्ंत सर्वानी धीर धरावा, थोडं थांबण्याची विनंती कार्यकर्त्यांना भोसलेंनी या वेळी केली.
आजपर्यंत पक्षासाठी खूप काम केले आहे. पक्षाला आपली किंमत राहीली नाही. त्यामुळे सध्या सुरु असणाऱ्या मोदी लाटेवर स्वार होऊन त्या प्रवाहात भाजपात आपण सामील व्हावे आणि निवडणूक लढवावी. ही निवडणूक फक्त जिंकण्याच्या उद्देशानेच लढवावी अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली. अनेक कार्यकत्यार्ंनी या वेळी भोसलेंनी ठोस भूमिका घ्यावी यासाठी तीव्र भावना व्यक्त केल्या. या वेळी नारायण पवार, शंकरराव गाढवे, रोहिदास पिसाळ, चंद्रकांत चव्हाण, नंदकुमार खामकर, सचिन फरांदे, प्रताप देशमुख, साहेबराव बिरामणे आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 26th Aug 2014 रोजी प्रकाशित
मदन भोसलेंनी भाजपतर्फे निवडणूक लढवावी
मदन भोसलेंनी कॉंग्रेसला रामराम करावा आणि मोदी लाटेवर स्वार होवून भाजपातून येत्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे, असा सूर बहुसंख्य कार्यकर्त्यानी केल्याने मदन भोसलेंना मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन कार्यकर्त्यांना शांत करावे लागले.
First published on: 26-08-2014 at 03:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madan bhosale should fight election from bjp