माढा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील निवडणूक राजकारणाच्या दृष्टीने कायमच चर्चेचा राहिला आहे. बराच काळ शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बालेकिल्ला मानला गेला. मात्र २०१९च्या निवडणुकीत इथे भाजपा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे निवडून आले आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडल्याचं दिसून आलं. आता माढ्यातल्या जागेवरून शिंदे गट-भाजपा-अजित पवार गट या महायुतीत खडा पडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. माढ्यातील विद्यमान खासदार भाजपाचे असून अजित पवार गटानं या जागेची मागणी केली आहे. शिवाय, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर खोचक टीकाही केली आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांनी रविवारी पंढरपूरमध्ये अजित पवार गटाच्या स्थानिक नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रामराजे नाईक-निंबाळकरांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली. तसेच, पक्षफुटीवर सूचक विधानही केलं.

BJP worker shiv shankar das
‘भाजपा जिंकू दे, तुला घरातून उचलून आणेन’, कार्यकर्त्याची महिलेला धमकी; पोलिसांनी केली अटक
Why did Jayant Patil say to amar kale mama is strongly supporting do not worry
“मामा भक्कमपणे पाठिशी, काळजी नको,” जयंत पाटील असे का म्हणाले? वाचा…
Vijay Wadettiwar criticize dr Prakash Ambedkar in nagpur
“हुंडा न मिळाल्याने लग्न तुटले असावे,” विजय वडेट्टीवार यांची प्रकाश आंबेडकर यांच्यावर खोचक टीका; म्हणाले…
ajit pawar and supriya sule
स्नुषाविरोधात प्रचार करण्यास नकार देण्याची एकनाथ खडसेंची भूमिका सुसंस्कृतपणाची;  खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना चिमटा

“माढ्याची जागा अजित पवार गटालाच हवी”

माढ्याची जागा अजित पवार गटालाच मिळावी, अशी आग्रही मागणी यावेळी रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मांडली. “आता कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होतील. माढा मतदारसंघात सोलापूरचे चार आणि सातारचे दोन असे सहा मतदारसंघ आहेत. ६ मार्चला पक्षानं मुंबईत बोलवलेल्या बैठकीत काय भूमिका मांडावी, हे ठरवण्यासाठी ही बैठक घेतली आहे. माढा मतदारसंघ अजित पवार गटाला मिळावा आणि इथली उमेदवारी पक्ष व युतीचे सहकारी ठरवतील त्या प्रमाणे लढवली जाईल असं आमचं आज ठरलं आहे”, असं ते म्हणाले.

माढ्यामुळे अजित पवार गटात फूट पडेल?

दरम्यान, जागा न मिळाल्यामुळे पक्षात फूट पडण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. “अजित पवार शिस्तप्रिय आहे, आम्हीही शिस्तप्रिय आहोत. त्यामुळे आमच्यात बंडखोरी होणार आहे. लोकशाही आहे. आम्ही पक्षाला जागा मागतोय. पुढे काय होईल हे पक्षश्रेष्ठी बघून घेतील”, असं ते म्हणाले.

माढा मतदारसंघ : भाजपच्या उमेदवारीसाठी ‘दोन सिंहा’ची प्रतिष्ठा पणाला

“तो’ पुढचा विषय!”

दरम्यान, एकीकडे पक्षफुटीची शक्यता फेटाळून लावताना दुसरीकडे बंडखोरीबाबत त्यांनी सूचक विधान केलं आहे. जर अजित पवार गटाला माढ्याची जागा सोडली, तर पक्षात बंडखोरी होईल का? असा प्रश्न पत्रकारांनी दुसऱ्यांदा विचारला तेव्हा “तो पुढचा विषय आहे”, असं सूचक उत्तर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी यावेळी दिलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

“जेव्हा युतीचे नेते उमेदवार ठरवतील, तेव्हा त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकू. युतीमध्ये जागांची चर्चा होईल, तेव्हा अजित पवार आमचे प्रतिनिधी म्हणून आमची भूमिका मांडतील”, असंही ते पुढे म्हणाले.

रणजितसिंह नाईक-निंबाळकरांवर टीका

दरम्यान, यावेळी रामराजे नाईक-निंबाळकर यांनी माढ्याचे विद्यमान भाजपा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना लक्ष्य केलं. “माढ्याच्या विद्यमान खासदारांना मी विरोध केला आहे. त्यामुळे मी त्यांच्या कामावर समाधानी आहे की नाही हे मला विचारण्यात काही अर्थ नाही. कारण त्यांचं काम मला तरी बघायला मिळालं नाही. माढ्याच्या खासदारांना मी पाहिलेलंच नाही. माझ्या दृष्टीने ते अदृश्यच आहेत”, अशी खोचक टीका त्यांनी केली.