वाई:सलग सुट्ट्यांमुळे भर पावसात साताऱ्यातील महाबळेश्वर पाचगणीसह कास पठाराकडे मोठ्या संख्येने पर्यटकांनी  धाव घेतल्याने गिरीस्थळे हाऊसफुल्ल झाली. यामुळे अनेक तास वाहतूक कोंडीत पर्यटक अडकून पडले. वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे  पाचगणी महाबळेश्वर येथे पर्यटना अभावी पर्यटक नाराज झाले तर कास पठारावर फुलांचा बहर पाहण्यास आलेल्या पर्यटकांची गाडीत अडकून रहावे लागल्याने निराशा झाली.

हेही वाचा >>> अतिवृष्टी, पुराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात द्वितीय स्थानी; राज्यात वीज पडण्याच्या ४७ घटनांची नोंद

अनंत चतुर्थी नंतर आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पाचगणीत हजारो पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. परिसरात हलका व मध्यम पाऊस सुरू आहे. ढगाळ वातावरण आणि धुके,वातावरणात गारठा आहे.वातावरण एकदम चांगले आहे.हिरव्यागार वनश्रीने महाबळेश्वर चे रूप पूर्णपणे पालटले आहे. डोंगर कपारीतून उंचावरून वाहणारे धबधबे,दाट धुक्याची चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे. सुखद व रम्य वातावरणाची मजा लुटण्यासोबतच धुवाँधार पावसात भिजण्याचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत. मुसळधार पाऊस,दाट धुके,वारा अश्या या धुंद वातावरणात खवय्ये पर्यटक गरमागरम पदार्थांचा आस्वाद घेत आहेत.

हेही वाचा >>> यात्रा काढून भाजपने ओबीसी जनगणनेपासून पळ काढू नये, विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार आक्रमक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी महाबळेश्वर पाचगणी सोडून पर्यटकांनी कास पठाराकडे  फुलांचा बहर पाहण्यासाठी पर्यटकानी हजेरी लावली .एकदम पर्यटक कास पठारावर आल्याने यवतेश्वर साताऱ्यापासून  यवतेश्वर घाट  कास पठारापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी आणि सोमवारी तर पर्यटकांनी गर्दीचा उच्चांक मोडला. यावेळी रविवारी आणि सोमवारी डोंगर माथ्यावर रस्त्यावर  पर्यटक वाहनात अडकून पडले. संततधार पाऊस धुके आणि वाऱ्यामुळे अनेक वाहने मार्गस्थ होताना अडचणी येत होती. महाबळेश्वर व कास पठरावरती अनेक तास वाहतूक कोंडी कायम होती. यामुळे पर्यटक नाराज होऊन  परतीच्या प्रवासाला लागले. सोमवारी दोन्ही ठिकाणी सुमारे चार तासांहून अधिक वेळ मार्गावर वाहतूक कोंडी  कायम होती.