राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि परभणीतल्या गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे भाजपात जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे भाजपाने आपल्या मित्रपक्षाचा आमदार फोडला, अशी टीकाही सुरू होती. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या आठवड्यात परभणी जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात ते रत्नाकर गुट्टे यांना भेटले होते. त्या भेटीनंतर बावनकुळे यांनी सांगितलं की, आगामी विधानसभा निवडणुकीत रत्नाकर गुट्टे हे भाजपाचे गंगाखेडचे उमेदवार असतील. परंतु, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज गंगाखेडला जाऊन गुट्टे यांनी भेट घेतली. तसेच या भेटीनंतर जानकर यांनी जाहीर केलं की, रत्नाकर गुट्टे रासप सोडून जाणार नाहीत.

रासपचे प्रमुख महादेव जानकर यांची जनस्वराज यात्रा शनिवारी (५ ऑगस्ट) गंगाखेड येथे आली होती. यावेळी रत्नाकर गुट्टे यांनी जानकर यांचं जंगी स्वागत केलं. दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. या भेटीनंतर जानकर आणि गुट्टे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी जानकर म्हणाले, रत्नाकर गुट्टे हे आगामी निवडणुकीत भाजपा-रासप युतीचे उमेदवार असतील. गुट्टे यांनी आमदारकीच्या माध्यमातून लोकांचा मोठ्या प्रमाणात विकास केला आहे.

महादेव जानकर म्हणाले, काही दिवसांपूर्वी रत्नाकर गुट्टे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली. या भेटीनंतर गुट्टे यांनी लगेच मला त्या भेटीची माहिती दिली. खरंतर बावनकुळे तसं म्हणाले नाहीत. उद्या आमची युती (भाजपा-रासप) तर होणारच आहे ना? आमच्याकडून त्याला ना नाही. मी इथे आत्मविश्वासाने सांगतो रत्नाकर गुट्टे मेले तरी मला सोडून जाणार नाहीत.

हे ही वाचा >> न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो, काँग्रेस पदाधिकाऱ्याने थेट रेट कार्ड जाहीर करत ‘अशी’ उडवली खिल्ली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महादेव जानकरांची NDA मध्ये कुचंबना : राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, आमची राष्ट्रीय समाज पक्षाशी चर्चा सुरू आहे. मला खात्री आहे की महादेव जानकरसुद्धा एक दिवस आमच्याबरोबर येतील. कारण, एनडीएमध्ये त्यांची फार कुचंबना होत आहे.