राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरत आहे. राज्यातील विकासकामं तसेच कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील डान्स बारच्या मुद्द्यावरूनही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला घेरण्याचा काल ( २५ ऑगस्ट) प्रयत्न केला होता. कोणी आक्षेप घेतला की डान्स बार काही काळासाठी बंद केले जातात. नंतर पुन्हा ते सुरू करण्यात येतात, असा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला होता. आता याच मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले असून राज्यातील डान्स बार बंद आहेत, असे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>> “मी इंदिरा गांधींचा फॅन होतो” म्हणत एकनाथ शिंदेंचा पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव

“ठाणे, कोपरी, कापूरबावडी येथे ऑर्केस्ट्रावर आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे. जून २०२२ अखेर डान्स बाबबतचे ८५ गुन्हे दाखल असून १६०५ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. एका माध्यमाने ठाण्यातील डान्स बारचे स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यानंतर तपास केला असता त्या परिसरात बार बंद असल्याचे आढळून आले होते. तसेच येथे काही अवैध काम केले जात असल्याचेही आढळून आले नव्हते,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा >>> “तेव्हा मला आमच्या प्रमुखांचा फोन आला आणि…”, एकनाथ शिंदेंनी अजित पवारांसोरच सांगितला पहाटेच्या शपथविधीचा ‘तो’ किस्सा

“सध्या ठाण्यातील डान्स बार बंद आहेत. समोर आलेली व्हिडीओक्लीप ही पूर्वीची होती. जितेंद्र आव्हाड यांना याबाबत माहिती आहे. अमली पदार्थाची तस्करी आणि सेवन याबाबत दोन महिन्यांत साधारण ६६४५ गुन्हे दाखल झाले. तसेच मुंबईमध्ये १४ कोटी रुपयांची एमडी तस्करी पोलिसांनी रोखली आहे,” असेदेखील एकनाथ शिंदे म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> बीडीडी चाळीतील पोलिसांना आता १५ लाखांत घर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

अजित पवार काय म्हणाले होते?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माध्यमांनी किंवा, लोकप्रतिनिधींनी डान्सबार सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर ते काही दिवसांसाठी बंद केले जातात. नंतर पुन्हा सुरू केले जातात. हा गंभीर मुद्दा आहे. या अडचणीला काही जालीम उपाय करायचा असेल तर करावा,” असे अजित पवार म्हणाले होते.