Mumbai News Updates : राज्याच्या राजकारणात सातत्याने उलथापालथी होत आहेत. शरद पवारांची काल बीडमध्ये तुफान सभा झाली. या सभेबाबत आज अनेकांच्या प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या सिनेट निवडणुका रातोरात रद्द केल्याने आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तसंच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. यासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी वाचा.

maharashtra state electricity workers federation marathi news
‘वीज कर्मचाऱ्यांचे अत्यावश्यक सेवेच्या नावावर शोषण…’
Lok Sabha Election 2024 Live Updates Maharashtra Politics News
Maharashtra News : “यंदाची निवडणूक शेवटची ठरू नये”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले, “ज्यांच्या हाती…”
Maharashtra News in Marathi
Maharashtra News : नाना पटोलेंच्या अपघातामागे संजय राऊतांचा हात? संजय शिरसाटांचा गंभीर आरोप, म्हणाले…
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
Maharashtra News : गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
Live Updates

Mumbai Maharashtra Today :  महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि हवामानासंदर्भातील ताज्या घडामोडी वाचा!

17:15 (IST) 18 Aug 2023
भाजपाचं ‘दुकान’ जोरात, पण नवीन ग्राहकच जास्त! स्वपक्षाच्या सद्यस्थितीवर नितीन गडकरींचा मार्मिक टोला

बुलढाणा : जनसंघाच्या लाखो कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत काम केले. पुढे भाजपाच्याही जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी त्याग, बलिदान, समर्पण या तत्वाने काम केले. परंतु, आज चित्र बदलले आहे. आता भाजपा मोठा झालाय, दाही दिशांना विस्तारलाय. भाजपाचे ‘दुकान’ जोरात सुरू आहे. मात्र या दुकानात नवीन ग्राहकच जास्त दिसत आहेत. जुने काही दिसत नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वपक्षाच्या सद्यस्थितीवर मार्मिक टाेला लगावला.

सविस्तर वाचा...

17:07 (IST) 18 Aug 2023
मेल उशिरा मिळाल्याने अनेक विद्यार्थी तलाठी परीक्षेपासून वंचित; डोंबिवलीतील विद्यार्थिनीला फटका

१७ ऑगस्ट रोजी सकाळी सकाळी नऊ वाजता नवी मुंबईतील खारघर परीक्षा केंद्रावर होणाऱ्या तलाठी स्पर्धा परीक्षेचा मेल १६ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता डोंबिवलीतील एका विद्यार्थीनीला आला. सविस्तर वाचा…

17:01 (IST) 18 Aug 2023
गुन्हा नसताना सातपाटीचा तरुण चेन्नई पोलिसांच्या ताब्यात; बँक खात्यात सहा लाख ९० हजार बेनामी रक्कम जमा झाल्याचा आरोप

सातपाटी येथील एका रिक्षा चालकाच्या बँक खात्यामध्ये सहा लाख ९० हजार रुपये बेनामी जमा झाल्याच्या कारणावरून चेन्नई येथील माऊंट थॉमस सायबर क्राइम विभागाने या तरुणाला ताब्यात घेतले आहे. सविस्तर वाचा…

16:31 (IST) 18 Aug 2023
मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : स्थगितीनंतरही नामनिर्देशन अर्ज स्विकारले

मुंबई : राज्य शासनाने दिलेल्या पत्रातील निर्देशानुसार आणि त्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

सविस्तर वाचा...

16:12 (IST) 18 Aug 2023
मराठवाड्यात शरद पवारांचा बंडखोरांना सूचक इशारा

छत्रपती संभाजीनगर : पक्ष सोडून जाणाऱ्यांसाठी ‘गद्दार’, ‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’, अशी शब्दरचना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये विकसित झालेली. पक्षातून बाहेर पडणाऱ्या आपल्याच पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्याची दारूची दुकाने कशी आहेत, कोणता आमदार मुंबईच पत्ते खेळत बसतो, अशी उणीदुणी चव्हाट्यावर आणत व्यक्त होणारी राजकीय कटुता एका बाजूला, पक्षच ताब्यात घेण्याच्या भाजपच्या नव्या राजकीय कार्यपद्धतीतून फुटलेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांविषयी व्यक्त होणारी कटुता आणि शरद पवार यांची भाजप विरोधी वक्तव्ये दुसऱ्या बाजूला, या राजकीय पटावर भाजप मात्र मागच्याच बाकावर असल्याचे चित्र मराठवाड्यात दिसून येत आहे.

सविस्तर वाचा...

15:47 (IST) 18 Aug 2023
"पोटात भुकेची आग..."; रोहित पवारांचं ट्वीट

शासन आपल्या दारी उपक्रमावरून रोहित पवारांचं सूचक ट्वीट

15:28 (IST) 18 Aug 2023
मेल उशिरा मिळाल्याने अनेक विद्यार्थी तलाठी परीक्षेपासून वंचित; डोंबिवलीतील विद्यार्थिनीला फटका

१७ ऑगस्ट रोजी सकाळी सकाळी नऊ वाजता नवी मुंबईतील खारघर परीक्षा केंद्रावर होणाऱ्या तलाठी स्पर्धा परीक्षेचा मेल १६ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता डोंबिवलीतील एका विद्यार्थीनीला आला. सविस्तर वाचा…

15:19 (IST) 18 Aug 2023
पिंपरीत शासकीय वसतिगृहामध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केलं नाही; एबीव्हीपीचे पदाधिकारी आक्रमक

पिंपरी-चिंचवडमधील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहामध्ये स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहण न केल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

सविस्तर वाचा...

15:03 (IST) 18 Aug 2023
विद्यादानाचे काम सोडून हे काय भलतंच..; गुरुजींना ऐकावे लागताहेत टोमणे

अमरावती : जनगणना आणि निवडणूक विषयक कामे वगळता कोणतीही अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊ नयेत, अशी शिक्षण हक्‍क कायद्यात तरतूद असताना सतत चालणाऱ्या मतदार नोंदणीत शिक्षकांना गुंतवले गेले आहे. त्‍यात भरीस भर आता निरक्षरांचे सर्वेक्षण करण्‍याचे कामही स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधील शिक्षकांकडे सोपविण्‍यात आले आहे. यातून शिक्षकांची छळवणूकच होणार आहे.

सविस्तर वाचा...

14:45 (IST) 18 Aug 2023
पिंपरी: कोयता गॅंगचा मॉलवर दरोड्याचा प्रयत्न फसला

पिंपरी: वाकड परिसरातील बंद दुकाने, मॉलवर रात्री दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी रात्री थेरगाव येथे करण्यात आली.

सविस्तर वाचा...

14:28 (IST) 18 Aug 2023
गोंदिया : मणिपूर जळतेय, तुम्ही महोत्सव कसला साजरा करताय? आदिवासी संघटना संतप्त, जखमेवर मीठ न चोळण्याचा इशारा

आदिवासी समाजाच्या जखमांवर मीठ चोळून भावनांना ठेच पोहोचविण्याचा प्रकार सरकारकडून होत आहे, असा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे.

सविस्तर वाचा...

14:21 (IST) 18 Aug 2023
सी. ए. परीक्षेच्या तारखामध्ये बदल, कधी होणार परीक्षा जाणून घ्या...

वर्धा: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट ऑफ इंडिया या संस्थेने सी ए फाउंडेशन या परीक्षेच्या या वर्षीच्या तारखात बदल केला आहे. या परीक्षा २४,२६,२८,३० डिसेंबर रोजी होणार होत्या.

सविस्तर वाचा...

14:06 (IST) 18 Aug 2023
नवी मुंबई : एपीएमसी बाजारात टॉमेटोच्या दरात घसरण; प्रतिकिलो १० ते १५ रुपयांनी उतरले

यंदा टोमॅटोची लागवड कमी आहे. त्यामुळे उत्पादन कमी मागणी जास्त आहे. गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला होता. मात्र हळूहळू टोमॅटोची आवक वाढत असून दर उतरत आहेत. गुरुवारी घाऊक बाजारात आवक वाढल्याने प्रतिकिलो दरात १०-१५रुपयांनी घसरण झाली आहे. सविस्तर वाचा…

13:51 (IST) 18 Aug 2023
घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; तीन आरोपींना मध्य प्रदेश मधून अटक

अलिबाग: निर्जन वस्तीतील घरांची रेकी करून तिथे घरफोडी करणाऱ्या, एका आंतरराज्य टोळीला रायगड पोलिसांनी जेरबंद केला आहे.

सविस्तर वाचा...

13:38 (IST) 18 Aug 2023
यवतमाळ : आठ महिन्यांत १६० शेतकरी आत्महत्या; कृषिमंत्री आज जिल्ह्यात, लक्ष देणार का?

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात तब्बल ४० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. आज शुक्रवारी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे यवतमाळ जिल्ह्यात आहेत.

सविस्तर वाचा...

13:37 (IST) 18 Aug 2023
पनवेल : विसर्जनानंतर गणेश मूर्तीचे विदारक चित्र बदलायचे असेल तर हे नक्की करा – पालिका आयुक्त देशमुख

रहिवाशांनी पालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचा निर्धार करून पालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जाहीर केलेल्या पंचसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी खारघ येथे केले.

सविस्तर वाचा...

13:33 (IST) 18 Aug 2023
"ये डर अच्छा है!", सिनेट निवडणूक रद्द केल्यानंतर आदित्य ठाकरेंचं ट्वीट

"मिंधे-भाजप राजवट महाराष्ट्रातील निवडणुकीला इतकी घाबरलेली आहे की त्यांनी पदवीधर मतदारसंघाच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका अचानक रद्द केल्या! आम्हाला माहित आहे की बेकायदेशीर मुख्यमंत्री नेहमीच घाबरतात. म्हणून ते वॉशिंग मशीनमध्ये गेले. पण आम्हाला पुढील गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत- १) अचानक निवडणूक रद्द करण्याचे कारण काय होते? २) या बैठकीत माननीय राज्यपालांचा सहभाग होता की निर्णयाची माहिती दिली होती? उल्लेखित बैठकीचे इतिवृत्त किंवा सरकारचे पत्र कोठे मिळेल? 4) नोंदणीसाठी १.१५ लाख पदवीधर मतदारांपैकी प्रत्येकाकडून घेतलेले २० ठेवले जातील की वापरले जातील? राजकीय हेतूने निवडणुका रद्द करणे हे आपल्या काळातील धोकादायक लक्षण आहे.

एकूणच, त्यांच्या बेकायदेशीर आणि भ्रष्ट राजवटीत त्यांनी जनतेचा जनादेश गमावला आहे हे त्यांना माहीत आहे. ये डर अच्छा है. पण लोकशाही रद्द करणे आपल्या देशासाठी चांगले नाही. आम्ही देशभक्त या राजवटीचा सामना करू" - आदित्य ठाकरे

https://twitter.com/AUThackeray/status/1692435472960880915?s=20

13:26 (IST) 18 Aug 2023
नागपूर: महामार्गालगतच्या वस्त्यांना अपघाताचा धोका, गतीरोधकही नाही

नागपूर: वर्धा मार्गावरील चिंचभुवन हे अपघात प्रवणस्थळ (ब्लॅकस्पॉट) घोषित करण्यात आले आहे. मात्र त्या ठिकाणी गतीरोधकही न लावल्याने वाहने सुसाट धावतात, परिणामी अपघाताचा धोका वाढला आहे.

सविस्तर वाचा...

13:18 (IST) 18 Aug 2023
डोंबिवली : घरडा सर्कल येथील खडीचा रस्ता बांधकाम विभागाकडून साफ

घरडा सर्कल चौकातील खडीमुळे अपघात घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पालिकेकडे केल्या जात होत्या.

सविस्तर वाचा...

12:58 (IST) 18 Aug 2023
भंडारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एलसीबीच्या जाळ्यात; दहा हजार रुपये लाच स्वीकारताना अटक

भंडारा: भंडारा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश केशवराव साठवणे, वय ४५ वर्ष, रा. हनुमान वॉर्ड तकीया रोड , भंडारा याला १० हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

12:41 (IST) 18 Aug 2023
धुळ्यात विशेष लेखापरीक्षक पाच लाखाची लाच घेताना जाळ्यात

धुळे: अवसायनात निघालेल्या यावल-सावदा (ता.रावेर) येथील एका पतसंस्थेचा गाळा आणि अनामत रक्कम तक्रारदाराच्या नावे करून देण्यासाठी पाच लाखाची लाच स्वीकारताना धुळे येथील सहकारी संस्थचे विशेष लेखापरीक्षक तथा संबंधित पतसंस्थेचे अवसायक सखाराम ठाकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात ताब्यात घेतले.

सविस्तर वाचा...

12:18 (IST) 18 Aug 2023
अकोला : पतीचे दुसरीवर जडले प्रेम, घटस्फोटासाठी पत्नीचा छळ

अकोला : हरियाणातील गुडगाव येथे नोकरीवर असलेल्या पतीचे दुसऱ्या महिलेवर प्रेम जडले. त्यामुळे घटस्फोटासाठी मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याची तक्रार ३३ वर्षीय विवाहितेने अकोट शहर पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणी पती, सासू व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा...

12:12 (IST) 18 Aug 2023
वंदे भारत एक्सप्रेस लवकरच येणार नवीन रूपात! असे असतील गाडीतील आधुनिक बदल…

वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी आणखी आधुनिक रूपात दाखल होणार आहे. सुरक्षा आणि तांत्रिक सुधारणांसह या गाड्यांचे उत्पादन चेन्नईतील रेल्वे उत्पादन प्रकल्पात सुरू आहे.

सविस्तर वाचा...

<a href="https://www.facebook.com/LoksattaLive">

12:05 (IST) 18 Aug 2023
वाशीम जिल्ह्यातील ९६ अंगणवाड्यांना स्वंतत्र इमारतीची प्रतिक्षा!

वाशीम : जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कक्षांतर्गत जिल्ह्यात १ हजार ७४ अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यापैकी ९७८ अंगणवाड्यांना स्वंतत्र इमारती आहेत. तर ९६ अंगणवाड्यांना आजही हक्काची इमारत नसल्याने त्या इतरत्र भरतात. त्यापैकी काही अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळेत, ग्रामपंचायतीत, समाज मंदिरात तर काही अंगणवाडी सेवीकांच्या घरी भरत असून अंगणवाड्यांना कधी हक्काची जागा मिळेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सविस्तर वाचा...

11:56 (IST) 18 Aug 2023
"...बाकी गेलं तेल लावत"; टाऊन प्लानिंगवरून राज ठाकरेंचा सरकारला टोला

शहरांकडे लक्ष नाही. टाऊन प्लानिंग होत नाही. पुण्यात पाच-पाच पुणे आहेत. तुम्ही याला हडपसर म्हणताय. हडपसर खरंतर मागे गेलं. कसं कसं वाढत जातंय, याचं कारण कोणाचं लक्षच नाहीय. मतदार वाढवा, मतदान पदरात पाडून घ्या, बाकी गेलं तेल लावत. काही गोष्टींचे नियम असतात, एखाद्या ठिकाणाच्या लोकसंख्येनुसार शाळा, रुग्णालय, थिएटर्स पाहिजेत. इंग्रजांच्या काळातलं टाऊन प्लानिंग दाखवेन, असं राज ठाकरे म्हणाले. ते आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत.

11:56 (IST) 18 Aug 2023
“संघ विचारधारेच्या पंतप्रधानांमुळे देश संकटात”, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत सुरेश द्वादशीवार यांचे परखड मत

नागपूर : भगवा ध्वज असताना तिरंगा कशाला, मनुस्मृती असताना राज्यघटना कशाला अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १९४७ साली घेतली होती. आज देशाचे पंतप्रधानही याच मानसिकतेचे असल्याने देशासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे, देश संकटात सापडला आहे, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.

सविस्तर वाचा...

10:50 (IST) 18 Aug 2023
पुणे : ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड

तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या आरोग्य समस्यांवर उपचाराची नवी दिशा ससूनमुळे खुली झाली आहे.

वाचा सविस्तर...

10:48 (IST) 18 Aug 2023
स्पा आणि मसाजच्या नावावर सेक्स रॅकेट; कोलकाता, मुंबई- दिल्लीतील ६ मुलींची सुटका

नागपूर: सदर-छावणी परीसरातील हॉटेल सिटीस्केप येथे सुरु असलेल्या सेक्स रॅकेटवर गुन्हे शाखेच्या एएचटीयू आणि युनीट दोनच्या पथकाने छापा घातला.

सविस्तर वाचा...

10:46 (IST) 18 Aug 2023
बेशिस्त वाहन चालकांना वठणीवर आणण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय…

बेशिस्त वाहन चालक हे काही सुधारत नसल्याने आता थेट त्यांचा वाहन परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन तीन महिन्यांकरिता रद्द करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

LIVe Blog Image

महाराष्ट् ब्रेकिंग न्यूज

Mumbai Maharashtra Live Today :  महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि हवामानासंदर्भातील ताज्या घडामोडी वाचा!