राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी अखेर मुहूर्त मिळाल्याची चर्चा आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, यावेळी १२ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, प्रत्येक भागातील एका मंत्र्याची निवड केली जाऊ शकते. सकाळी ११ वाजता राजभवनमध्ये हा शपथविधी पार पडणार आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने एक महिन्यानंतरही मंत्रीमंडळ विस्तार न केल्याने विरोधकांकडून टीका होत आहे.

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर…

कोणाला संधी मिळणार?

ज्येष्ठ भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्यची शक्यता आहे. तसंच शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, सदा सरवणकर आणि दीपक केसरकर उद्या मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

भाजपामधून कोणाला संधी मिळणार?

१) चंद्रकांत पाटील
२) सुधीर मुनगंटीवार
३) गिरीश महाजन
४) प्रवीण दरेकर
५) राधाकृष्ण विखे पाटील
६) गणेश नाईक

शिंदे गटातील संभाव्य मंत्री कोण?

१) दादा भुसे
२) उदय सामंत
३) गुलाबराव पाटील
४) शंभूराज देसाई
५) दीपक केसरकर
६) सदा सरवणकर

अपक्ष आमदार बच्चू कडू यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे.

३० जूनला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला होता. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी आशा होती. यासाठी एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्ली दौरेही सुरु होते. पण महिना उलटल्यानंतरही मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने विरोधकांकडून सतत टीका होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदारांच्या अपात्रतेचं काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालाची प्रतिक्षा

बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार मात्र अद्याप कायम आहे. सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून दाखल सहा याचिका एकत्र केल्या असून त्यावर एकत्रित सुनावणी सुरु आहे. ४ ऑगस्टला झालेल्या सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करु शकत नाही असं सांगत त्यांना पुढील सुनावणीपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका अशी सूचना केली आहे. शुक्रवारी (१२ जुलै) याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.