Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी आज पार पडला. भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली शपथ घेतली. भाजपाच्या वाट्याला २० मंत्रिपदे आल्याची चर्चा आहे. शिवसेनेला (शिंदे) १२ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला १० मंत्रिपदे मिळणार असल्याचे बोलले जात आहे. रविवारी सकाळी १० वाजता संभाव्य मंत्र्यांना फोनद्वारे शपथविधीसाठी तयार राहा, असे निरोप देण्यात आले होते. माजी मंत्री रवींद्र चव्हाण आणि सुधीर मुनगंटीवार या शिंदे मंत्रीमंडळातील भाजपच्या दोन मंत्र्यांची नावे नव्या मंत्रिमंडळाच्या यादीत नाही.

हे वाचा >> संभाव्य मंत्र्यांना अखेर निरोप पोहोचले; चव्हाण, मुनगंटीवार यांना विश्रांती, वर्धेचे पंकज भोयर यांना संधी

भाजपाकडून कुणाला मिळाले मंत्रिपद

1भाजपाचंद्रकांत पाटीलनिर्णय प्रलंबित
2भाजपामंगलप्रभात लोढानिर्णय प्रलंबित
3भाजपाराधाकृष्ण विखे पाटीलनिर्णय प्रलंबित
4भाजपापंकजा मुंडेनिर्णय प्रलंबित
5भाजपागणेश नाईकनिर्णय प्रलंबित
6भाजपाचंद्रशेखर बावनकुळेनिर्णय प्रलंबित
7भाजपाआशिष शेलारनिर्णय प्रलंबित
8भाजपाअतुल सावेनिर्णय प्रलंबित
9भाजपासंजय सावकारेनिर्णय प्रलंबित
10भाजपाअशोक उईकेनिर्णय प्रलंबित
11भाजपाआकाश फुंडकरनिर्णय प्रलंबित
12भाजपामाधुरी मिसाळनिर्णय प्रलंबित
13भाजपाजयकुमार गोरेनिर्णय प्रलंबित
14भाजपामेघना बोर्डीकरनिर्णय प्रलंबित
15भाजपापंकज भोयरनिर्णय प्रलंबित
16भाजपाशिवेंद्रराजे भोसलेनिर्णय प्रलंबित
17भाजपानितेश राणेनिर्णय प्रलंबित
18भाजपागिरीश महाजननिर्णय प्रलंबित
19

रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दुपारी ४ वाजता राजभवनावर होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. एकीकडे शपथविधीची तयारी सुरू असताना दुसरीकडे मंत्री कोण होणार यांची नावे गुलदस्त्यात होती.

हे ही वाचा >> Maharashtra Cabinet Expansion: शिंदे गटातील कोणत्या आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेले? आमदार भरत गोगावलेंनी सांगितली नावे

फोन आल्यावर सुन्न झालो

भाजपाचे आमदार जयकुमार रावल म्हणाले की, मला चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिपदासाठी फोन आला तेव्हा दोन मिनिटे सुन्न झालो. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करायला मिळणार आहे, याचा आनंद वाटतो. मला मिळालेल्या संधीतून जे जे चांगले काम करता येईल, ते करेन, असे रावल म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते पुढे म्हणाले, मी जेव्हा मंत्रिपदाच्या यादीवर नजर टाकली, तेव्हा मला खूप आनंद वाटला. सर्व क्षेत्रातील, सर्व भागातील अतिशय जाणकार अशी नावे मंत्रिमंडळाच्या यादीत आहेत. एक चांगली टीम फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. याचा वेगळा अनुभव निश्चितच मिळणार आहे.