देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यात देखील रुग्णसंख्या वाढतानाच दिसत आहे. मंगळवारी राज्यात ३ आठवड्यांनी पहिल्यांदाच बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्या करोनाबाधितांपेक्षा जास्त आढळून आली. मात्र, बुधवारी पुन्हा हे प्रमाण वाढलं असून बुधवारी दिवसभरात ५७ हजार ६४० नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत करोनाची लागण झालेल्या नागरिकांची संख्या ४८ लाख ८० हजार ५४२ इतकी झाली आहे. यापैकी ६ लाख ४१ हजार ५९६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दुसरीकडे राज्यात दिवसभरात तब्बल ९२० करोनाबाधितांचा मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृतांचा आकडा ७२ हजार ६६२ इतका झाला आहे. त्यासोबत राज्याचा मृत्यूदर १.४९ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

दरम्यान, आज करोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या कमी असली तरी आज दिवसभरात एकूण ५७ हजार ००६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा एकूण आकडा ४१ लाख ६४ हजार ०९८ इतका झाला आहे. त्यासोबत राज्याचा रिकव्हरी रेट देखी ८५.३२ टक्क्यांवर आला आहे.

पुण्यात दिवसभरात ३ हजार २६० रुग्ण, ६४ रुग्णांचा मृत्यू

पुणे शहरात आज दिवसभरात ३ हजार २६० करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर ४ लाख ३६ हजार ३४९ इतकी रुग्णसंख्या झाली आहे. तर याच दरम्यान ६४ रुग्णांचा मृत्यू झाला असून ७ हजार ११८ इतकी मृतांची संख्या झाली आहे. त्याच दरम्यान ३ हजार ३०३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर ३ लाख ८९ हजार ४९९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra corona update todays cases increased recovery rate also pmw
First published on: 05-05-2021 at 21:51 IST