Interesting Facts About Maharashtra : १ मे १९६० रोजी स्वतंत्र्य महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. यामुळे दरवर्षी १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. अनेक भूमिपुत्रांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिले. आज महाराष्ट्र देशातील विकसित राज्यांत अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आज संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. समाजकारण, राजकारण, परंपरा- संस्कृती, तंत्रज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या महाराष्ट्राबद्दल आपण अशा २० खास गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत…

१) महाराष्ट्र हे आकारमानानुसार देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे कुवेत, कतार, ओमन, आर्यलँड, भूतान देशांपेक्षाही आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौकिमी आहे.

२) लोकसंख्येच्या बाबतीत देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२

३) महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. २०१४ साली अस्तित्वात आलेला पालघर हा सर्वात नवीन जिल्हा आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे.

हेही वाचा : Maharashtra Day 2023 : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग, बंद रस्ते, पार्किंग व्यवस्था

४) महाराष्ट्रात मराठी बोलणाऱ्यांची संख्या ६ कोटी २४ लाख ८१ हजारहून अधिक आहे.

५) महाराष्ट्राची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर आहे.

६) महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक रस्ते असणारे राज्य आहे.

७) महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.

८) महाराष्ट्रात १७ थंड हवेची ठिकाणे आहेत.

९) महाराष्ट्रातील नवी मुंबई हे जगातील सर्वात मोठं नियोजित शहर आहे

१०) महाराष्ट्राचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असे भाग पडतात.

११) सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्राची ओळख असून या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात.

१२) एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३ टक्के उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून होते.

१३) भारतातील चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे निर्मितीचे प्रमुख केंद्र मुंबई आहे.

१४) भारतातील सर्वात मोठा व आशियातील सर्वात जुना शेअर बाजार मुंबईत आहे.

१५) मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वात पहिला टोलमार्ग आहे.

१६) गोदावरी, कृष्णा, सावित्री, नर्मदा, पंचगंगा, कोयना ही महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत.

१७) महाराष्ट्रातील शनीशिंगणापूर येथील घरांना दरवाजे नाहीत. याच कारणामुळे हे देवस्थान जगभरात प्रसिद्ध आहे.

१८) महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये सहा राष्ट्रीय अभयारण्ये आहेत.

१९) मुंबईमधील लोकल ट्रेनमधून रोज जवळजवळ ६० लाख प्रवासी प्रवास करतात. हा आकडा इस्त्राइलच्या लोकसंख्येहून अधिक आहे.

२०) महाराष्ट्र हा शब्द संस्कृतमधून आल्याचे मानले जाते. संस्कृतमधील ‘महा’ म्हणजेच महान आणि ‘राष्ट्र’ म्हणजे देश हे दोन शब्दांना एकत्रित करुन तयार झाला आहे. महाराष्ट्र शब्दाचा अर्थ होतो महान राष्ट्र.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(सोर्स – विकीपीडिया)