Dahi Handi 2025 Live Updates News: दहीहंडीनिमित्त आज संबंध महाराष्ट्रात जल्लोष आणि उत्सहाचे वातावरण आहे. अनेक दिवसांपासून सर्वाधिक थर लावण्याचा सराव करणारे गोविंदा पथक आज विविध ठिकाणी थर लावून बक्षीस मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसतील. ठाणे शहरात सकाळ पासून ठाण्यासह मुंबईतील गोविंदा पथक दाखल झाले आहेत. विविध दहीहंडी आयोजकांकडे या पथकांनी थर रचले. त्यातील काहीजणाचे थर अचूक लागले तर, काहींचे कोसळले. पण,या चुरशीमध्ये पाच ते सहा गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील तीन गोविंदांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दहीहंडी बांधताना तरुणाचा मृत्यू
मुंबई-ठाण्यामध्ये उंच दहीहंडी फोडण्यासाठी थर रचण्यात गोविंदा पथके व्यग्र असतानाच उत्सवाला गालबोट लागले. मानखुर्द परिसरात बाल गोविंदांसाठी दहीहंडी बांधणाऱ्या एका गोविंदाचा पडून मृत्यू झाला. तर ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी रचलेल्या थरांवरून कोसळून ३० जण जखमी झाले.
विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून दहीहंडी उत्सव आयोजित केले जात असतात. या उत्सवाशी संबंधित सर्व घडामोडी या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
Mumbai Thane Dahi Handi and Rains News Live Update | मुंबई, ठाण्यातील दहीहंडी आणि पावसाशी निगडित बातम्या
Dahi Handi 2025 News Live Updates: मंत्री भरत गोगावले यांनी गोविंदा पथकांसोबत नॅपकिन फिरवत धरला ठेका
मंत्री भरत गोगावले यांनी आज महाड मधील भरतशेठ मित्र मंडळाच्या आयोजित दहीहंडीत हजेरी लावत नाचण्याचा ठेका धरला. यावेळी कार्यकर्तेही भेभान होऊन नाचले. यावेळी त्यांनी गोविंदा पथकांसोबत हातात नॅपकिन घेत ठेका धरत गोविंदा पथकांना प्रोत्साहन दिले. यावेळी दापोलीचे माजी आमदार संजय कदम, आणि नुकतेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून शिंदे सेनेत गेलेले माणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी सुद्धा मंत्री गोगावले यांच्यासोबत ठेका धरत दहीहंडी मध्ये सहभाग घेतला. गोगावले यांच्या धर्मपत्नी सुषमा गोगावले आणि त्यांचे नातू देखील सहभागी होते.
Dahi Handi 2025 : वसई विरार मध्ये 'दहीहंडी' उत्सवाचा जल्लोष; भर पावसात हंड्या फोडण्यासाठी गोविंदांची चढाओढ
राजन विचारे यांची दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीबाबत प्रतिक्रिया.., म्हणाले, “ यह फेविकॉल का जोड है, टुटेगा नही..”,
दहीहंडी २०२५ : ठाणे शहरात आतापर्यंत पाच ते सहा गोविंदा जखमी
Video : Dahi Handi 2025 Avinash Jadhav : मनसेच्या हंडीत जितेंद्र आव्हाड आणि ठाकरेंचे राजन विचारे, आव्हाडांनी गायले जय-जय महाराष्ट्र माझा….
एकनाथ शिंदे, अभिनेता गोविंदा यांची ठाण्यातील दहीहंडी उत्सवाला हजेरी
ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेता आणि शिवसेना नेते गोविंदा हे दहीहंडी उत्सवात सहभागी झाले.
Dahi Handi 2025 : ग्रामीण भागात पारंपारिक पद्धतीने दहीहंडी उत्सव
संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीत दहा थरांची हांडी लावण्यात आली. हा एक नवा विश्वविक्रम आहे. या पूर्वी नऊ थर लावण्यात आले होते. महिलांनी देखील ७ थर लावले. स्पेनहून एक गट आला आहे. आज येथे शोले चित्रपटाला ५० वर्षे झाली म्हणून रमेश सिप्पी यांना सन्मानित करण्यात आले, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.
Dahi Handi 2025 : एकनाथ शिंदे टेंभीनाक्याला येताच, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे’ गाणे वाजू लागले…
ठाण्यात अविनाश जाधव यांच्या दहीहंडीत सातव्या थरावरून पडल्याने एक गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याच दहीहांडीत आणखी एका पथकातील गोविंदा जखमी झाल्याचेही माहिती मिळत आहे.
Dahi Handi 2025 News Live Updates: टेंभीनाक्यावरील दंहीहंडीतून खासदार नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांना टोला
'एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली, पण कमावलेले टिकवताही आले पाहीजे', असे विधान कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांनी केले होते. त्यांच्या या विधानाला खासदार नरेश म्हस्के यांनी टेंभीनाक्याच्या दहीहंडीतून उत्तर दिले. ते म्हणाले, नवख्या आमदारांना मंत्रीपद मिळाले तर लॉटरी लागली असे म्हणता येईल. पण शिंदे साहेबांचा पराभव कधीच झाला नाही. शिंदे साहेबांनी धाडस दाखवले, म्हणूनच राज्यात सत्ता आली. त्यांच्यामुळेच अनेकजण आमदार आणि खासदार झाले आहेत. अशाप्रकारची विधाने करून कुणीही महायुतीत खोडा घालू नये. कदाचित गणेश नाईक यांचे वय झाल्यामुळे ते असे बोलत असावेत, असे प्रत्युत्तर म्हस्के यांनी दिले.
Dahi Handi 2025 : ठाण्यातील दहिहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.., “ विरोधकांनी विरोधाचे थर लावले पण, आम्ही २३२ थर लावत..’’
तिरंगा ध्वज घेण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्षांची अधिकाऱ्यांकडे पैशाची मागणी; आमदार बांगर यांच्या आरोपामुळे सत्ताधाऱ्यातील वाद विकोपाला गेल्याचे चित्र
“ काही गोविंदा पथकांना वाटत होते की, आमचा विक्रम कोणी मोडणार नाही पण..”, विश्व विक्रमानंतर मंत्री प्रताप सरनाईक असे का म्हणाले…
Dahi Handi 2025 : दहा थर रचून विश्वविक्रम करणाऱ्या कोकणनगर पथकातील गोविंदा म्हणाला "आम्हाला आत्मविश्वास होता की यंदा..."
Dahi Handi 2025 : शिवसागर गोविंदा पथकाचे ‘छावा' थर… जन्मापासून बलिदानापर्यंतचा इतिहास…
Dahi Handi 2025 : जय-जवान पथकाचा विश्वविक्रम मोडणारा कोकण नगर गोंविदा पथक आहे तरी कोण?
Dahi Handi 2025 News Live Updates: ‘महानगरपालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने टीका
महानगरपालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली. आता त्याठिकाणी विकासाची हंडी आम्ही लावू. त्यातील विकासाचे लोणी ते जनसामान्यांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. दहीहंडी आणि जन्मष्टामीच्या सर्वांना शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जांबोरी मैदानावरील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली असताना दिली.
Dahi Handi 2025 : मुसळधार पाऊस, मैदानात चिखल आणि दृष्टिहीन गोविदांची चार थरांची सलामी…
सातारा: झेंडूच्या फुलांनी हास्यरसाचा दरवळ, बंडा जोशी यांच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद
Dahi handi utsav 2025 : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिवसभर दौरा…
रायगडला मुसळधार पावसाने झोडपले; अंबा कुंडलिका नद्यांनी इशारा पातळी ओलांडली...
नाशिक कुंभमेळा : मंत्री गिरीश महाजन दक्ष, कामांकडे लक्ष; एकनाथ शिंदे, अजित पवार गटाकडे दुर्लक्ष...
गिरीश महाजन-छगन भुजबळ संघर्षाचा नवीन अध्याय
"मुंबई महापालिकेची हंडी वर्षानुवर्षे उबाठावाले फोडत आले. खालच्या थराला सामान्य मुंबईकर पिचत होता. मुंबईकर कर भरत हंडी भरायचा. त्यांच्या अंगाखांद्यावर चढलेला कृष्णाचं सोंग घेतलेला पेंद्या मात्र महापालिकेच्या हंडीतील रस्ते, नालेसफाई, पाणी आणि खड्ड्यांच्या कंत्राटातूनही अलगद लोण्याचा मलिदा काढून ओरपायचा आणि मुंबईकरांच्या माथ्यावर हंडीची खापरं फोडायचा. कृष्णाचं सोंग घेऊन कंसाच काम करणाऱ्यांना आता कायमचं घरी बसवूया, सकाळी भोंग्याची बांग देणाऱ्या पुतना मावशीला तिची जागा दाखवूया, आणि संकटात गोवर्धन धरणाऱ्या कृष्णाप्रमाणेच मुंबईकरांची काळजी घेणाऱ्या देवेंद्रजीना साथ देऊया…", अशा शब्दात भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षावर टीका केली.
https://twitter.com/keshavupadhye/status/1956547902836285685
कृषी, साहित्य, शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तांसाठी मोठी संधी! सविस्तर वाचा, नेमकी काय आहे... 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'
शनिवारी घराबाहेर पडताय, थांबा... इथे रस्त्यांशेजारी आहेत दहीहंड्या, होऊ शकते कोंडी
कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी साजरी करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय (संग्रहित छायाचित्र)