Maharashtra Politics News Updates, 11 August 2025 : निवडणूक आयोगावर आरोप करणाऱ्या विरोधकांवर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. यावर संजय राऊतांनी फडणवीस यांना खडे बोल सुनावले आहेत. “देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यानी निवडणूक आयोगाचं प्रवक्तेपद स्वीकारलं असेल तर त्यांनी सांगावं. देशातील संपूर्ण विरोधी पक्षाला वाटत आहे की आपली फसवणूक झाली आहे, तो विरोधी पक्ष एकवटला आहे आणि त्याची निवडणूक आयोगाशी लढाई आहे. जे निवडणूक आयोगाचे लाभार्थी आहेत त्याच्यापैकी एक देवेंद्र फडणवीस आहेत. निवडणूक आयोगाच्या दरोड्यातील देवेंद्र फडणवीस लाभार्थी आहेत. तेव्हा दरोड्यातील लाभार्थी फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची बाजू घेतल्याचे आश्चर्य वाटचा कामा नये. कारण त्याच्याकडे चोरीचा माल आहे. चोराने गप्प राहिले पाहिजे,” असे संजय राऊत म्हणाले.
Mumbai Maharashtra Breaking News Live Today - दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
फडणवीसांवर टीका करून आरक्षण मिळणार का? मंत्री राधाकृष्ण विखे यांचा मनोज जरांगे यांना सवाल
आटपाडीत डाळिंबाला प्रतिकिलो ३११ रुपये विक्रमी दर; शेतकऱ्यांकडून फटाके फोडून आनंद
लातूर रेल्वे डबेनिर्मिती कारखान्यातून दहा हजार स्थानिकांना रोजगार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
विकासावरील चर्चा भावकी आणि नात्या-गोत्यावर! खासदार काळे आणि दानवे यांच्यातील जुगलबंदी
कलंकित मंत्र्यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे शिवसेनेचे आंदोलन
पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी ३९५ कोटीची निविदा मंजूर - धैर्यशील माने
"अन्यथा, १५ ऑगस्टला डोंबिवली पालिकेच्या प्रवेशद्वारावर मटणाचे दुकान उघडणार", हिंदू खाटिक समाज संस्थेचा इशारा
Ghodbunder Traffic : “गायमुख घाटात खड्डे भरणी नव्हे तर खिसे भरणी”, राजन विचारेंनी केले सरकारवर गंभीर आरोप
Jitendra Awhad : “आधी पक्षचोरांना आपल्या पंखाखाली घेतले, नंतर मतांची…”, जितेंद्र आव्हाड यांची निवडणूक आयोगावर टीका
ठाणे: तलावात बुडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू
Video: ठाण्यातील रस्त्यावर डुप्लीकेट संजय शिरसाट, माणिक कोकाटे, योगेश कदम; ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन
Hasan Mushrif : शरद पवार, संजय राऊत यांच्याकडून कपोलकल्पित गोष्टी सांगून मनोरंजनच - हसन मुश्रीफ
शिवसेनेच्या नाशिक येथील बैठकीत राडा! दोन गटांमध्ये हाणामारी
शिवसेना (शिंदे) नाशिक येथे सुरू असलेल्या बैठकीत राडा झाल्याची घटना समोर आली आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील आढावा पूर्ण झाल्यानंतर दोन गट आपापसात भिडल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी दोन्ही गटात शिवीगाळ यासह तुफान हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले.
डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थी निमित्त विशेष नियोजन
"कल्याण डोंबिवलीतील मटण विक्री बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा…", रिपब्लिकन पक्षाचा आंदोलनाचा इशारा
महायुती मधील भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घ्या; शिवसेना ठाकरे गटाचे बीडमध्ये रस्ता रोको आंदोलन
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज बीडच्या अण्णाभाऊ साठे चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून भ्रष्ट मंत्र्यांचे तात्काळ राजीनामे घेण्यात यावेत. त्याच बरोबर सभागृहामध्ये रमी खेळणाऱ्या कोकाटेंचाही राजीनामा घ्यावा. यासह मंत्री संजय शिरसाठ, मंत्री माणिकराव कोकाटे आणि आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जवळपास एक तासाहून अधिक काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
‘संजय नोटावाले, रम्मीराव ढेकळे अशी तिरकस नावे देत शिवसेनेचे आंदोलन
सांगली : शरद पवार गटाच्या आमदाराचे पुत्र भाजपच्या वाटेवर
"जर भ्रष्टाचाऱ्यांना पुरावे देऊन सुद्धा केवळ समज देऊन सोडून देणार असाल, तर मग आमच्या उपराष्ट्रपतींना तात्काळ राजीनामा घेऊन त्यांना वनवासात का पाठवलं? धनकड कुठे आहेत. त्यांनी राजीनामा का दिला? कारणच समोर आलेलं नाही. मी दिल्लीत गेलो तेव्हा धनकड हे सरकारविरोधात काहीतरी कारस्थान करत असतील किंवा होते हा संशय आला म्हणून त्यांना तडकाफडकी काढलं आणि गायब केलं. मग धनखड यांना का समज दिली नाही?" असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत राज्यातील भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे.
हे रमी मंत्री, हे क्रीडामंत्री कुठं आहेत- उद्धव ठाकरे
एक गोष्ट विचित्र किंवा चांगली पाहायeला मिळाली, अभ्यास कोणताही असो, तुमची आवड कोणतीही असो, तुम्हाला सत्ता टिकवण्यासाठी कोणतंतरी मंत्रीपद द्यावं लागतं. पहिल्यांदा असं झालं की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं. कोण? रमी मंत्री. हे रमी मंत्री आहेत. क्रीडामंत्री कुठं आहेत. शेतकऱ्यांची चेष्ठा करतात. शेतकऱ्यांची थट्टा करतात. भर सभागृहात रमी खेळता? शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत.- उद्धव ठाकरे</p>
परळी वैद्यनाथ मंदिरात श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी
बीडच्या परळीतील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे स्थान असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आज, श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी, मोठ्या उत्साहात भाविकांनी गर्दी केली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात वैद्यनाथाच्या गजराने भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. आज श्रावणी सोमवार निमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर केली.
स्पर्श दर्शनाचे महत्त्व असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच महाराष्ट्राबाहेरूनही हजारो भाविक दर्शनासाठी परळीत दाखल झाले आहेत. फुलांची सजावट, विद्युत रोषणाई आणि विशेष आरास यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघालाय. श्रावण महिन्यातील सोमवारी वैजनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या नेहमीच जास्त असते. आजही भाविकांच्या रांगा पाहायला मिळाल्यात. मंदिर परिसर भावीकांमुळे गजबजुन गेलेला दिसून आलाय
भरत गोगावलेंना रायगडचे पालकमंत्री करा; युवा सेना पदाधिकाऱ्यांची रक्ताने पत्र लिहून मागणी
कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री करा. या मागणीसाठी रक्ताने पत्र लिहीत उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना सोलापूर युवासेना पदाधिकाऱ्यांची विनंती केली आहे.
सोलापूर शहर सचिव तथा भरत गोगावले युवा प्रतिष्ठानचे समर्थ बिराजदार यांनी स्वतःच्या रक्ताने एकनाथ शिंदे यांना पत्र लिहत विनंती केलीय. अन्यथा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ता स्वतःच्या रक्ताने पत्र लिहितील. एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहत शिवसेना वाढवण्याचे काम भरत गोगावले यांनी काम केलंय. त्यामुळे त्यांना रायगडचे पालकमंत्री बनवून न्याय द्यावा. अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशादर्शक बत्तीजवळील व्यंकट बुरुजाची खालची बाजू ढासळली
विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशादर्शक बत्तीजवळ असणाऱ्या व्यंकट बुरुजाची समुद्रातील खालची बाजू लाटांच्या माराने ढासळली आहे. त्यामुळे किल्ल्याची तटबंदी ढासळण्याची मालिका चालूच असल्याचे दिसून येत आहे. पाऊस आणि लाटांचा मारा तीव्र असल्याने पावसाळ्यात विजयदुर्ग किल्ल्याची पडझड होत असते. पावसाळ्यात समुद्राला उधाण येत असल्याने लाटांचा वेग या दरम्यान वाढत असतो. अशातच किल्ल्यातील दिशादर्शक बत्तीजवळच्या व्यंकट बुरुजाची समुद्राकडील खालची बाजू ढासळली आहे.
"देशाचे उपराष्ट्रपती २० दिवसांपासून बेपत्ता", ठाकरे गटाचा मोदी सरकारवर संशय; म्हणाले, "धनखड यांना बंदिवान…"
निवडणुक आयोगावर आरोप करणाऱ्या विरोधकांवर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. यावर संजय राऊतांनी फडणवीस यांना खडे बोल सुनावले आहेत. "देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यानी निवडणूक आयोगाचं प्रवक्तेपद स्वीकारलं असेल तर त्यांनी सांगावं. देशातील संपूर्ण विरोधी पक्षाला वाटत आहे की आपली फसवणूक झाली आहे, तो विरोधी पक्ष एकवटला आहे आणि त्याची निवडणूक आयोगाशी लढाई आहे. जे निवडणूक आयोगाचे लाभार्थी आहेत त्याच्यापैकी एक देवेंद्र फडणवीस आहेत. निवडणूक आयोगाच्या दरोड्यातील देवेंद्र फडणवीस लाभार्थी आहेत. तेव्हा दरोड्यातील लाभार्थी फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची बाजू घेतल्याचे आश्चर्य वाटचा कामा नये. कारण त्याच्याकडे चोरीचा माल आहे. चोराने गप्प राहिले पाहिजे," असे संजय राऊत म्हणाले.