Maharashtra Monsoon Session 2025 Highlights: महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन सुरू असून आज विधीमंडळात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच अशी भूमिका स्पष्ट केली आहे, यावरून रायकीय वर्तुळातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. यासह सर्व सामाजिक, राजकीय व स्थानिक बातम्यांच्या आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

Live Updates

Latest Maharashtra News Live Today : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी येथे वाचा एका क्लिकवर...

19:45 (IST) 17 Jul 2025

पेण जवळ नदीत उतरून गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन; आंदोलनात शेकडो ग्रामस्थांचा सहभाग

मुंबई - गोवा महामार्गापासून दुरशेत गावाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी तसेच इतर मागण्यांसाठी आज पेण तालुक्यातील दुरशेत गावातील ग्रामस्थांनी नदीत उतरून जलसमाधी आंदोलन केले. ...सविस्तर बातमी
19:15 (IST) 17 Jul 2025

बिऱ्हाड मोर्चाचे शिष्टमंडळ राज ठाकरे यांच्या दारी; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन

शिष्टमंडळाशी राज ठाकरे यांनी सविस्तर चर्चा केली. त्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या. दोन दिवसांत मुख्यमंत्री तसेच संबंधित मंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. ...वाचा सविस्तर
19:13 (IST) 17 Jul 2025

भुमरेंच्या वाहनचालकाच्या हिबानामातील अनागोंदी मागे मंत्र्यांचा दूरध्वनीचा आरोप

केवळ एवढेच नाही, फेरफार नोंदवताना केवळ ५०० रुपयांच्या मुद्रांकाच्या आधारे झालेला हा व्यवहार तातडीने व्हावा म्हणून दबावासाठी एका मंत्र्याचा दूरध्वनी आला असल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीमध्ये केला. ...अधिक वाचा
19:03 (IST) 17 Jul 2025

हनीट्रॅप प्रकरणी विधिमंडळात नाशिकचा उल्लेख, आणि…

हनीट्रॅपचा उल्लेख करुन विरोधकांनी गुरुवारी अधिवेशन गाजविले. प्रामुख्याने काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादीचे (शरद पवार) जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. ...सविस्तर वाचा
18:59 (IST) 17 Jul 2025

अण्णा भाऊंच्या साहित्याचे आणखी तीन खंड सज्ज

त्यांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...सविस्तर बातमी
17:59 (IST) 17 Jul 2025

काँग्रेसजनांचा असाही मुहूर्त…जनसुरक्षा विधेयकाविरोधात आंदोलन अन् निवडणुकीसाठी परिचयपत्र भरण्याचा कार्यक्रम

जनसुरक्षा विधेयक रद्द करावे, या मागणीसाठी गुरुवारी शहर काँग्रेस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर शहराध्यक्ष आकाश छाजेड, ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ...वाचा सविस्तर
17:17 (IST) 17 Jul 2025

उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; कारण कायय़

शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेतेपदावर चर्चा करण्यासाठी ही भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.

15:28 (IST) 17 Jul 2025

भाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर पनवेलच्या मालमत्ता करावरील शास्ती माफीची अभय योजना लागू

भाजपच्या आंदोलनाला आलेल्या तातडीच्या यशानंतर आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन चार टप्यात होणा-या शास्ती माफीच्या अभय योजनेची माहिती दिली. ...सविस्तर वाचा
15:15 (IST) 17 Jul 2025

भाजपकडून ‘पुरंदर’मध्ये अजित पवार, एकनाथ शिंदे यांना शह

जगताप यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सासवड येथे शक्तिप्रदर्शन करत भाजपमध्ये प्रवेश केला. ...सविस्तर बातमी
15:14 (IST) 17 Jul 2025

नवी मुंबईला आता 'सुपर स्वच्छ लीग'मध्ये मानांकन

नवी मुंबईने आता स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये मानांकन प्राप्त करीत आपली विजयपताका अक्षय फडकत ठेवली आहे. ...सविस्तर वाचा
15:05 (IST) 17 Jul 2025

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शिवराय शौर्यगाथेसाठी पोवाडा उपक्रम

या कार्यक्रमात नाशिकमधील ज्येष्ठ शिवचरित्र लेखक तथा व्याख्याते सोपान वाटपाडे आणि डॉ. चंद्रशेखर पेठे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. ...अधिक वाचा
14:59 (IST) 17 Jul 2025

Eknath Shinde : "डिनोने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा 'मोरया' होईल", एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ...वाचा सविस्तर
14:09 (IST) 17 Jul 2025
ऑनलाईन जुगाराच्या आहारी जाऊन दोन तरुणांची आत्महत्या; नाना पटोलेंची सरकारकडे लक्ष देण्याची मागणी

"ऑनलाईन रमीसारख्या जुगाराच्या आहारी जाऊन काल दोन तरुणांनी आत्महत्या केली. ही केवळ दुःखद घटना नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक गंभीर इशारा आहे. ऑनलाईन रमीचे वेड दिवसेंदिवस वाढत असून, अनेक तरुण या आभासी जुगाराच्या विळख्यात अडकत चालले आहेत. त्यांच्या आयुष्याची वाटचाल बरबादीकडे सुरू झाली आहे. कालची घटना ही केवळ वैयक्तिक हानी नाही, तर राज्याच्या भविष्यासाठीही धोक्याची घंटा आहे. याकडे शासनाने आता गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत गरज आहे," अशी पोस्ट काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी एक्सवर केली आहे. याबरोबरच त्यांनी विधिमंडळातील व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

14:05 (IST) 17 Jul 2025

जळगाव महापालिकेसाठी भाजपचा निर्धार, अजित पवार आणि शिंदे गटाला धडकी

यंदा महापालिकेवर कोणत्याही परिस्थितीत स्पष्ट बहुमत मिळविण्यासाठी पक्ष सज्ज झाल्याचे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. ...वाचा सविस्तर
13:46 (IST) 17 Jul 2025

धुळ्यात लाॅजिस्टिक केंद्र उभारणीसाठी हालचाली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

यासाठी तांत्रिक,आर्थिक आणि लॉजिस्टिक दृष्टीने व्यवहार्यता तपासावी, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केंद्र उभारण्याच्या कार्यवाहीस गती देण्यासंदर्भात ही बैठक घेण्यात आली. ...सविस्तर बातमी
13:37 (IST) 17 Jul 2025

पिक विम्याच्या निकषांमुळे पंतप्रधान पिक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ

पंतप्रधान पिक विमा योजनेकडे राज्यातील तसेच देशातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात देखील हीच परिस्थिती असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी दहा ते पंधरा टक्केच शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीनंतरही विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई वेळेत मिळत नाही. एक रुपयातील पिक विमा योजना बंद करून नवीन सुधारित पीक विम्यात अनेक निकष असल्याने अनेक शेतकरी पिक विम्याकडे पाठ फिरवत आहेत.

13:03 (IST) 17 Jul 2025

परिचारीकांचा राज्यव्यापी संप; संपात शासकीय रुग्णालयातील परिचारीकांचा समावेश

आज महाराष्ट्र राज्यात शासकीय परिचारीकांचा राज्यव्यापी संप पुकारला असून, यात नांदेड जिल्ह्यातील परिचारीकांचा सहभागी झाल्या आहेत. यात त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे असून, यात केंद्र सरकार प्रमाणे नर्सिंग भत्ता देण्यात यावा, धुलाई भत्ता वाढवून देण्यात यावा, आमच्या पदनामात बद्दल करण्यात यावा, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतनात वाढ करण्यात यावी, कंत्राटी करण बंद करण्यात यावे, 100 टक्के पदभर्ती करण्यात यावी, जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, पद्दोन्नती करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आज नांदेड जिल्हा समान्य रूग्णालयासमोर महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारिका संघ नांदेड यांच्याकडून राज्यव्यापी संपात सहभागी होत आंदोलन करण्यात आले.

11:46 (IST) 17 Jul 2025

जळगावात सफाई कंत्राटाचे भिजत घोंगडे; अस्वच्छतेची समस्या आणखी तीव्र

महानगरपालिकेने नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला २०१८ मध्ये शहरातील सफाईचे कंत्राट पाच वर्षांसाठी दिले होते. ...अधिक वाचा
11:01 (IST) 17 Jul 2025

संजय राऊतांनी पोस्ट केला उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत लवकरत प्रसिद्ध केली जाणार आहे. यापूर्वूा या मुलाखतीचा जवळपास दोन मिनिटांचा टीझर संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ही मुलाखत १९ आणि २० जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.

10:52 (IST) 17 Jul 2025

उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शेजारी बसणं टाळलं? राऊतांचे रोखठोक विधान; म्हणाले, "मग काय शिंदेंना..."

विधानभवनात काल अंबादास दानवेंच्या निरोप समारंभात उद्धव ठाकरेंनी एकानाथ शिंदेंच्या शेजारी बसणं टाळलं याबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले की, "मग काय शिंदेंना मांडीवर घेऊन बसायला पाहिजे होतं का? उद्धव ठाकरे हे एक स्वाभिमान नेते आहेत. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली... ज्यांनी डुप्लिकेट शिवसेना स्थापन केली... जसे पेशवे काळात सदाशीवभाऊ डुप्लिकेट होते , ते पेशवाईत आले. तसंच हे आहे, हे सगळे तोतये आहेत. त्यांच्याबरोबर काय हस्तांदोलन करायचं? महाराष्ट्राला ते आवडलं नसतं,"