Marathi News Live, 19 June 2025 : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच्या माध्यमातून भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जातोय. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी अन्य भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यासाठी किमान २० विद्यार्थ्यांची अट घालून शिक्षण विभागाने अप्रत्यक्षरित्या हिंदीला तृतीय भाषा जाहीर केले आहे. यानंतर राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यादरम्यान राज्यातील पावसाच्या आणि हवामानाच्या स्थितीचा आढावा आपण घेणार आहोत. तसेच आज शिवसेनेचा वर्धापन दिन असल्याने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. याकडेही आपले लक्ष असणार आहे.

Live Updates

Mumbai Maharashtra Breaking News Live Today : महाराष्ट्रातील सर्व राजकीय आणि हवामानासंबंधी सर्व घडामोडी वाचा एका क्लिकवर

21:03 (IST) 19 Jun 2025

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी दिले राज ठाकरेंशी युतीचे संकेत; म्हणाले, "मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून..."

Uddhav Thackeray Alliance with MNS: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही? याच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा झडत आहेत. आज वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा यावर भाष्य केले. ...अधिक वाचा
17:57 (IST) 19 Jun 2025

Maharashtra News Live Updates: 'अघोरी विद्या नाही तर साधू महाराजांचा आशीर्वाद घेतला', भरत गोगावलेंचं स्पष्टीकरण

मी बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना माननारा मी कार्यकर्ता आहे. अघोरी विद्या मला कळत नाही. अघोरी विद्या करून पालकमंत्रीपद मिळवायचं असतं, तर कधीच मिळवलं असतं. पण घरी कधी कधी साधू महाराज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येतात किंवा त्यांचं काही काम असतं. मी कधी कधी घरी टॉवेलवरच बसून लोकांच्या समस्या सोडवत असतो, असे स्पष्टीकरण भरत गोगावले यांनी दिले.

16:41 (IST) 19 Jun 2025

पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवावर सोलापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सोलापुरातील हिंदू स्मशानभूमीमध्ये पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी मारुती चितमपल्ली यांना पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. चितमपल्ली यांच्या अंत्यविधीसाठी सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली होती.

16:07 (IST) 19 Jun 2025

पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस सज्ज; १६२४ पोलीस कर्मचारी, ११८७ होमगार्ड तैनात

गिल म्हणाले, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा रविवारी (२२ जून) उरुळीकांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायगांव फाटा येथे प्रवेश होणार आहे. ...वाचा सविस्तर
15:36 (IST) 19 Jun 2025

संदीप माळवी यांच्याकडे एसआरएचा प्रभारी पदभार; मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या बदलीमुळे पद होते रिक्त

प्रभारी पदभार संदीप माळवी यांनी गुरुवारी स्विकारत या विभागातील कामांचा आढावा घेतला. ...सविस्तर वाचा
15:18 (IST) 19 Jun 2025

रेशनचे धान्य विक्री केले… आता पुरवठा विभागाकडून रेशन कार्डच रद्द…

नागपूरसह राज्यातील काही भागात रेशनचे धान्य लोकांकडून विकत घेऊन ते खुल्या बाजारात विकणारे धान्य तस्कर सक्रीय आहे. ...सविस्तर वाचा
15:06 (IST) 19 Jun 2025

मान्सूनमध्ये बेडूक आणि सरड्याचे विरोधाभासी वर्तन

पावसाळ्यात वातावरण थंड व दमट असल्याने सरड्यांची हालचाल कमी होते. थंड हवामान त्याच्या शरीरासाठी कमी उर्जायुक्त असते. ...सविस्तर वाचा
14:53 (IST) 19 Jun 2025

पुणे : पावसामुळे झाड पडून विद्यार्थीनी जखमी

अग्निशमन विभागाच्या जवानांनी तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ...वाचा सविस्तर
14:47 (IST) 19 Jun 2025

वन अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील ‘घोडेबाजार’ थांबवा, वन्यजीव प्रेमींचे मुख्यमंत्र्यांना साकडे

मागील आठवड्यामध्ये वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापनेचे आदेश वन विभागामार्फत काढण्यात आलेले आहेत. ...सविस्तर वाचा
14:21 (IST) 19 Jun 2025

जगातील पहिल्या १००० विद्यापीठांत पुण्यातील दोन विद्यापीठांना स्थान

क्यूएस क्रमवारी जागतिक स्तरावर महत्त्वाची मानली जाते. जगभरातील १५००हून अधिक विद्यापीठांचा २०२६च्या क्रमवारीत समावेश आहे. ...सविस्तर वाचा
14:13 (IST) 19 Jun 2025

"यांचा कसला वर्धापन दिन?", नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमीत्ताने भाजपाचे नेते नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राणे म्हणाले की, "मी मान्य करतो बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख यांच्यामुळेच मी मोठा झालो. मला हे दिवस दिसले. त्यामुळे बाळासाहेब हेच माझे गुरू आणि सर्वस्व आहेत."

पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले की, "ओरिजनल शिवसेना कायदेशीर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे. त्यामुळे त्यांची (उद्धव ठाकरे) शिवसेना राहिलेली नाही. त्यांचं दुकान बंद. बाळासाहेब कट्टर हिंदुत्ववादी होते. त्यांनी कधी पदासाठी आणि पैशांसाठी तडजोड केली नाही. यांनी पदासाठी तडजोड केली. यांनी बाळासाहेबांची विचारधारा यांनी सांभाळली नाही, आजही सांभाळत नाहीत. शिवसेना तर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे. त्यामुळे यांचा कसला वर्धापन दिन? मी उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो, वर्धापन दिनानिमीत्त शुभेच्छा देतो," असे नारायण राणे म्हणाले आहेत.

13:42 (IST) 19 Jun 2025

वर्धा: निमित्त दुभाजकाचे, इशारा आमदार सुमित वानखेडेंना; आमदार केचेंची आगेकूच…

आर्वी तळेगाव रस्त्यावरील दुभाजक संघर्ष निमित्त ठरले. केचे यांनी हवी असलेली रुंदी मान्य करून घेतली. ...अधिक वाचा
13:34 (IST) 19 Jun 2025

धक्कादायक! विहिरीला लटकवत ठेवला मृतदेह, हत्या करून आत्महत्येचा बनाव…

बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील निरोळा येथील अंकुश श्रीराम सुरडकर (३२) या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ...वाचा सविस्तर
13:32 (IST) 19 Jun 2025

हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही - अरविंद सावंत

"हिंदीची कसल्याही प्रकराची सक्ती आम्हाला मान्य नाही. आम्ही देखील शिक्षण घेतलं आहे. आम्ही तर मातृभाषेत शिक्षण घेतलं आहे. मातृभाषेत दर शिक्षण घेतलं नाही तर आई आणि माती या दोन्हीबरोबरचं नातं बिघडून जातं, असे मत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी व्यक्त केले.

13:25 (IST) 19 Jun 2025

Video: हिंजवडी परिसरातील जोरदार पावसामुळे आयटी पार्कमधील रस्ते पुन्हा पाण्यात! वर्क फ्रॉम होमची आयटीयन्सची मागणी

शासकीय यंत्रणांकडून गेल्या आठवड्यापासून विविध उपयोजना सुरू असूनही प्रत्यक्षात आयटी पार्कमधील स्थिती ‘जैसे थे’ आहे. ...सविस्तर वाचा
13:13 (IST) 19 Jun 2025

अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू; डोंबिवली शिव मंदिर येथे रोशनीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

- अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेत झालेल्या अपघातात डोंबिवलीची रोशनी सोनघरे हिचा मृतदेह आज तिच्या नातेवाईकांना सुपूर्त करण्यात आला.

- डोंबिवली शिव मंदिर येथे तिच्या पार्थिवाला अग्नि देण्यात आली .

- त्यावेळेस तिचे नातेवाईक, त्याचप्रमाणे एअर इंडिया टाटा समूहाचे काही कर्मचारी, राजकीय पक्षाचे लोक आणि डोंबिवलीकर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

13:06 (IST) 19 Jun 2025

Khadakwasla Dam News: सावधान! जाधववाडी तलावातून अनियंत्रित विसर्गाची शक्यता; खडकवासला धरणातूनही दुपारी विसर्ग

जाधववाडी हा द्वारविरहीत तलाव ९५ टक्क्यांपर्यंत भरला असून सद्यस्थितीचा पाऊस आणि धरणातील येवा वाढल्यामुळे सुधा नदी (इंद्रायणी नदी) पात्रात कोणत्याही क्षणी जाधववाडी तलावातून अनियंत्रित विसर्ग चालू होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ...सविस्तर वाचा
12:54 (IST) 19 Jun 2025

सुकेशिनी तेलगोटेंनी निविदा न काढता ६५ लाखांचे कंत्राट दिले, अहवालात सत्य उघड

भंडारा येथे २०२१-२२ मध्ये सुकेशिनी तेलगोटे सहाय्यक आयुक्त असताना शासकीय वसतिगृहांसाठीच्या क्रीडांगण विकास योजनेत गैरप्रकार झाल्याची तक्रार रवींद्र कोटंबकर यांनी प्रादेशिक उपायुक्तांकडे २८ एप्रिल २०२५ रोजी केली होती. ...सविस्तर वाचा
12:42 (IST) 19 Jun 2025

बहुसदस्यीय प्रभाग पद्धती सत्ताधाऱ्यांच्या फायद्याची

पूर्वी वॉर्ड निहाय महापालिका निवडणुका होत असत. एक- दोन वस्त्यांचा एक वॉर्ड आणि त्यातील मर्यादित मतदार संख्या लक्षात घेता उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचणे शक्य होत असे. ...वाचा सविस्तर
12:33 (IST) 19 Jun 2025

पुणे : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

पुणे शहराला पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे धरण साठ्यांत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून दुपारी १ वाजता दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडणार आहे. यामुळे नदी पात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

12:31 (IST) 19 Jun 2025

पालखी सोहळ्यासाठी 'टॉयलेट सेवा' मोबाईल ॲप

तंत्रज्ञान आधारीत या ॲपच्या माध्यमातून वारी मार्गावरील फिरती शौचालये आणि त्यांची स्वच्छता यांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे. ...सविस्तर बातमी
12:28 (IST) 19 Jun 2025

मुंबई- नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

- गोंदे फाटा येथे वाहतूक कोंडी

- एक ते दीड किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा

- महामार्ग पोलिस केंद्र घोटी चे कर्मचारी दाखल वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

11:52 (IST) 19 Jun 2025

Kera Keralam Coconut: कोकणात नारळ उत्पादन वाढणार; 'केरा केरलम' वाणाची केंद्राची शिफारस

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे झालेल्या समितीच्या कार्यशाळेत ही शिफारस करण्यात आली असून 'केरा केरलम' नारळाचे प्रती माड प्रती वर्ष ११८ फळांचे सरासरी उत्पादन देते. ...वाचा सविस्तर
11:39 (IST) 19 Jun 2025

आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदें यांच्या दोन शिवनेनेचे दोन वर्धापण दिन

शिवसेनेचा आज ५९वा वर्धापन दिन असून शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षानं अनेक स्थित्यंतरं पाहिली आहे. आता तर एका सेनेच्या दोन शिवसेना झालेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आपापला वर्धापन दिन पुन्हा एकदा वेगवेगळा साजरा करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानिमित्ताने आज दोन्ही पक्ष शक्तीप्रदर्शन करतील. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापनदिन वरळी डोम इथं होणार आहे. दोन्ही पक्षांचे नेते भाषणांमधून महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकतील. यावेळी काही मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे.

11:27 (IST) 19 Jun 2025
भरत गोगावलेंकडून अघोरी पूजा? सूरज चव्हाणांकडून भरत गोगावले यांचा व्हिडीओ पोस्ट

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जातोय. यावेळी महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंचा मांत्रिकासोबतचा आणखी एक व्हिडीओ राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांकडून शेअर करण्यात आला आहे. भरत गोगावलेंचा व्हिडीओ पोस्ट करत सूरज चव्हाण यांनी भरतशेठ आणि अघोरी विद्या म्हणजेच पालकमंत्री का? असा सवाल उपस्थित केला आहे.

11:25 (IST) 19 Jun 2025

शिवसेनेचा वर्धापन दिन आज मुंबई येथे साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाची राजकीय भूमिका मांडणार आहेत. दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "आज या पक्षाचा ५९वा वर्धापन दिन आहे. संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन साजरा होईल. प्रथेप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील आणि शिवसेनेची पुढील राजकीय दिशा याबद्दल महाराष्ट्राल संबोधित करतील," अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

"महाविकास आघाडी ही मजबूतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरायला पाहिजे. आम्ही एकत्रच आहोत, पण एकत्र राहत असताना शिवसेना आपला विचार आणि सत्व गमावणार नाही. मग तो विचार मराठी माणसाचा असेल, हिंदुत्वाचा असेल अन्याविरूद्ध लढण्याचा असेल. शिवसेनेची ताकद विचार प्रणालीत, स्वाभिमानात आहे. शिवसेना कधीही सत्तेसाठी कुणापुढे झुकली नाही, वाकली नाही आणि स्वार्थसाठी तडजोडी केल्या नाहीत. शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही मर्दांचा महासागर आहे," असेही संय राऊत म्हणाले.

Mumbai Maharashtra Breaking News Live Today : महाराष्ट्रातील सर्व राजकीय आणि हवामानासंबंधी सर्व घडामोडी वाचा एका क्लिकवर