Maharashtra Mumbai Breaking News Updates : विधिमंडळाचं अधिवेशनादरम्यानचा कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते अधिवेशनाचे कामकाज सुरू असताना सभागृहात मोबाईलवर कथितपणे पत्ते खेळत असल्याचा दिसत आहे. यावरून कोकाटेंवर मोठ्या प्रमाणात टीका होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यादरम्यान कोकाटे आज अजित पवार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते काय भूमिका मांडतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच कल्याण येथे रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण झाल्या प्रकरणी आरोपीला कल्याण न्यायालयात करणार हजर केले जाणार आहे. तसेच मुंबई-कोकण आणि इतर काही भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासह आपण राज्यातील इतरही राजकीय व सामाजिक महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत.
Mumai Maharashtra Breaking News Live Today - राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.
कर्जमाफीच्या आश्वासनामुळे हजारो कोटींचे पीककर्ज थकले; जाणून घ्या, जिल्हा मध्यवर्ती बँकांवर किती थकीत कर्जांचा डोंगर
गडकरींच्या पत्नी म्हणाल्या, १३ ‘डी.लिट’ मिळाल्या पण, लोकमान्य टिळक पुरस्कारामुळे नितीनजी आता मोदींच्या रांगेत...
नाशिक: फुलेनगरमध्ये घरावर दगडफेक, गोळीबार; काहीजण पोलिसांच्या ताब्यात
जळगावमध्ये चांदी @ एक लाख २० हजार ५१० रूपये
पिंपरीतील १७ पुलांचे संरचनात्मक लेखापरीक्षण; महापालिकेचा निर्णय, शहरात ४६ पूल
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीसाठी स्वतंत्र कंपनी
‘एफआरपी’ची मोडतोड कराल तर याद राखा...कोणी दिला इशारा?
मालेगाव : सुरक्षा उपाय योजनांकडे दुर्लक्षामुळे दोन मजुरांचा मृत्यू
हलक्यात घेऊ नका… जळगावमध्ये शिंदे गटाचा भाजपला इशारा
अंगणवाडी सेविका, बालवाटिका शिक्षकांसाठी महत्त्वाची माहिती… अध्यापन आता अधिक सुलभ होणार!
विधानसभेत ऑनलाइन पत्ते खेळ खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ने बुधवारी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्ते खेळून निदर्शने केली.
माझ्या खात्यातला सगळा कोटा गोपीचंद पडळकर यांच्यासाठी द्यायची माझी तयारी - मंत्री जयकुमार गोरे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विटा मध्ये भाजप कडून कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याला मंत्री जयकुमार गोरे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती होती.
गोपीचंद पडळकर आणि मी जिवा भावाचे मित्र आहोत. आणि माझ्या खात्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्यासाठी बजेटचा विषय नाही. देवेंद्र फडणवीस माझ्या खात्याला जो बजेटचा कोटा देतील, तो सगळा कोटा गोपीचंद पडळकर यांच्यासाठी द्यायची माझी तयारी आहे, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले आहेत . गोपीचंद पडळकर हा सर्वसामान्य व्यक्तीसाठी काम करणारा, व्यथा मांडणारा आणि तो प्रश्न तडीस नेणारा हा बहुजनांचा नेता आहे. एखाद्या प्रश्नासाठी गोपीचंद पडळकर यांच्यावर मुद्द्याने आणि वेळ आली तर गुद्याने देखील लढायची तयारी असते. त्यामुळे असे नेतृत्व आपण वाढवले पाहिजे असे मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.
पृथ्वीच्या अंतापर्यत आमच्या माण खटाव भागात पाणी येणार नाही, असे बारामतीची मंडळी सांगत होते. त्यामुळे आमच्या भागातील माणसे देखील पाणी मागत नव्हते. पण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आमच्या भागात पाणी आले. आज आमच्या तालुक्यात 5 कारखाने उभे आहेत. त्यामुळे ज्या भागात पृथ्वीच्या अंतापर्यत पाणी न येणाऱ्या भागात या निवडणुकीत मी उभे राहिलो आणि दुष्काळ मुक्तीसाठी मी उभा राहिलो आहे, असे जनतेला सांगितले.
Puja Khedkar: पूजा खेडकर यांचे ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र रद्द, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचा निर्णय
सूफी संतांच्या पवित्रस्थळी गडकरींचा भावनिक क्षण… काय घडलं तिथं?
महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मीक कराडचा मुलाचा समावेश - विजयसिंह बांगर यांचा गंभीर आरोप
परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मीक कराड याचा मुलगा श्री कराड याचा देखील सहभाग असल्याचा गंभीर आरोप विजयसिंह बांगर यांनी केला. बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन या क्रूर हत्येचे फोटो बांगर यांनी समोर आणले आहेत. महादेव मुंडे यांच्या अंगावर 15 ते 16 खोलवर जखमा आहेत. यातून अमानुष मारहाण झाल्याचं उघड झाले. वाल्मीक कराडचा मुलगा श्री कराड आणि त्याच्या साथीदाराने आधी रेकी केली. आणि त्यानंतर खून केला. 20 मिनिटे महादेव मुंडे यांना श्री कराड, गोट्या गीते आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली, असा आरोप त्यांनी केला आहे.
धुळे जिल्ह्यात हल्लेखोरांचा हवेत गोळीबार, कारण काय ?
जळगावमध्ये चांदी एक लाख २० हजाराच्या उंबरठ्यावर…
मुंबई पूर्व उपनगरात पावसाला सुरुवात
मुंबई पूर्व उपनगरात पावसाला सुरुवात झाली असून घाटकोपर, विकोळी, काजूर, भांडुप, मुलुंड परिसरात पावसाने हजेरी लावली आहे.
माणिक कोकाटेंच्या रमी प्रकरणानंतर पुण्यातील ग्रामपंचायतीने कॅसिनो क्लब...
डोंबिवली MIDCतील दोन कंपन्यांना भीषण आग! अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
डोंबिवली एमआयडीसीमधील दोन कंपन्यांना मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरोसेल कंपनी आणि विश्वनाथ गारमेंट कंपनीला ही आग लागली असून घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उसळताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
राजकारणातील कडवटपणा देवेंद्र फडणवीसांमुळे कमी ?
मुख्यमंत्र्यांच्या आजच्या पंढरपूर दौऱ्यासाठी स्वागताचे अनोखे पोस्टर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरला स्थानिकांचाविरोध आहे. हाच विरोध दर्शवण्यासाठी संतांच्या अभंगातील ओव्यांचा वापर करून पंढरपुरात पोस्टरबाजी करण्यात आली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात आहेत. या पार्श्वभूमीवर "वतन आमची मिराशी पंढरी..." हा संत नामदेव महाराजांचा अभंग पोस्टरवर छापून देवेंद्रजी आपण पंढरपूरची मूळ रचना व संस्कृती कायम ठेवाल असा विश्वास वाटतो, अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने हे पोस्टर लावले आहेत. फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरमध्ये मंदिर परिसरातील 600 घरांचे भूसंपादन प्रस्तावित आहे. याच भूसंपादनाला आता थेट विरोध करण्यासाठी संत वचनांचा वापर करून फडणवीस यांचे स्वागत अनोख्या पोस्टर मधून केले जाते.
पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस; जळगावमध्ये हतनूरचा विसर्ग वाढला
“राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ज्या नागपूरचे आहेत, तिथेच मुली सुरक्षित नाहीत,” वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
"राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ज्या नागपूरचे आहेत, तिथेच मुली सुरक्षित नाही. काल नागपूरमध्ये मुलींच्या वसतिगृहात शिरून आरोपींनी विनयभंग केला. या वसतिगृहात पुरेशी सुरक्षा नाही, सीसीटिव्ही नाही, कोणाच्या भरवश्यावर मुली इथे राहतील? या मुलींचे मोबाईल चोरले गेले. नागपूरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का ? वसतिगृहातील मुली प्रचंड घाबरल्या असून त्यांना सुरक्षेची हमी कोण देणार? या वसतिगृहात ६४ मुली राहतात, या वसतीगृहाच्या जवळच दारूचे दुकान असल्याने या मुलींना जाता - येता कायमच असुरक्षित वाटते. वसतिगृहात दरवाज्याला साधे लॉक नाही अशा स्थितीत या मुली कशा राहणार?
या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे. राज्यातील मुलींच्या वसतिगृहाची सुरक्षा वाढवली पाहिजे. या वसतिगृहात तात्काळ सीसीटीव्ही बसवले पाहिजे. तसेच राज्यातील सर्व मुलींच्या वसतिगृहात खबरदारी घेतली पाहिजे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या शहरात मुली सुरक्षित नसतील तर इतर ठिकाणी मुलींची काय हालत असेल? या मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने झटकू नये," अशी पोस्ट सोशल मीडियावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.