Maharashtra Mumbai Breaking News : महाराष्ट्रात सध्या सांगलीच्या वाळवा तालुक्यातील हर्षल पाटील नावाच्या ठेकेदाराच्या आत्महत्येचा मुद्दा चर्चेत आला आहे. ठेक्यासाठीची १ कोटी ४० लाखांची रक्कम मिळाली नसल्याचं सांगत हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केली. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगताना दिसत आहेत. दुसरीकडे राज्यात पावसानं पुन्हा जोर धरला असून अनेक भागांत हवामान विभागाकडून रेड, यलो किंवा ऑरेंज अलर्ट देऊन नागरिकांना सतर्क केलं जात आहे.

Live Updates

Mumbai Maharashtra Breaking News Live Today : मुंबईसह महाराष्ट्रभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी!

19:42 (IST) 24 Jul 2025

सावरकरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधी यांना जामीन मंजूर

यावेळी न्यायालयाने त्यांना गुन्हा कबूल आहे काय, अशी विचारणा केल्यावर त्यांनी गुन्हा नाकबूल असल्याचे उत्तर दिले. नंतर त्यांच्या वकिलांनी जामीन मागितला. ...अधिक वाचा
18:46 (IST) 24 Jul 2025

गोमांस विक्रीप्रकरणी थेट मोक्का; राज्यातील पहिली घटना, बदलापुरातील प्रकरणी कारवाई

गोवंश जातीच्या जनावरींची बेकायदेशीरपणे कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात दिले होते. ...वाचा सविस्तर
18:10 (IST) 24 Jul 2025

झिरवळ, खोसकर यांची शिष्टाई असफल; कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या कायम

बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्तीवर आक्षेप घेत आश्रमशाळा कंत्राटी कर्मचारी वर्ग तीन व चार संघटनेने येथील आदिवासी विकास भवनाच्या प्रवेशद्वारावर १५ दिवसांपासून दिलेला ठिय्या गुरूवारीही कायम राहिला. ...सविस्तर वाचा
17:25 (IST) 24 Jul 2025

बच्चू कडूंचा इशारा, ‘हक्क द्या, नाहीतर ‘ट्रेलर’ नंतरचा ‘पिक्चर’ तापदायक असेल’; आंदोलनाचा पुढील अध्याय आता २९ जुलैला…

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मृतिस्थळी गहुली (पुसद) येथे येत्या २९ जुलैला राज्यभरातील शेतकरी नेते चिंतन करणार आणि आंदोलनाची पुढील दिशा अधिक तीव्र ठरणार. ...अधिक वाचा
16:58 (IST) 24 Jul 2025

Manikrao Kokate: राधाकृष्ण विखे पाटलांची मंत्रिमंडळातील सहकारी माणिकराव कोकाटेंबाबत प्रतिक्रिया

रोहित पवारांनी इतरांना सल्ले देण्यापेक्षा त्यांचा पक्ष सांभाळावा. माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत त्यांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या पक्षाचे नेते त्यासंदर्भात निर्णय करतील. माणिकराव कोकाटे हा दिलखुलास माणूस आहे. त्यांच्या मनात काही नसतं. मोकळेपणाने बोलतात. मी त्यांना अनेकदा सल्ला दिलाय. सार्वजनिक जीवनात तुमचं मन जरी साफ असलं, तरी माध्यमांच्या युगात आपण मर्यादेत बोललं पाहिजे. ते सल्ला ऐकतात, पण कधीकधी त्यांचा उत्साह अनावर होतो - राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री

14:49 (IST) 24 Jul 2025

माणिक कोकाटेंना मंत्रिमंडळातून नारळ मिळणार का ? सुनील तटकरे काय म्हणाले...

कोकाटे यांच्या बोलघेवडेपणाने सरकारसमोर अडचणी निर्माण होत असल्याने त्यांना आता एकतर नारळ दिला जाईल किंवा खातेबदल होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...सविस्तर वाचा
14:22 (IST) 24 Jul 2025

Ajit Pawar on Manikrao Kokate: अजित पवारांचे कोकांटेवर कारवाईचे संकेत!

कृषीमंत्र्यांचा व्हिडीओ सभागृहाच्या आतला आहे. अध्यक्षांनी चौकशी सुरू केली आहे. मला माणिकराव कोकाटे अजून प्रत्यक्ष भेटलेले नाहीत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे मांडले आहेत. बहुतेक आमची सोमवारी भेट होईल. नवीन सरकार आल्यानंतर आम्ही सगळ्याच मंत्र्यांना सूचना दिल्या होत्या. आपण राज्यात भान ठेवून बोललं पाहिजे असं सांगितलं होतं. याआधीही कोकाटेंकडून अशी गोष्ट घडली तेव्हाही मी याची दखल घेतली होती. पुन्हा दुसऱ्यांदा घडलं तेव्हाही मी जाणीव करून दिली की इजा झालं, बिजा झालं, आता तिजाची वेळ आणू नका. आता यावेळी ते म्हणतात की मी खेळतच नव्हतो. मी सोमवार किंवा मंगळवारी त्यांच्याशी समोरासमोर बोलेन. त्यानंतर मी निर्णय घेईन - अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

12:17 (IST) 24 Jul 2025

SC on 7/11 Mumbai Train Blast: आरोपींना निर्दोष सोडण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती; आरोपी मात्र तुरुंगाबाहेरच राहणार

2006 Mumbai Local Train Blast 12 Accused Acquittal : मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ आरोपींची निर्दोष सुटका करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती. ...वाचा सविस्तर
12:03 (IST) 24 Jul 2025

रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून भाजपा माजी आमदार विनय नातू व पालकमंत्री उदय सामंत यांच्यात वाद

रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा नियोजन समिती मार्फत दोन तालुक्यातील काढलेल्या कामामध्ये अनियमितता असल्याने याला जबाबदार असणा-या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केली आहे. ...वाचा सविस्तर
11:54 (IST) 24 Jul 2025

हनी ट्रॅप प्रकरण; प्रफुल्ल लोढाला अडकविण्यात मोठ्या साहेबांचा हात…

प्रफुल्ल लोढाच्या मुलाने वडिलांवरील आरोप फेटाळून लावतानाच त्यांच्या विरोधात षडयंत्र रचण्यात खडसे आणि मोठ्या साहेबांचा हात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. ...वाचा सविस्तर
11:46 (IST) 24 Jul 2025

Harshal Patil Suicide: सरकारकडे ८९ हजार कोटींची देयके प्रलंबित, कंत्राटदार महासंघाचा दावा

या विभागातल्या जवळपास ८९ हजार कोटींची देयके शासनाकडे प्रलंबित आहेत. गेल्या वर्षभरापासून ही देयके प्रलंबित आहेत. पण शासन याकडे लक्ष देत नाहीये. आम्ही पाठपुरावा केला, पण वर्षभरात फक्त ३ टक्के रक्कम दिली आहे. आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे बैठकीसाठीही ४ ते ५ वेळा वेळ मागितली होती. पण ती वेळही दिली जात नाहीये.

मिलिंद भोसले, अध्यक्ष, कंत्राटदार महासंघ

11:29 (IST) 24 Jul 2025

Kalyan Hospital Receptionist Beaten Up: कल्यण रूग्णालय मारहाण प्रकरणातील पीडित तरुणीनं संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

संध्याकाळी ६.३० वाजता डॉक्टर क्लिनिकला आले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की पेशंट थांबवा. मी माझं कर्तव्य पार पाडलं. आरोपी वारंवार आत जाण्याचा प्रयत्न करत होता. मी त्यांना थांबायला सांगितलं. पण तो आत-बाहेर करत होता. डॉक्टरांबाबतही उद्धटपणे बोलला. तेव्हा तो मला शिव्या देत बाहेर गेला. मी त्याला बोलत असताना तो पळत आत आला आणि त्यानं माझ्या मानेवर लाथ मारली. मला राग आला. मी उठून त्याच्या वहिनीकडे गेली. तिला कानाखाली मारली आणि विचारलं की तुम्ही बघत काय बसलायत? तुम्ही त्याला बोललं पाहिजे. त्याचा राग येऊन तो परत आत आला आणि मला छातीवर लाथ मारली. मग माझे केस धरून फरपटत मला दरवाज्यापर्यंत नेलं. मारहाण केली. इतर पेशंट नसते, तर कदाचित माझ्या जिवाचं काही बरंवाईट झालं असतं - कल्याण रुग्णालय मारहाण प्रकरणातील पीडिता

11:13 (IST) 24 Jul 2025

Honey Trap: हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या मंत्र्यांना बाहेर काढण्याची तुमची हिंमत नाही - संजय राऊत

कोकाटेंसारख्या मंत्र्यांना आणि हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या मंत्र्यांना काढण्याची हिंमत तुमच्यात नाहीये. तुम्ही रोज धमक्या कुणाला देताय? हे प्रकार मुख्यमंत्र्यांनी थांबवायला हवेत इतकंच मी त्यांना सांगेन.देवेंद्र फडणवीसांचं गृहखातं सरकारविरोधात बोलणाऱ्यांना अडकवण्यासाठीच आहे. त्या नर्तिकेवर गोळीबार केलेला आमदाराचा भाऊ अद्याप सापडलेला नाहीये. गुन्हे दाखल करून सोडून दिलं आहे - संजय राऊत</p>

11:12 (IST) 24 Jul 2025

Harshal Patil Suicide: सरकारकडे पैसे नसतील तर कामं काढता कशाला? - संजय राऊतांचा सवाल

सरकारकडे पैसे नसतील, तर कामं काढताय कशाला? मंत्र्यांना पैसे खाण्यासाठी? सगळे मंत्री कमिशनखोर आहेत. चार मंत्री हनीट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. देवेंद्र फडणवीसांकडे सगळे पुरावे आहेत. तरी हे महाशय गप्प का बसलेत? फक्त चेहऱ्यावर खोटं हास्य घेऊन भाषणं कर फिरतायत - संजय राऊत</p>

11:11 (IST) 24 Jul 2025

Harshal Patil Suicide: सरकारकडे १ कोटी ४० लाख नाहीत का? - संजय राऊतांचा सवाल

जलजीवन मिशनमध्ये केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत का मिळू शकले नाहीत? त्याला जे अधिकारी, मंत्री जबाबदार आहेत, त्यांच्यावर हे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहेत का? सरकारच्या खात्यात १ कोटी ४० लाख सरकारकडे नाहीत का? ठेकेदारांची ८० हजार कोटींची बिलं थकली आहेत. काल तरुण हर्षल पाटीलनं आत्महत्या केली. तरीही सरकारमधले हे दोन-तीन लोक मौजमजा करत फिरतायत. हर्षल पाटीलची आत्महत्या नसून सरकारने केलेला खून आहे - संजय राऊत</p>

11:11 (IST) 24 Jul 2025

Harshal Patil Suicide: हर्षल पाटीलची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध - संजय राऊत

राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे डेप्युटी कोणत्या जगात वावरतायत? फडणवीसांचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. पंतप्रधानांनी महाराष्ट्रात दोन दिवस येऊन राहावं. गेल्या ५ महिन्यांत शेतकरी व तरुण उद्योजकांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्या कुटुंबाला बोलवावं आणि या राज्याचं फडणवीस व त्यांच्या दोन डेप्युटींनी कसं स्मशान केलंय, हे समजून घ्यावं. हर्षल पाटीलची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे - संजय राऊत, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते

heavy rainfall Maharashtra, Mumbai rain forecast, Konkan monsoon alert, Vidarbha heavy rain warning, Thane flood risk, Palghar weather update, Maharashtra rain report, monsoon rain alert India, heavy rain and wind forecast,

कोकणात गुरुवारी अतिवृष्टीचा, तर मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा (प्रातिनिधिक छायाचित्र)

Mumbai Maharashtra Breaking News Live Today : वाचा राज्यभरातल्या घडामोडी एकाच ठिकाणी!