Maharashtra News Today, 12 September 2025 : मुंबईत मातोश्री या शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पक्षाच्या आमदार व मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबरच्या संभाव्य युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे व राज ठाकरे) सातत्याने भेटी होत असताना आज नाशिकमध्ये शिवसेना (उबाठा) व मनसेने संयुक्त मोर्चाची हाक दिली आहे. नाशिकमधील नागरी समस्यांविरोधात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरणार आहेत.
भारतीय जनता पार्टीने येत्या मंगळवारी मुंबईत विजय संकल्प मेळावा आयोजित केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून आगामी महानगरपालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी केली जाणार आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासंबंधित राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की कायद्याच्या चौकटीत हा शासन निर्णय जारी करण्यात आला असून ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांना जातप्रमाणपत्र मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला, “हा शासन निर्णय सरकारने बदलला तर एकाही नेत्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले, “आपल्या देशात लोकशाही आहे, जरांगेशाही नाही. जरांगेशाही येणं अशक्य आहे.”
Latest Marathi News Live Today : राज्यासह देशभरातील बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.
पुढे जाण्यास जागा न दिल्याचा राग … गाडी थांबवून शिवनेरी बसचे रिमोट पळवले
अकृषिक कर रद्द होणार; कोळीवाड्यांचे सीमांकनाची विकास आराखड्यात ६० दिवसांत नोंद करण्याचे आशिष शेलार यांचे निर्देश
सोन्याच्या किमतीबाबत महत्त्वाचा अहवाल प्रसिद्ध; चांदीकडेही दुर्लक्ष करू नका
ठाकरे गट-मनसे संयुक्त मोर्चातून सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध
नालासोपाऱ्याच्या आचोळे तलावाची सुरक्षा वाऱ्यावर
नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले, त्याचे उत्तर नाशिकमध्ये…संजय राऊत नेमके काय म्हणाले ?
परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पट मांडणीला सुरुवात
परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पट मांडणीला सुरुवात
"त्यांना नेपाळ, नागालँडला सोडा", मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर संताप
लातूर जिल्ह्यातील वांगदरी गावातील भरत कराड (३५) या तरुणाने ओबीसी आरक्षण संपणार असल्याची व्यथा मांडत मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान, आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी वांगदरी या गावी जाऊन भरत कराड यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं. यावेळी त्यांनी ओबीसी समुदायातील तरुणांना टोकाचं पाऊल न उचलण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, "आधी आम्ही संपू, नंतर तुम्ही काय करायचे ते करा". तसेच, आता आरक्षणाच्या लढाईसाठी बलिदान देण्याची वेळ आल्याचीही टिप्पणी त्यांनी यावेळी केली. "आमचं आरक्षण हिरावलं जात आहे, कोणीही आमच्या आरक्षणाव अतिक्रमण करू नका", अशा इशाराही भुजबळांनी लातूरमधून दिला.
दरम्यान, यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील म्हणाले, "आम्ही ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण केलेलं नाही. काही गोष्टी भुजबळ्यांच्या लक्षात येत नाहीतेय. ते विसरभोळे झाले आहेत. ते अंधश्रद्धा बाळगू लागले आहेत. त्यांना नेपाळ किंवा नागालँडला सोडायला हवं."