Maharashtra Breaking News Live: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. मराठा आरक्षणापासून ते राज ठाकरे व उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येण्यापर्यंत अनेक घडामोडींची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर आज दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रात होणाऱ्या पाच मेळाव्यांकडे आणि प्रमुख नेत्यांच्या भाषणांकडे सगळ्यांचं लक्ष असेल. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, एकनाथ शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांचे मेळावे असतील.

यात नेमक्या काय भूमिका मांडल्या जाणार? यावर पुढील काही दिवसांमधील राज्यातील राजकीय घडामोडी अवलंबून असतील.

Live Updates

Dasara Melava 2025 Maharashtra LIVE, 02 October 2025: महाराष्ट्रात आज पाच दसरा मेळावे, प्रमुख नेत्यांच्या भूमिकांकडे लक्ष!

14:17 (IST) 2 Oct 2025

संघाच्या शताब्दी उत्सवाला ॲड. सातपुते प्रमुख पाहुणे; कुणबी समाजातून विरोध; उपस्थित राहू नये : पदाधिकारी, नेत्यांचा दबाव

राज्यात मराठ्यांच्या कुणबीकरणाला सकल ओबीसी समाजाने तीव्र विरोध दर्शवला आहे. १० ऑक्टोबरला नागपुरात सकल ओबीसींचा मोर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. सातपुते यांनी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असा मतप्रवाह कुणबी समाजात आहे. ...सविस्तर वाचा
14:06 (IST) 2 Oct 2025

नक्षलवादाच्या कठोर कारवाईवर सरसंघचालक काय म्हणाले?, सरकार आणि प्रशासनाने आता…

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मार्गदर्शन करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नक्षलवादावर झालेल्या कठोर कारवाईवर महत्त्वाचे विधान केलेले आहे. तसेच सरकार आणि प्रशासनालाही आव्हान केलेले आहे. ...वाचा सविस्तर
13:54 (IST) 2 Oct 2025

Pankaja Munde Bhaktigad Dasara Melawa: भक्तीगडावरून धनंजय मुंडेंची शेरोशायरी

हर मुश्किल को हसते हसते

झेलते है हम

अँधियों में भी चिराग जला कर

चलते है हम...

13:53 (IST) 2 Oct 2025

Pankaja Munde Bhaktigad Dasara Melawa: भक्तीगडावरून धनंजय मुंडेंची शेरोशायरी

आग तो लगी थी घर में

दोस्त ने आके पूछा

घर में आग लगी है तो बचा क्या है

मैंने दोस्त से कहा, मैं बचा हूँ

तो दोस्त ने कहा

अगर तू बचा है, तो जला क्या है?

13:51 (IST) 2 Oct 2025

Pankaja Munde Bhaktigad Dasara Melawa: भक्तीगडावरून धनंजय मुंडेंचं भाषण

माझ्याविरोधातला घोटाळा काढला. न्यायालयानं मला क्लिनचिट दिली. पण जे कोर्टात गेले त्यांना एक लाखाचा दंड केला. पण एवढं होऊनही मी आजही शिक्षा भोगतोय. ना मी कुणाला विरोध केला ना मी कुणाच्या विरोधात आहे - धनंजय मुंडे, आमदार

13:51 (IST) 2 Oct 2025

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाची लगबग; रस्त्यांचे डांबरीकरण, दुभाजकांचे रंगकाम

Navi Mumbai Airport: विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील खड्डे बुजवून डांबरीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पुढील सहा दिवसांत ही कामे पूर्ण करण्याचे आदेश उच्च स्तरावरून देण्यात आले आहेत. ...सविस्तर वाचा
13:50 (IST) 2 Oct 2025

Pankaja Munde Bhaktigad Dasara Melawa: भक्तीगडावरून धनंजय मुंडेंचं भाषण

मराठा आरक्षणाच्या चळवळीतही आम्ही होतो. पण काही जणांना या आरक्षणाच्या आडून ओबीसींमधून आरक्षण घ्यायचंय. एमपीएससीच्या निकालात ओबीसीचं कटऑफ ४८५ आलं. विशेष मागास वर्गाचा कटऑफ होता ४५०. मला विशेष मागास वर्गात ४५० वर प्रवेश मिळाला असता. पण ओबीसीत आल्यानंतर ४८० गुण मिळाले तरी प्रवेश मिळणार नाही. कुणाला फसवताय तुम्ही? काही ठराविक लोकांना फक्त यातून खुर्ची मिळावी अशी अपेक्षा आहे. आरक्षण दिलंय. पण याच्या ताटातलं काढून त्या ताटात दिलं जातंय - धनंजय मुंडे, आमदार

13:44 (IST) 2 Oct 2025
Pankaja Munde Bhaktigad Dasara Melawa: भक्तीगडावरून धनंजय मुंडेंचं भाषण

काहीजण म्हटले गोपीनाथ मुंडेंचं आता सगळं संपलं. अनेकजणांना हे ऐकायचंय कारण मी बरेच दिवस झाले बोललोच नाही. मैने सोचा इस सफर में खामोश रहना ही ठीक है. ना कुछ करते हुए बिना वजह गालियाँ खाई है. पण विद्यार्थी चळवळीपासून ज्या ज्या वेळी आरक्षणाचा मुद्दा आला, त्या त्या वेळी त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी कार्यकर्ता आहे - धनंजय मुंडे, आमदार

13:29 (IST) 2 Oct 2025

Pankaja Munde Bhaktigad Dasara Melawa: भक्तीगडावरून धनंजय मुंडेंचं भाषण

हा मेळावा होण्यासारखी परिस्थिती काही दिवसांपूर्वी नव्हती. अभूतपूर्व असा पाऊस आला. शेतकऱ्यांवर भयंकर संकट ओढवलं. माझी आणि ताईची चर्चा झाली की काय करायचं? पण ताईंनी सांगितलं की काहीही झालं तरी या दसरा मेळाव्याची परंपरा मोडायची नाही. शेतकरी आज अडचणीत आला आहे. अभूतपूर्व नुकसान झालंय हे मान्य करतो. आज मी मंत्रीमंडळात नाही, फक्त आमदार आहे. पण माझी बहीण मंत्रीमंडळात आहे. शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत पंकजाताई महायुतीच्या सरकारकडून मिळवून देतील - धनंजय मुंडे, आमदार, भारतीय जनता पक्ष

13:28 (IST) 2 Oct 2025

RSS 100 Years Dasara Melava Nagpur: संघाच्या शस्त्रपूजनात ड्रोन आणि पिनाका अग्निबाण

100 Years of RSS: पारंपरिक शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वापरले गेलेले ड्रोन आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीचे पिनाका अग्निबाण या शस्त्रांचे पूजन करण्यात आले. ...अधिक वाचा
13:27 (IST) 2 Oct 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघ यांचे ऐतिहासिक संबंध : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

रामनाथ कोविंद यांच्या या भाषणामुळे इतिहासातील एक महत्वाचा पैलू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डॉ. आंबेडकर आणि संघ यांच्यातील संबंधावर आजवर फारसे प्रकाश टाकले गेले नसले, तरी कोविंद यांच्या भाषणामुळे हा विषय नव्याने अभ्यासला जाण्याची शक्यता आहे. ...सविस्तर बातमी
12:55 (IST) 2 Oct 2025

Pankaja Munde Bhaktigad Dasara Melawa: थोड्याच वेळात पंकजा मुंडेंचं भाषण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणानंतर आता दिवसातल्या दुसऱ्या दसरा मेळाव्याची अर्थात पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची चर्चा सुरू झाली आहे. पंकजा मुंडे धनंजय मुंडे एकत्र आल्यानंतर पहिल्यांदाच भक्तीगडावर हा मेळावा होत असून त्यात दोघे भाषण करणार की फक्त पंकजा मुंडेंचच भाषण होणार? याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

10:29 (IST) 2 Oct 2025

RSS 100 Years Dasara Melava Nagpur: वांगचुक यांच्या अटकेवर भागवत यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले " परिवर्तन हिंसेने नव्हे तर…"

100 Years of RSS: मोहन भागवत म्हणाले, गेल्या कालखंडात एकीकडे, आपला विश्वास व आशा अधिक बळकट केली आहे. दुसरीकडे, आपल्यासमोरील जुन्या आणि नवीन आव्हानांना स्पष्टपणे अधोरेखित करून कर्तव्याच्या निर्धारित मार्गाबाबत देखील मार्गदर्शन केले आहे. ...वाचा सविस्तर
10:28 (IST) 2 Oct 2025

Maharashtra Dasara Melava 2025 LIVE: संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले "महात्मा गांधी…

100 Years of RSS: रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात १६ सप्टेंबर १९४७ रोजी दिल्ली येथे झालेल्या संघाच्या रॅलीचा संदर्भ दिला, ज्यात महात्मा गांधी स्वतः सहभागी झाले होते. ...सविस्तर बातमी
10:22 (IST) 2 Oct 2025

Maharashtra Dasara Melava 2025 LIVE: संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले "महात्मा गांधी…

100 Years of RSS: रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात १६ सप्टेंबर १९४७ रोजी दिल्ली येथे झालेल्या संघाच्या रॅलीचा संदर्भ दिला, ज्यात महात्मा गांधी स्वतः सहभागी झाले होते. ...अधिक वाचा
09:58 (IST) 2 Oct 2025

RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण...

आपल्या एकतेचा आधार आपली भारतीय संस्कृती आहे. ती सर्वसमावेशक आहे. सगळ्यांचा सन्मान व स्वीकार करण्याची शिकवण देते. संस्कृतीचं जतन सनातन काळापासून आजपर्यंत इथल्या हिंदू समाजाने केलं आहे. त्यामुळे कधीकधी त्या संस्कृतीला हिंदू संस्कृतीही म्हटलं जातं. भारतात या संस्कृतीला आवश्यक समृद्ध व सुरक्षित वातावरण मिळालं. पिढ्यानपिढ्या ही संस्कृती जतन व संवर्धन करण्यासाठी पूर्वजांनी कष्ट घेतले आहेत, त्याग केला आहे, बलिदान दिलं आहे. त्या संस्कृतीचं आचरण, आपल्या पूर्वजांचा गौरव, विवाकपूर्ण आचरण व आपल्या मातृभूमीची भक्त हे सगळं मिळून आपलं राष्ट्रीयत्व तयार होतं. सर्व विविधतेला एकत्र ठेवणारी आपली संस्कृती आपली राष्ट्रीयता आहे. हीच आपली हिंदू राष्ट्रीयता आहे. कुणाला हिंदू शब्दावर आक्षेप आहे. त्यांनी हिंदवी म्हणावं, भारतीय म्हणावं. हे सगळे समानार्थी शब्द आहेत. पण या राष्ट्रीयतेचं स्पष्ट स्वरूप व्यक्त करणारा एकच शब्द आहे, तो म्हणजे हिंदू. आपलं राष्ट्र राज्यावर आधारित नव्हतंच कधी. नेशन-स्टेट आपल्याकडे नव्हतं. आपली संस्कृती राष्ट्र बनवते. राज्य येतात-जातात. राष्ट्र कायम असतं. सर्व प्रकारचे चढउतार आपण पाहिले. गुलामगिरीही पाहिली, स्वातंत्र्यही पाहिलं. त्यामुळे हिंदू समाजाचं प्रबळ होणं, शीलसंपन्न होणं, संघटित होणं देशाच्या एकता व विकासाची गॅरंटी आहे. हिंदू समाज सनातन काळापासून इथे आहे. या देशाचा तो एक जबाबदार समाज आहे. वसुधैव कुटुंबकमच्या उदार विचारधारेचा संरक्षक हाच समाज राहिला आहे. जगाच्या विकासात योग्य ते योगदान देणारा देश भारताला बनवणं याची जबाबदारी व कर्तव्य हिंदू समाजाचं आहे.

09:52 (IST) 2 Oct 2025

RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण...

दुसरं म्हणजे कोणत्याही देशाला आदर्श व्हायचं असेल तर समाजात एकता असायला हवी. युनायडेट वी स्टँड, डिव्हायडेड वी फॉल. आपला देश विविधतांचा देश आहे. मधल्या काळात आक्रमणं झाली. विदेशी लोक भारतात आले. अनेक कारणांनी इथल्या लोकांनीही त्यांच्या विचारधारांचा स्वीकार केला. ते विदेशी निघून गेले पण त्यांचे विचार पाळणारे काही देशबंधू देशात आहेत. सुदैवाने भारताची परंपरा सर्व प्रकारच्या विचारधारांचा स्वीकार करते. त्यामुळे बाहेरून आलेल्या विचारसरणींना आपण परके मानत नाही. आपण सगळ्या वैशिष्ट्यांना मानतो, स्वीकारतो, आपली वैशिष्ट्येही त्यांच्या बरोबरीच्या मानतो. ही वैशिष्ट्ये भेदभावाला कारणीभूत ठरणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. आज देशात याच विविधतांना भेदभावाचं कारण बनवल्या जात आहेत. आपापली वैशिष्ट्ये आपापल्या ठिकाणी योग्य आहेत. पण असं असलं, तरी आपण सगळे एका मोठ्या समाजाचे भाग आहोत. समाज, देश, संस्कृती व राष्ट्राच्या नात्याने आपण एकच आहोत. आपण वेगळे नाहीत. विविधता भाषा, पंथ संप्रदाय, खानपान, राहण्याची ठिकाणं यावर आहेत. त्यामुळे या एकतेमुळे आपलं परस्परांशी वागणं सद्भावनेचं असायला हवं. सगळ्यांच्या वेगवेगळ्या चालीरीती आहेत. पण आपण एकमेकांच्या चालीरीतींचा अवमान करणार नाही याची चिंता सगळ्यांनी करायला हवी. कुणी एकानं हे करून भागणार नाही. अनेक भांडी सोबत ठेवली तर कुठेतरी आवाज होतोच. एवढे सगळे समाज एकत्र असल्यावर कुठेतरी आवाज होऊच शकतो. पण असं झालं तरी नियमांचं पालन करणं, व्यवस्थेचं पालन करणं, सद्भावपूर्ण आचरण करणं कायम ठेवलं पाहिजे. लहान-सहान गोष्टींवर कायदा हातात घेणं, रस्त्यावर उतरणं, गुंडगिरी करणं हे योग्य नाही. कुठल्या समाजाला भडकवण्यासाठी शक्तीप्रदर्शन कऱणं हे ठरवून केलं जातं. त्यापासून लांब राहायला हवं. त्याचे परिणाम चांगले होत नाहीत. अशा गोष्टींना थांबवायला हवं. शासन-प्रशासनाने आपलं काम कोणत्याही भेदभावाशिवाय, कुठल्याही दबावाशिवाय नियमानुसार करायला हवं. पण समाजाच्या युवा पिढीला, सदसदविवेकबुद्धीला सतर्क राहायला हवं. गरज पडेल तेव्हा मध्यस्थीही करावी लागेल. कारण अराजकतेला थांबवावंच लागेल.

09:42 (IST) 2 Oct 2025

RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण...

व्यवस्था बनवणारा समाज असतो, मनुष्य असतो. तो जसा असतो, तशीच व्यवस्था होते. समाजाच्या आचरणात बदल आला, तर व्यवस्थेत बदल होईल. व्यवस्था स्वत:मध्ये बदल घडवून आणण्यास इच्छुक नसते. समाजाला ते करावं लागतं. आणि समाजात भाषणं, पुस्तकांमधून परिवर्तन होत नाही. प्रबोधन करावंच लागतं. पण प्रबोधन करणाऱ्यांना जो बदल घडवायचाय, तो त्यांना स्वत:च्या आयुष्यात आणून उदाहरण घालून द्यावं लागतं. असे स्थानिक नेतृत्व देणारे व्यक्ती असायला हवेत. असे व्यक्ती तयार करावे लागतात. त्यामुळे व्यक्ती निर्माणातून समाज परिवर्तन व समाज परिवर्तनातून देश परिवर्तन हा संघाचा विचार आहे. सर्व समाजांमध्ये असेच बदल घडतात.

09:40 (IST) 2 Oct 2025

RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण...

राष्ट्रीय स्वयंसेव संघ गेल्या १०० वर्षांपासून अशाच प्रकारच्या चिंतनावर काम करत आहे. समाजाच्या सर्व पातळ्यांवर स्वयंसेवक सक्रीय आहेत. या सगळ्यांच्या अनुभवाच्या आधारावर संघाचं एक चिंतन आहे. पहिली गोष्ट म्हणजे जगाच्या व्यवस्थेत परिवर्तन गरजेचं आहे. पण आपण एका विपरीत व्यवस्थेत इतके पुढे गेलो आहोत की आता एकदम मागे वळलो तर गाडी उलटी होईल. त्यामुळे हळूहळू लहान लहान पावलं उचलून आपल्याला वळावं लागेल. एक मोठा वळसा घालून मागे यावं लागेल. परिस्थितीची जाणीव ठेवून आपण आपल्या समग्र दृष्टीच्या आधारावर आपला विकासमार्ग निश्चित करून जगासमोर एक यशस्वी उदाहरण ठेवू. अर्थ व कामाच्या मागे अंध होऊन पळणाऱ्या जगाला धर्माची दृष्टी द्यावी लागेल. तो धर्म पूजा, प्रार्थना, प्रथा नाहीये. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना जोडणारा, सगळ्यांना विकसित करणारा, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा, प्रजेच्या विकासाची धारणा करणारा हा धर्म आहे. या धर्माचा मार्ग आपल्याला आपल्या उदाहरणाने जगाला दाखवावा लागेल. भारताला हे करावंच लागेल असं संघाचं मत आहे.

09:38 (IST) 2 Oct 2025

RSS 100 Years Dasara Melava Nagpur : बौद्ध गुरू दलाई लामा यांचा संघाविषयी विशेष संदेश, संघ समर्पण आणि…

100 Years of RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्त दलाई लामांनी विशेष संदेश पाठवलेला आहे. या संदेशामध्ये त्यांनी संघाचे भरभरून कौतुक केले. ...अधिक वाचा
09:38 (IST) 2 Oct 2025

RSS 100 Years Dasara Melava Nagpur : विदेशी पाहुणे घेणार संघाचे बौद्धिक, भाषांतर करणाऱ्या विशेष हेडफोनची सुविधा

100 Years of RSS : विजयादशमीच्याच दिवशी १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. यंदा संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने संघाचा शताब्दी वर्षातील हा ऐतिहासिक विजयादशमी सोहळा आहे. ...सविस्तर वाचा
09:38 (IST) 2 Oct 2025

RSS 100 Years Dasara Melava Nagpur : सरसंघचालकांकडून संघ ध्वज वंदन, पथसंचलनाला सुरुवात

100 Years of RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव यंदा अधिक उत्साहात साजरा होणार असून, नागपूरच्या रेशीमबाग मैदानात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन आणि मुख्य संबोधन होणार आहे. ...सविस्तर वाचा
09:37 (IST) 2 Oct 2025

RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण...

इतर देश भारताकडे अपेक्षेनं पाहात आहेत. नियतीला कदाचित हेच हवंय की आपण भारतीय जगाला यासंदर्भात एक नवीन मार्ग दाखवेल.

09:35 (IST) 2 Oct 2025

RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण...

मानवाचा भौतिक विकास होतो, पण नैतिक विकासाकडे लक्ष राहात नाही. विकास होतो, पण पर्यावरणाकडे दुर्लक्ष होतं. विकास होतो, पण काही लोकांचा होतो, काहींचा होत नाही. अमेरिकेचं जीवन विकासासाठी आदर्श मानलं जातं. आपल्याला वाटलं भारत अमेरिकेसारखं जीवन जगावं. काही अभ्यासकांच्या मते असं जीवन जगण्यासाठी आणखी पाच पृथ्वींची गरज असेल. प्रगतीसोबत याचमुळे नवनव्या समस्या आपल्यासमोर उभ्या राहात आहेत. त्या जीवघेण्या ठरत आहेत. आपल्या दृष्टीमध्ये समस्या आहे.

09:32 (IST) 2 Oct 2025

RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण...

समाज पुढाकार घेत आहे म्हणून सरकारच्या आधी आपल्या समस्यांवर उपाय शोधण्यात यशस्वी ठरत आहे. संघाचे स्वयंसेवक व इतर संस्थांनाही याचा अनुभव येत आहे. बुद्धिवादी लोकांमध्येही भारताचं असं स्वतंत्र मॉडेल तयार करता येईल का याविषयी विचार होऊ लागला आहे.

09:31 (IST) 2 Oct 2025

RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण...

सुदैवाने भारतात आशेचा किरण दिसतोय की नव्या पिढीत देशभक्तीची भावना, संस्कृतीबद्दल आस्था, विश्वासाचं प्रमाण वाढलं आहे. संघाच्या स्वयंसेवकांसह समाजातील व्यक्ती, संस्था मागास वर्गांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.

09:31 (IST) 2 Oct 2025

RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण...

माणसाचा विकास झाला, विज्ञान प्रगत झालं. देश वेगवेगळ्या पातळीवर जवळ आले. पण या परिवर्तनाची गती इतकी जास्त आहे की माणसांच्या बदलण्याचा वेग व विज्ञान-तंत्रज्ञान बदलण्याचा वेग याचा ताळमेळच राहिलेला नाही. त्यामुळेच माणसाच्या आयुष्यात अनेक समस्या आहेत. युद्ध, इतर कलह चालूच आहेत. निसर्गाचा कोपही होतोय. पण कुटुंबांमध्येही कलह होत आहेत. नागरी जीवना अनाचार वाढतोय. त्यावर उपायाचे प्रयत्न झाले आहेत. पण त्याचं पूर्ण निदान करण्यात अपयश आलं आहे. त्याउपर अस्वस्थता, कलह हिंसेला खतपाणी घालत आहे. जगात सर्व प्रकारच्या परंपरा, मांगल्य, संस्था यांचा पूर्णपणे विनाश परिवर्तनाने होईल असं मानणारा नवा विचार व समुदाय अस्तित्वात आला आहे. इतर ठिकाणी आहे, तसा भारतातही आजकाल हातपाय पसरू लागला आहे. सगळ्याच देशांमध्ये त्यामुळे समाजजीवन विस्कळीत झालं आहे. एक प्रकारे अराजकतेच्या दिशेनं सगळा समाज वाटचाल करू लागला आहे असं दिसत आहे. हे सर्व देशांमध्ये दिसत आहे. या परिस्थितीत जग भारताकडे अपेक्षेनं पाहात आहे.

09:27 (IST) 2 Oct 2025

RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण...

निसर्गासोबतच जनजीवनातही विस्कळीतपणा होत आहे. श्रीलंका, बांगलादेशमध्ये आपण हे पाहिलं. कधीकधी होतं असं. प्रशासन जनतेकडे राहत नाही. संवेदनशील राहात नाही. लोकाभिमुळ राहात नाही. तिथल्या जनतेची अवस्था लक्षात घेऊन धोरणं ठरवली जात नाहीत म्हणून असंतोष असतो. पण त्या असंतोषाला अशा प्रकारे व्यक्त करणं हे कुणाच्याच हिताचं नाही. कोविंद यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या शेवटच्या भाषणाचा संदर्भ दिला. त्यात अशा प्रकारच्या आंदोलनांना आंबेडकरांनी ग्रामर ऑफ अनार्की म्हटलंय. लोकशाही मार्गांनीही बदल घडू शकतो. हिंसक मार्गांनी बदल घडत नाही. गडबड-गोंधळ होतो पण परिस्थिती तशीच राहते. संपूर्ण जगाचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर जेव्हापासून अशा गोंधळाच्या क्रांती घडल्या, त्या कोणत्याच क्रांतीनं उद्देश साध्य केला नाही. फ्रान्सच्या क्रांतीनंतर नेपोलियन राजा झाला आणि राजेशाही कायम राहिली. सर्व साम्यवादी देश क्रांतीनंतरही भांडवलशाही तत्वांनुसारच चालत आहेत. अशा हिंसक क्रांतींमुळे देशाबाहेरील स्वार्थी शक्तींना आपल्या देशाविरोधात खेळ खेळण्याची संधी मिळते. आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये गोंधळ होतोय. ते आपलेच देश आहेत. ते आपल्यापासून लांब नाहीत. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतच होते. तिथे अशी स्थिती निर्माण होणं हे आपल्यासाठी धोकादायक आहे. ते फक्त आपले शेजारी आहेत म्हणून नाही, ते आपलेच देश आहेत म्हणून चिंतेचा विषय आहे. आपला आत्मीयतेचा संबंध आहे म्हणून चिंता आहे.

09:24 (IST) 2 Oct 2025

RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण...

प्रचलित आर्थिक विकासाच्या पद्धतीचे दुष्परिणाम आपल्याकडेही दिसत आहेत. हिमालयाच्या भागात काय घडतंय आपण बघतोय. पावसाचं अनियमित होणं सगळीकडे आहे. निसर्काचे कोपही वाढले आहेत. अनियमित पाऊस होतोय. हिमनद्या सुकत आहेत. या गोष्टी गेल्या ३-४ वर्षांत वाढल्या आहेत. हिमालय आपल्यासाठी सुरक्षेची भिंत आणि दक्षिण-पूर्व आशियासाठी पाण्याचा स्रोत आहे. जर सध्याच्या विकासाच्या पद्धतीमुळे नुकसान वाढत असेल, तर आपल्याला त्या धोरणाचा पुनर्विचार करावा लागेल. कारण हिमालयाची आजची अवस्था धोक्याची घंटा वाजवते आहे.

09:22 (IST) 2 Oct 2025

RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण...

नुकतंच अमेरिकेनं जाहीर केलेलं धोरण इतरांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यासाठी प्रचलित आर्थिक विकासाच्या पद्धतीवर आपण अवलंबून राहता कामा नये. जगाचा गाडा परस्पर संबंधांमधूनच चालतो. एकटा देश स्वतंत्रपणे वाटचाल करू शकत नाही. पण हे अवलंबित्व नाईलाजात बदलता कामा नये. कारण ही आर्थिक प्रणाली कधी बदलेल काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला स्वदेशी व स्वावलंबनाला पर्याय नाही. आपल्याला स्वावलंबी व्हावं लागेल. स्वदेशीचा अवलंब करावा लागेल. त्यानंतरही सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचं जतन करावं लागेल. पण त्यात नाईलाज नसेल, सक्ती नसेल, आपली इच्छा असेल.

Uddhav Thackeray on Alliance With Raj Thackeray

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापैकी सर्वात मोठे आव्हान कोण? यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांच्यासाठी मीच मोठे आव्हान आहे.

Dasara Melava 2025 Maharashtra LIVE, 02 October 2025: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.