Maharashtra Breaking News Today, 25 October 2023 : शिवसेनेच्या दोन्ही गटांचा मंगळवारी (२४ ऑक्टोबर) मुंबईत दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यात दोन्ही गटांमधील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. यावर आज वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर एक महिन्याच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो असं आश्वासन देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घ्यायला लावलं होतं. त्यावर जरांगे पाटलांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत देत उपोषण मागे घेतलं होतं. हे ४० दिवस उलटून गेले तरी राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकलेलं नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील आज पुन्हा उपोषणाला बसतील. मनोज जरांगे पाटलांचं उपोषण आज राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असेल.

Live Updates

Mumbai News Live in Marathi : महाराष्ट्र आणि राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

18:49 (IST) 25 Oct 2023
चाळीत युरिया टाकल्याने कांद्याचे नुकसान- वाखारीतील घटना

नाशिक: उन्हाळी कांद्याला भाव वाढेल, या आशेने चाळीत साठवणूक करून ठेवलेल्या कांद्यावर वाखारी येथे कोणीतरी युरिया टाकून नुकसान केले आहे.

सविस्तर वाचा...

18:41 (IST) 25 Oct 2023
सांगली: प्रेमाचे नाटक करुन व्यापाऱ्याला चार लाखाचा गंडा

सांगली: प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत एका व्यापार्‍याला चार लाखाचा गंडा गुजरातच्या तरूणीने घातला. या प्रकरणी संबंधित युवती विरूध्द सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

18:06 (IST) 25 Oct 2023
सांगली: निवृत्त शिक्षकाला दीड कोटीचा गंडा

सांगली: जादा परताव्याचे आमिष दाखवून एका निवृत्त शिक्षकाला सुमारे दीड कोटींचा गंडा घालण्याचा प्रकार सांगलीत घडला असून या प्रकरणी तक्रारीनंतर सहा जणाविरूध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

17:54 (IST) 25 Oct 2023
नाशिक: गिते स्क्वेअर इमारतीला आग; लाखो रुपयांचे नुकसान

नाशिक: सातपूर आयटीआय सिग्नलजवळ असलेल्या गिते स्क्वेअर इमारत परिसरात बुधवारी पहाटे सव्वाचार वाजता लागलेल्या आगीत सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले.

सविस्तर वाचा...

17:46 (IST) 25 Oct 2023
पुणे: व्यावसायिक स्पर्धेतून रोगनिदान प्रयोगशाळेची तोडफोड; तपासणीसाठी आलेल्या तरुणावर शस्त्राने वार

पुणे: रोगनिदान प्रयोगशाळेचा व्यवसाय कमी झाल्याने एका रोगनिदान प्रयोगशाळेच्या मालकाने गुंडांना पाठवून तोडफोड केल्याची घटना बिबवेवाडी भागातील सुखसागरनगर परिसरात घडली.

सविस्तर वाचा....

17:41 (IST) 25 Oct 2023
भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांचा ठाकरे गटात प्रवेश

मातोश्रीवर झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पवार यांचे स्वागत केले.

सविस्तर वाचा...

17:32 (IST) 25 Oct 2023
मुंबईः फॅशन डिझायनरची साडेदहा लाखांची सायबर फसवणूक; दोघांना अटक

मुंबईः युट्यूबवरील व्हिडिओ ‘लाईक’ करण्याच्या नावाखाली महिला फॅशन डिझानरची साडेदहा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर पोलिसांना यश आले आहे.

सविस्तर वाचा...

17:17 (IST) 25 Oct 2023
नागपूर: अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीचा खून

नागपूर: पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या शंकेवरून पतीने पत्नीच्या डोक्यावर लोखंडी पाईप मारून तिचा खून केला.

सविस्तर वाचा...

17:14 (IST) 25 Oct 2023
नवरात्र कालावधीत तुळजाभवानीच्या तिजोरीत पावणे चार कोटी; पाऊण किलो सोने अन बारा किलो चांदीही देवीचरणी अर्पण

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तिजोरीत नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत तब्बल पावणे चार कोटी रूपयांची देणगी जमा झाली आहे.

सविस्तर वाचा...

17:02 (IST) 25 Oct 2023
रुग्णांचा जीव टांगणीला.. पूर्व विदर्भातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी संपावर..

नागपूर: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी शासनाकडून प्रतिसाद नसल्याने शेवटी स्थायी करण्याच्या मागणीसाठी २५ ऑक्टोंबरपासून संप सुरू केला.

सविस्तर वाचा...

16:46 (IST) 25 Oct 2023
मराठा आरक्षण : पुणे जिल्ह्यात राजकीय नेत्यांना बंदी, २८ तारखेला कॅन्डल मार्च काढण्यात येणार

पुणे जिल्ह्यात राजकीय नेत्यांना बंदी घालण्याचा निर्णय मराठा क्रांती समन्वयकांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कुंजीर यांनी दिली.

सविस्तर वाचा...

16:05 (IST) 25 Oct 2023
पत्नीला तलाकची कागदपत्रे घेऊन बोलविले, मात्र पतीच्या मनात काही वेगळेच होते…

कागदपत्र आणायचे सांगून पत्नीला बुलढाण्याच्या राजूर घाटात आणले. त्यांनतर अचानक ओढणीने गळा आवळला असता पत्नीने जिवाच्या आकांताने आरडाओरड केली.

सविस्तर वाचा...

16:04 (IST) 25 Oct 2023
पिंपरी- चिंचवडमध्ये मराठा बांधव आक्रमक; जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू

दरम्यानच्या काळात शहरातील कुठल्याही नेत्यांना, पुढाऱ्यांना सभा, कार्यक्रम घेऊ देणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

सविस्तर वाचा...

15:33 (IST) 25 Oct 2023
...अन् संभाजीराजेंनी मनोज जरांगेंसमोर हात जोडले; म्हणाले, "माझी एकच विनंती आहे"

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत सरकारने पाळली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे. यावेळी जरांगे यांनी जलत्यागही केला आहे. त्यामुळे सर्वांनाच मनोज जरांगे पाटलांची काळजी वाटू लागली आहे. दरम्यान, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे यांच्या उपोषणस्थळी भेट दिली आणि त्यांना पाणी पिण्याची विनंती केली.

संभाजीराजे म्हणाले, मनोजने जलत्याग केला आहे. यावर मला काहीच बोलता येत नाहीये. त्याला काही बोलण्याची मलाच अडचण वाटतेय. परंतु, त्याने किमान पाणी तरी प्यावं ही माझी विनंती आहे. छत्रपतींच्या नात्याने मला थोडासा अधिकार आहे. मनोजने हे उपोषण करावं. परंतु, किमान पाणी तरी प्यावं, असं मला वाटतं. त्यामुळे मी त्याच्याकडे पाणी पिण्याची विनंती करतो.

15:24 (IST) 25 Oct 2023
किनगाव राजा दरोड्याचे ‘मराठवाडा कनेक्शन’! सहा गजाआड; महिला करायची ‘रेकी’

बुलढाणा: जिल्ह्यातील दोन वाटमारी (रोड रॉबरी) च्या घटनांचा तपास ४८ तासातच लावण्यात पोलीस विभागाला यश आले आहे. किनगाव राजा मधील दरोड्याचे ‘मराठवाडा कनेक्शन’ असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सविस्तर वाचा...

15:22 (IST) 25 Oct 2023
मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत नोकरीच्या आमिषाने महिलेची फसवणूक

महिला आरोपीने मंत्रालयात नोकरीला तर राजेशने बँकेत नोकरीला असल्याचे सांगितले.

सविस्तर वाचा...

15:20 (IST) 25 Oct 2023
अज्ञात कारणाने झालेल्या स्फोटात सातजण जखमी; कराडच्या मुजावर कॉलनीतील घटनेने एकच खळबळ

भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. घरांची पडझड व भिंती कोसळताना, तीन-चार दुचाकी वाहनांचे नुकसानही झाले.

सविस्तर वाचा...

15:05 (IST) 25 Oct 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत घुसून मराठा आरक्षणावर जाब विचारणार

नगरः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्या, गुरुवारी शिर्डी येथे होणाऱ्या सभेत त्यांनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी शिवसेनेचा ठाकरे गट व संभाजी ब्रिगेड त्यांना सभेत घुसून जाब विचारणार आहेत.

सविस्तर वाचा...

14:14 (IST) 25 Oct 2023
पिंपरीत दांडियातील वादातून टोळक्याची दोघांना कोयत्याने मारहाण

आरोपींनी ‘तू आमच्या मध्ये काय येतोस, तुला ठार मारतो’ असे म्हणत त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले.

सविस्तर वाचा...

14:14 (IST) 25 Oct 2023
सांगली : सुर्य, चांद्रयानाबरोबरच नयनरम्य दारुकामाचे प्रदर्शन

दसर्‍या निमित्त सिध्दराज पालखीसमोर करण्यात आलेल्या शोभेच्या दारूकामामुळे रात्रभर कवठेएकंदचे आसमंत उजळून निघाले.

सविस्तर वाचा...

13:47 (IST) 25 Oct 2023
अमरावती विभागातील तीन ठिकाणी ‘जंगल सत्याग्रह स्मारक’ उभारणार

अमरावती: महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह सुरु केल्यानंतर त्याला प्रतिसाद म्हणून विदर्भात ‘जंगल सत्याग्रह’ करण्यात आला होता. जंगल सत्याग्रहाचा इतिहास जनसामान्यांना माहित होण्यासाठी व त्यापासून तरुण पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी राज्यात तीन ठिकाणी ‘जंगल सत्याग्रह स्मारक’ उभारण्याबाबत शासनाने सुचविले आहे.

सविस्तर वाचा...

13:33 (IST) 25 Oct 2023
धुळे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

धुळे: तालुक्यातील होरपाडे येथील चार वर्षाच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्यानंतर वन विभागाने या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावले आहेत.

सविस्तर वाचा...

13:00 (IST) 25 Oct 2023
“सरकार आंधळं, बहिरं, बधीर झालेलं…”, मराठा आरक्षणावरून नाना पटोले आक्रमक

आज शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा, धनगर विरुद्ध आदिवासी हा वाद निर्माण झालेला आहे. ही भाजपने या राज्यात पेरलेली बीजं आहेत, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा...

12:32 (IST) 25 Oct 2023
रस्त्यांवरील महावितरणच्या रोहित्रांचे अडथळे दूर होणार; कल्याण डोंबिवली पालिकेचा राज्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प यशस्वी

रस्ते कामे करताना अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेले महावितरणचे रोहित्र अडथळा ठरतात.

सविस्तर वाचा...

12:20 (IST) 25 Oct 2023
पोलीस उपनिरीक्षक भरतीसाठी शारीरिक चाचणीला अखेर मुहूर्त

अमरावती: करोना संकटाच्‍या काळात अनेक स्‍पर्धा परीक्षांचे वेळापत्रक विस्‍कळीत झाले होते, यात अनेक परीक्षांची प्रक्रिया अपूर्ण राहिली होती.

सविस्तर वाचा...

12:18 (IST) 25 Oct 2023
संघाच्या दसरा महोत्सवातील मान्यवरांच्या उपस्थितीची चर्चा

दरवर्षी प्रमाणे यंदाही या कार्यक्रमातील सरसंघचालकांच्या भाषणाची चर्चा झाली, पण सोबतच चर्चा झाली ती कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांची.

सविस्तर वाचा...

12:17 (IST) 25 Oct 2023
राज्यात नोव्हेंबरपासून थंडीची तीव्रता वाढणार

२०१८ नंतर प्रथमच एकाच वेळी दोन चक्रीवादळांची निर्मिती झाली आहे. हवामान खाते यावर लक्ष ठेवून आहे.

सविस्तर वाचा...

12:16 (IST) 25 Oct 2023
शहापूरजवळ दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांच्या बसला अपघात, औरंगाबाद येथील १४ शिंदे समर्थक शिवसैनिक जखमी

मुंबईतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी औरंगाबाद भागातून आलेल्या शिवसैनिकांच्या बसला बुधवारी पहाटे चार वाजता मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर जवळील कळंभे गावाजवळ अपघात झाला. या अपघातात १४ शिवसैनिक किरकोळ जखमी झाले.

वाचा सविस्तर...

12:13 (IST) 25 Oct 2023
"भाजपाने यांच्या डोक्यात भरलेले किडे दिसले", 'त्या' वक्तव्यावरून ठाकरे गटाचा एकनाथ शिंदेंना टोला

शिंदे गटाचा मंगळवारी मुंबईच्या आझाद मैदानात दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाची हमास या पॅलेस्टाईनमधल्या दहशतवादी संघटनेशी तुलना केली. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे गटातील खासदार संजय राऊत म्हणाले, या वक्तव्यावरून भाजपाने एकनाथ शिंदेंच्या डोक्यात भरलेले किडे दिसले.

12:01 (IST) 25 Oct 2023
जे.जे. रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह, रुग्णकक्ष अद्ययावत होणार

मुंबई: जे. जे. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला उत्तम उपचार आणि अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी रुग्णालय प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.

सविस्तर वाचा...

Manoj Jarange Patil

मनोज जरांगे पाटील

आजपासून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन

शिवसेनेच्या शिंदे गटाचा मंगळवारी मुंबईतल्या आझाद मैदानात दसरा मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भूमिका मांडली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मुख्यमंत्री म्हणाले की आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. दुसऱ्या बाजूला, मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. कारण, त्यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती, जी आता संपली आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग निवडला आहे.