Maharashtra News Today, 30 October 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत आज (३० ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावलं होतं. तसेच आमदार अपात्रतेबद्दलच्या सुनावणीचं सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी न्यायालयाने ३० ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी दिला होता. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयात सुधारित वेळापत्रक सादर करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावताना दिसत आहे. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यासह राज्यातील विविध बातम्यांचा एकत्रित आढावा…

Nanded, VVPAT, axe,
नांदेड : व्हीव्हीपॅट, इव्हीएम मशिन कुर्‍हाडीने फोडली
chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
pmc bank scam marathi news, pmc bank
पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरण : सिंधुदुर्गातील १८०७ एकर जमिनीवर ईडीची टाच, जमिनीची किंमत ५२ कोटी ९० लाख रुपये
dharashiv, lok sabha, ranajagjitsinha patil
Maharashtra News : धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार? पुन्हा पारंपरिक लढतीची शक्यता
Live Updates

Today’s News in Marathi : राजकारणासह, सामाजिक, गुन्हे आणि अर्थ विषयक घडामोडी वाचा एका क्लिकवर…

17:56 (IST) 30 Oct 2023
सांगली : पृथ्वीराज फौंडेशनची कोरड्या कृष्णेत स्वच्छता मोहीम, ३ टन कचरा संकलित

सांगली : पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्यावतीने 'माझी माय कृष्णामाई' या उपक्रमाअंतर्गत विष्णूघाट ते बंधाऱ्यापर्यंत स्वच्छता करून सोमवारी तब्बल तीन टन कचरा संकलित करण्यात आला. नदी पात्रात सगळीकडे कचरा साठलेला होता आणि त्याची दुर्गंधी पसरलेली होती. तशातच कोयना धरणातून सोडलेले पाणी आज सायंकाळपर्यंत सांगलीजवळ पोहोचणार होते, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आज नदी स्वच्छ करायचीच असा निर्धार करुन पृथ्वीराज फौंडेशनने नदीची स्वच्छता मोहीम हाती घेतली होती.

17:49 (IST) 30 Oct 2023
आजपासून बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रचाराला सुरुवात

जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व सन २०२२ चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे आणि निवडणुका न होऊ शकलेल्या मुळे

ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदासाठी प्रत्यक्ष मतदान ५ नोव्हेंबर रोजी होत आहे.

त्या अनुषंगाने उमेदवारांनी गावा गावात प्रचाराला सुरुवात केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील १२ तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीसाठी सदस्य पदासह थेट सरंपच व पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीद्वारे ५९ ग्रामपंचायतीच्या रिक्त थेट सरपंच सदस्याच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने प्रत्यक्ष निवडणुक होत आहे. त्यांच्या प्रचाराला आता सुरुवात झाली आहे.

17:34 (IST) 30 Oct 2023
मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींचे उपोषण

आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी उपोषण केले.

सविस्तर वाचा...

17:22 (IST) 30 Oct 2023
सांगली : विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाजाचा मोर्चा

धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता.

सविस्तर वाचा...

17:21 (IST) 30 Oct 2023
तिघांचा खून करणाऱ्याला फाशीची शिक्षा मिळणार? उच्च न्यायालयात मंगळवारी निर्णय…

वाघधरा येथे तीन मित्रांची निघृण हत्या करणा-या आरोपीला नागपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सविस्तर वाचा…

17:20 (IST) 30 Oct 2023
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी ‘या’ पदांसाठी तात्पुरती भरती

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार आहे. यासाठी तात्पुरत्या स्वरुपात लिपीक-टंकलेखकाची एकूण १०  आणि शिपाई / संदेश वाहकांची २४ पदे  भरण्यात येणार आहे. सविस्तर वाचा…

16:36 (IST) 30 Oct 2023
चंद्रपूर : आमदार प्रतिभा धानोरकरांचा इशारा, कृषिपंपांना २४ तास थ्री फेज वीजपुरवठा न केल्यास…

चंद्रपूर : खासगी व शासकीय वीजनिर्मिती केंद्राच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात ४४२० मे. वॅ. वीजनिर्मिती होते. रात्रीपाळीत शेतकरी कृषिपंपातून शेतीला पाणीपुरवठा करीत असतात. यावेळी हिंस्त्र प्राणी शेतकऱ्यावर हल्ला करीत असतात. २ दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात २४ तास थ्री फेज वीजपुरवठा न केल्यास जिल्ह्यातील वीज वितरण कार्यालयाला टाळे बंद आंदोलन करण्याच्या इशारा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी ऊर्जामंत्र्यांना दिला आहे.

सविस्तर वाचा...

16:32 (IST) 30 Oct 2023
“घाबरट सरकार कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहे”, विजय वडेट्टीवारांचा घणाघात

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष मनीषा काटे यांना कळंब पोलिसांनी ताब्यात घेतले.

सविस्तर वाचा...

15:28 (IST) 30 Oct 2023
गळालेल्या संत्र्यांपासूनही होणार उत्पादन, मिळणार पूर्ण भाव; नेमके संशोधन काय, जाणून घ्या…

देशातील आणि विशेषत: विदर्भातील संत्री उत्पादक शेतकऱ्यांसमोर फळगळतीची मोठी समस्या असते. मात्र, आता फळगळती झालेल्या संत्र्यापासून विविध उत्पादने तयार करण्यात येणार आहे. सविस्तर वाचा…

15:27 (IST) 30 Oct 2023
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदवार्ता! पश्चिम विदर्भातून पुण्यासाठी आणखी एक गाडी धावणार

पश्चिम विदर्भातून पुण्यासाठी आणखी एक गाडी धावणार आहे. नियमित अमरावती-पुणे एक्सप्रेस लवकरच सुरू होणार आहे. ११०२५ / ११०२६ भुसावल – पुणे एक्सप्रेस (मार्ग नाशिक, पनवेल ) या रेल्वेचा मार्ग बदल व विस्तार करून ११०२५ / ११०२६ अमरावती – पुणे एक्सप्रेस अकोला, भुसावळ, मनमाड, अहमदनगर मार्गे लवकरच सुरू होणार आहे. सविस्तर वाचा

15:27 (IST) 30 Oct 2023
एमएचटी-सीईटी परीक्षा: संभाव्‍य वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून सुरू होणार परीक्षा

नागपूर: विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशासाठी सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. या सीईटी परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे जाहीर केले आहे.

सविस्तर वाचा...

15:25 (IST) 30 Oct 2023
आलिया भट्टने माझी भूमिका साकारावी – सुधा मूर्ती

मुंबई – भविष्यात माझा चरित्रपट कुणी तयार केला तर त्यात आलिया भट्ट या अभिनेत्रीने माझी भूमिका साकारावी अशी इच्छा सुधा मूर्ती यांनी टाटा लिटरेचर लाईव्ह फेस्टीव्हलमधील ‘पीपल ऑफ द लॅण्ड’ या चर्चासत्रात व्यक्त केली.

सविस्तर वाचा...

15:16 (IST) 30 Oct 2023
अवघ्या दोन तासात सोन्याच्या दरात ३०० रुपयांची घसरण, 'हे' आहेत आजचे दर

नागपूर: दिवाळी तोंडावर असतांनाच नागपुरात सोमवारी (३० ऑक्टोंबर) सकाळी १०.३० वाजतानंतर दोन तासातच सोन्याच्या दरात प्रति दहा ग्राम तब्बल ३०० रुपयांची घट नोंदवली गेली. हे दर नागपुरात किती आहे, हे आपण बघूया.

सविस्तर वाचा...

15:15 (IST) 30 Oct 2023
पाच कोटी सोने तस्करीचा तपास आता मुंबईतून; डीआरआयच्या मुख्य कार्यालयाकडून सखोल तपासणी

नागपूर: बांग्लादेश सीमेवरून कोलकातामार्गे सोन्याची तस्करी करणाऱ्या नागपुरातील एका व्यापाऱ्याला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने नागपूर रेल्वे स्थानकावर पकडले. त्याच्याकडून पाच कोटी रूपये किंमतीचे ८.५ किलो सोने जप्त करण्यात आले.

सविस्तर वाचा...

14:55 (IST) 30 Oct 2023
मराठ्यांना कुणबी दाखले देण्याबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; म्हणाले, “ज्यांच्या जुन्या नोंदी…”

आज सह्याद्री अथितीगृह येथे मराठा उपसमितीची बैठ पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला तत्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

सविस्तर बातमी...

14:54 (IST) 30 Oct 2023
हजार रुपये कमविण्याच्या नादात १६ लाख गमावले, सायबर गुन्हेगारांकडून महिलेची आर्थिक फसवणूक

सायबर गुन्हेगाराने घरबसल्यास काम आणि गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा देण्याचे आमिष एका महिलेला दाखवले. सुरुवातीला तिला दररोज एक हजार रुपये मिळायला लागले. त्यानंतर मात्र, सायबर गुन्हेगारांनी महिलेला जाळ्यात ओढून १६ लाख रुपयांनी फसवणूक केली. सविस्तर वाचा…

14:53 (IST) 30 Oct 2023
यूपीएससीतर्फे विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात, त्वरा करा…

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीने सहाय्यक संचालक आणि इतर अनेक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. सविस्तर वाचा…

14:52 (IST) 30 Oct 2023
काटई-बदलापूर रस्त्यावर दोन सोनसाखळी चोर अटकेत; आठ लाखाचा सोन्याचा ऐवज जप्त

कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात महिला, पुरूष पादचाऱ्यांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, सोनसाखळी असा ऐवज हिसकावून पळून जाणाऱ्या आंबिवली, शहाड येथील दोन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

सविस्तर वाचा…

14:50 (IST) 30 Oct 2023
धुळे जिल्ह्यातील रानमळ्याची मराठा आरक्षणासाठी एकजूट

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धुळे तालुक्यातील रानमळा या गावाने नेत्यांना गावबंदी केली आहे. गावाच्या वेशीवर फलक लावून नेत्यांना गावबंदी करणारे हे तालुक्यातील पहिले गाव आहे. सविस्तर वाचा…

14:47 (IST) 30 Oct 2023
जासई उड्डाणपूल खुला झाल्याने प्रवास सुसाट; मात्र एकच मार्गिकेमुळे कोंडी कायम

जासई उड्डाणपूल पुलावरील एकाच मार्गिकेवरून सध्या वाहनांची ये-जा होत आहे.

सविस्तर वाचा...

14:47 (IST) 30 Oct 2023
प्रेयसी आणि प्रियकर शौचालयात भेटले, कुटुंबीय उठले अन् प्रियकराला धु… धु… धुतले

नागपूर: मध्यरात्रीला प्रेयसीच्या घरी भेटायला आलेल्या प्रियकराने इशारा केला आणि प्रेयसी कुटुंबीयांची नजर चुकवून बाहेर आली. सुरक्षित ठिकाण म्हणून दोघांनीही शौचालयाचा आसरा घेतला. काही वेळाने मुलीची आई लघुशंकेसाठी शौचालयाकडे आली.

सविस्तर वाचा...

14:39 (IST) 30 Oct 2023
नागपूरहून पुण्याला जाणा-या रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल; जाणून घ्या सुधारित वेळापत्रक…

नागपूर: मध्य रेल्वे सोलापूर विभागातील दौंड आणि मनमाड विभागातील विसापूर आणि बेलवंडे स्थानकांदरम्यान मार्गाचे दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेणार आहे. त्यासाठी काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

14:23 (IST) 30 Oct 2023
बहिष्कारास्त्र! मराठा आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याचा चिमुकल्या विद्यार्थ्यांचा निर्णय; हाती लाठ्याकाठ्या घेऊन ग्रामस्थांची…

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा...

14:02 (IST) 30 Oct 2023
प्रणिती शिंदे वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार ?

सोलापूर : चार दशके सत्तेच्या राजकारणात राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची अलिकडे दहा वर्षांत मोठी पिछेहाट झाल्यानंतर निवडणुकीच्या राजकारणापासून त्यांनी स्वतःला दूर ठेवणे पसंत केले आहे. त्यांचा राजकीय वारसा त्यांच्याच कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पुढे चालविताना आगामी सोलापूर लोकसभा निवडणूक रिंगणात उतरून पित्याच्या सलग दोनवेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा विडा उचलला आहे. स्वतः सुशीलकुमार शिंदे हे गेले महिनाभर सोलापुरात तळ ठोकून आहेत.

सविस्तर वाचा...

13:35 (IST) 30 Oct 2023
धुळे जिल्ह्यात तीन बालकांचे प्राण घेणारा बिबट्या अखेर जाळ्यात

रमेश हा झोपडीच्या बाजूला जमिनीवर झोपला असताना बिबट्याने त्याला उचलून नेले होते.

सविस्तर वाचा...

13:34 (IST) 30 Oct 2023
परराज्यातील औषधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एफडीएचे संकेतस्थळ

मुंबई : राज्यातील किरकोळ व घाऊक विक्रेते हे मोठ्या प्रमाणात परराज्यातून औषध खरेदी करत असल्याने नागरिकांना बनावट औषधे मिळण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या औषधांवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा...

13:18 (IST) 30 Oct 2023
मुंबई : शिवीगाळ केली म्हणून जाब विचारल्याने केली हत्या

आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी जलालुद्दीनला अटक केली.

सविस्तर वाचा...

13:02 (IST) 30 Oct 2023
पहाडी गोरेगावमधील पीएमएवाय योजनेतील घरांवर मेट्रो उपकराचा भार, एक हजार मुद्रांक शुल्कासह एक टक्के कर भरावा लागणार

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ऑगस्ट २०२३ मधील पंतप्रधान आवास योजनेतील (पीएमएवाय) पहाडी गोरेगाव येथील अत्यल्प गटातील घरांसाठी केवळ एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय विजेत्यांसाठी मोठा दिलासा ठरला. मात्र आता या योजनेतील विजेत्यांवर एक टक्के मेट्रो उपकराचा भार पडला आहे.

सविस्तर वाचा...

12:46 (IST) 30 Oct 2023
राज्यासह देशात गुलाबी थंडी, किमान तापमानात घट; नोव्हेंबरमध्ये धुकेही वाढणार

नागपूर: दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, तर जम्मू-काश्मीर, लेह, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सविस्तर वाचा...

12:33 (IST) 30 Oct 2023
“मंत्र्यांच्या सभा उधळून लावणार”, मराठा समाजाचा इशारा; अकोल्यात खासदार, आमदारांच्या घरासमोर आत्मक्लेश आंदोलन करणार

अकोल्यातील लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय खासदार, आमदार यांच्या घरासमोर तीव्र आत्मक्लेश आंदोलन करण्याचे ठरले असून हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केले जाणार आहे.

सविस्तर वाचा...

12:30 (IST) 30 Oct 2023
गेट सेट गो… ‘इंडिगो’चे लवकरच गोंदियातील बिरसी विमानतळावरून ‘टेक ऑफ’, डिसेंबरपर्यंत प्रवासी सेवेचा…

गोंदिया: बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून, या विमानतळावरील खंडित झालेली प्रवासी विमान वाहतूक सेवा लवकरच पूर्ववत होणार आहे. येथून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यास इंडिगो एअरलाइन्सने अनुकूलता दर्शविल्याची माहिती दोन महिन्यांपूर्वी पुढे आली होती.

सविस्तर वाचा...

12:22 (IST) 30 Oct 2023
अखेर प्रशासनाला आली जाग! लेखी आश्वासनाने धाड ग्रामपंचायतमधील बैठा सत्याग्रह मागे; २ नोव्हेंबरला भ्रष्टाचाराची चौकशी

बुलढाणा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी सत्याग्रह करणाऱ्या सदस्यांसोबत तब्बल तीन तास चर्चा केली.

सविस्तर वाचा...

12:22 (IST) 30 Oct 2023
भाजपा नेत्यांची पाठ फिरताच डोंबिवलीतील फडके रस्त्याला फेरीवाल्यांचा विळखा, रस्त्याच्या दुतर्फा रस्ते अडवून ठेले

डोंबिवली – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे फडके रस्ता भागात कार्यक्रमासाठी येणार म्हणून शनिवारी संध्याकाळ ते रविवारी पहाटेपर्यंत फेरीवाला मुक्त केलेला फडके रस्ता भाजपा नेत्यांची पाठ फिरताच पुन्हा फेरीवाल्यांनी व्यापला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा रस्ता, पदपथ अडवून कायमस्वरुपी ठेले बांधण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा...

12:09 (IST) 30 Oct 2023
पुणे : रेल्वे स्थानकावर आता स्वस्तात पाणी! पाच रुपयांत एक लीटर

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना अखेर काही महिन्यांनंतर पुन्हा स्वस्तात पाणी मिळू लागले आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावर वॉटर व्हेंडिंग यंत्रे बसविली आहेत. त्यातून प्रवाशांना पिण्याचे स्वच्छ पाणी पाच रुपये लीटर दराने मिळत आहे.

सविस्तर वाचा..

12:09 (IST) 30 Oct 2023
कल्याण लोकसभेसाठी भाजपा कार्यकर्त्यांच्या मनातील उमेदवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती

डोंबिवली – कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मनात असलेल्या उमेदवारालाच उमेदवारी दिली जाईल. उमेदवारीवरून कार्यकर्ते नाराज होणार नाहीत, असा कोणताही निर्णय भाजपा वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार नाही, असे आश्वासन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी येथील ब्राह्मण सभेत भाजपा कार्यकर्त्यांना दिला.

सविस्तर वाचा...

12:08 (IST) 30 Oct 2023
मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक एप्रिल महिन्यात, २१ एप्रिल रोजी मतदान, २४ एप्रिल रोजी निकाल

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक रातोरात स्थगित केल्यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण होते. सत्ताधारी आणि विरोधकांमधील टीका शिगेला पोहोचली होती. निवडणूक स्थगितीचा मुद्दा न्यायालयातही जाऊन पोहोचला. अखेर विद्यापीठाने बहुप्रतीक्षित नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.

सविस्तर वाचा...

12:08 (IST) 30 Oct 2023
पुणे : नकटी बोलल्याने सासू-सुनेत वाद; सुनेने केला सासूच्या हातावर सुरीने वार

पुणे : सासू-सुनेत नकटी बोलल्याने वाद झाल्याने सुनेने थेट स्वयंपाक घरातील सुरीने सासूच्या हातावर वार केल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा...

12:07 (IST) 30 Oct 2023
पुणे : घोरपडे पेठेत मध्यरात्री सदनिकेत शिरून परप्रांतीय तरुणावर गोळीबार; तरुणाचा गोळीबारात मृत्यू

पुणे : घोरपडे पेठेत मध्यरात्री एका सदनिकेत शिरून परप्रांतीय कामगारावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाला. पसार झालेल्या हल्लेखाेराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून, खुनामागचे निश्चित कारण समजू शकले नाही.

सविस्तर वाचा..

12:06 (IST) 30 Oct 2023
आरक्षणासाठी जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक; नेत्यांसह मंत्र्यांना गावबंदी, कँडल मार्च, पदाधिकाऱ्यांचे उपोषण

जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत समाज शांत बसणार नाही, असे समाजबांधवांनी सांगत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सविस्तर वाचा...

11:59 (IST) 30 Oct 2023
भविष्य सांगण्याच्या बहाण्याने तरुणाला लुटले; जळगावमधील चोरटे गजाआड

पुणे: भविष्य सांगण्याच्या बहाण्याने तरुणाला कोरेगाव पार्क भागात लुटून पसार झालेल्या जळगावमधील चोरट्यांना पोलिसांनी अटक केली.

सविस्तर वाचा...

11:46 (IST) 30 Oct 2023
पनवेल : कळंबोली येथे मराठा आरक्षणासाठी बांधव एकवटले

२४ तासांमध्ये पाचशेहून अधिक मराठा व इतर जाती धर्माच्या रहिवाशांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदविला.

सविस्तर वाचा...

11:41 (IST) 30 Oct 2023
"मी जीव देईन, माझ्या भावावर..."; हंबरडा फोडत महिला आंदोलक म्हणाल्या...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज (३० ऑक्टोबर) सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र, मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाल्याशिवाय आपण पाणी, उपचार काहीही घेणार नसल्याची भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडमधून एक महिला आंदोलक आपल्या आजारी मुलासह अंतरवाली सराटी येथे आल्या आणि जरांगेंची प्रकृती पाहून हंबरडा फोडला. यावेळी त्यांनी जरांगेंना काही झाल्यास मी विष पिऊन जीव देऊन, असा इशाराही दिला.

सविस्तर वाचा...

11:40 (IST) 30 Oct 2023
"'आय लव्ह यू फडणवीसजी', असं..."; सुषमा अंधारेंनी भरसभेत केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या...

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिकांवरून जोरदार शाब्दिक हल्ला केला. "देवेंद्र फडणवीस त्यांचा आणि गुणरत्न सदावर्तेंचा संबंध नाही म्हणतात, पण सदावर्ते 'आय लव्ह यू फडणवीसजी'", असं म्हणत असल्याची टीका केली.

सविस्तर वाचा...

11:36 (IST) 30 Oct 2023
केवळ विदर्भातच ६६ लाख बेरोजगार! वामनराव चटप म्हणाले, “यावर स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव उपाय”

बुलढाणा: महाराष्ट्रात बेरोजगारीचा भस्मासूर वेगाने फोफावत आहे. राज्यकर्त्यांच्या दुर्लक्ष व शोषणाचा बळी ठरलेल्या विदर्भातच रोजगारहीनांची संख्या तब्बल ६६ लाखांपर्यंत असल्याची धक्कादायक माहिती स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळीचे प्रमुख नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी दिली.

सविस्तर वाचा...

11:32 (IST) 30 Oct 2023
मराठा आरक्षणासंदर्भात घडामोडींना वेग; सरकारकडून महत्त्वाची बैठक सुरू

सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू आहे. यावेळी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे , मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे, विशेष निमंत्रित मंत्री दिलीप वळसे पाटील, दीपक केसरकर, समितीचे सदस्य मंत्री दादा भुसे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, शंभूराज देसाई, उदय सामंत, आमदार प्रवीण दरेकर, योगेश कदम, भरत गोगावले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ , मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित.

11:27 (IST) 30 Oct 2023
ललित पाटील प्रकरणानंतर ससूनच्या कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षांनाही पद नकोसे

ललित पाटील याने पलायन करण्याच्या काही दिवस आधी २७ सप्टेंबरला कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षपदी डॉ. धिवारे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

सविस्तर वाचा...

11:25 (IST) 30 Oct 2023
मेधा पाटकर यांना जीवनगौरव, सारंग बोबडेंना सेवार्थ सन्मान; डॉ. गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

चंद्रपूर: समाजसेवक डॉ. गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान व सेवार्थ ग्रुपच्यावतीने सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना व नव्या पिढीतील आश्वासक सामाजिक योगदानासाठी दिला जाणारा सेवार्थ सन्मान चंद्रपूर येथील देशपातळीवर कार्यरत ‘डोनेटकार्ट’चे संस्थापक सारंग बोबडे यांना जाहीर करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

11:25 (IST) 30 Oct 2023
सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमीच; पश्चिम विदर्भाच्या बाजारातील चित्र

अमरावती: पश्चिम विदर्भातील बाजारात सोयाबीनची आवक मागील काही दिवसांपासून वाढत आहे. पण दुसरीकडे सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा कमीच आहेत.

सविस्तर वाचा...

11:22 (IST) 30 Oct 2023
यवतमाळमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरला डांबर फासले, फलक फाडले

यवतमाळ: येथे आज सोमवारी होत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावर मराठा आंदोलनाचे तीव्र सावट दिसत आहे. शहर या अभियानासाठी ‘फलकमय’ झाले असताना शहरातील आर्णी मार्गावर अनेक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या फलकांवर डांबर फासण्याची घटना उजेडात आली.

सविस्तर वाचा...

11:21 (IST) 30 Oct 2023
दिवाळीनिमित्त गावी जाताय? एसटीच्या जादा गाड्यांचे नियोजन जाणून घ्या…

या गाड्या स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवारी), खडकी आणि पिंपरी-चिंचवड आगारातून सोडण्याचे नियोजन आहे.

सविस्तर वाचा...

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावताना दिसत आहे.