scorecardresearch

Premium

सांगली : विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाजाचा मोर्चा

धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता.

sangli dhangar rally, dhangar community demands reservation from st category
सांगली : विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाजाचा मोर्चा (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

सांगली : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी धनगर समाजाच्या वतीने तासगावात भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेळ्या, मेंढ्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले. धनगर जमात आरक्षण कृती समिती तासगावच्यावतीने आयोजित मोर्चामध्ये सहभागी होत खासदार संजयकाका पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, युवक नेते प्रभाकर पाटील यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. तासगाव तालुक्यातील सर्व गावातून शेकडो धनगर समाज बांधवांनी भिलवडी नाका येथून धनगरी ढोल व कैताळाचा गजर करत गजी नृत्य करीत मोर्चाला सुरूवात केली. कोकणे कॉर्नर, सिध्देडर चौक, वंदे मातरम् चौक , बागणे बिल्डिंग या मार्गावरून मोर्चा बसस्थानक चौकात आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले.

हेही वाचा : “मराठा आंदोलनाची दिशा भरकटली”, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर जरांगे संतापले; म्हणाले, “आमच्या वाट्याला…”

Allegation of the farmers association of abuse of onion producers
कांदा उत्पादकांची कुचेष्टा केल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप; निर्यातबंदी उठवल्याच्या अधिसूचनेची प्रतीक्षाच
Bank of Baroda Bharti 2024 announced new recruitment notifications for various posts Know More Details
BOB Bharti 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; ‘या’ विविध पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जातील सर्व तपशील
extension, equal water supply, scheme, pune municipal corporation,
पुण्यातील समान पाणीपुरवठा योजनेला पुन्हा मुदतवाढ… ‘हे’ आहे कारण
farmers march on new delhi for law for minimum support price of crops
शेतकऱ्यांना रोखण्यासाठी व्यूहरचना; किमान आधारभूत किंमतीसाठी कायदा करण्याची मागणी

धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे तासगाव शहरात भव्य स्मारक उभारावे, तसेच मेंढपाळ व मेंढ्यांवर होणारे हल्ले थांबवावेत. हल्ले करणार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी व मेंढपाळ बांधवांना संरक्षण मिळावे, आदी मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे, युवक नेते उमेश गावडे, वकील विनायक पाटील, अर्जुन थोरात, श्रीनिवास पाटील, प्रभाकर पाटील, बाळासाहेब एडके, अमोल हुलवाने, विकास मस्के रामभाऊ थोरात, मारुती एडके, राहुल हजारे, मारुती एडके यांसह मान्यवर उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In sangli dhangar community hold massive rally for demand of reservation under st category css

First published on: 30-10-2023 at 17:19 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×