Mumbai Maharashtra : वैष्णवी हगवणे प्रकरणाचा तपास एकीकडे चालू असताना त्यावरून राज्यात राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. हगवणे कुटुंबीयांचे राजकीय संबंध आणि त्यांना संरक्षण मिळत असल्याच्या आरोपांची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच महिला आयोगाच्या कारभारावरदेखील विरोधकांकडून हल्लाबोल केला जात आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

Live Updates

Latest Maharashtra News Live Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा...

18:22 (IST) 3 Jun 2025

पाच लाख द्या अन्यथा; सूनेला हाकललं, पोलिसात गेल्यास..

५ लाखांचा हुंडा द्या, अन्यथा तुमच्या मुलीला घरी परत घेऊन जा. आमचे नक्षल्यांशी संबंध असून तुम्ही पोलिसात गेल्यास तुमच्या कुटुंबाला ठार करू,' अशी धमकी देत नागपूरच्या सासरकडील मंडळींनी नवविवाहितेला लग्नाच्या अवघ्या ६० दिवसांत अंगावरील कपड्यांसह घरातून हाकलून दिल्याची धक्कादायक घटना घडलीय. ...अधिक वाचा
18:04 (IST) 3 Jun 2025

नियंत्रण रेषा ओलांडणाऱ्या सुनीताची एनआयए’ कडूनही चौकशी, काश्मीरला नेणार..

कपिलनगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या संत कबीर नगर येथील रहिवासी सुनीता जमगडे काही दिवसांपूर्वी नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बेकायदेशीरपणे पाकिस्तानात गेल्या होत्या. ...सविस्तर बातमी
17:21 (IST) 3 Jun 2025

पाकिस्तानात गेलेल्या सुनीताच्या मागावर आता कारगिल पोलीस

एका सर्वसामान्य महिलेला थेट पाकिस्तानात जाणे कसे काय शक्य झाले. तिचे पाकिस्तानशी काय संबंध आहे? ती हेर तर नाही ना? , असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून तपास यंत्रणा या प्रश्नांचे उत्तरे शोधू लागल्या आहेत. ...वाचा सविस्तर
17:01 (IST) 3 Jun 2025

टिप्परने घेतला तरुणाचा बळी; एकुलता एक मुलगा गमावला, दुसऱ्याचे दोन्ही पाय निकामी

शुभम चंद्रशेखर हटवार असे मृताचे नाव असून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव वेदांत राजू करंजेकर असे आहे.दोघेही मंढईपेठ अड्याळ येथील रहिवासी आहेत. राजूवर भंडारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...सविस्तर बातमी
16:41 (IST) 3 Jun 2025

अबब ! राज्यात ५४ लाख विधवा आणि अधिक ? अशी आहे स्थिती.

एक तर कोणाचा आधार नसल्याने स्वकष्ट आले व परत गैरफायदा घेण्याची वृत्ती. पण या अशा विधवा, परित्यक्ता म्हणजेच एकल महिलांबाबत आता त्यांना संरक्षण देण्याची भूमिका मांडल्या जात आहे. त्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा विचार बळावत आहे. ...अधिक वाचा
16:22 (IST) 3 Jun 2025

पोलिसांची करामत; रस्त्यावर झाडे तोडणाऱ्याला केले दंगलीचा आरोपी

मार्चमध्ये नागपूर शहरात उसळलेल्या हिंसाचाराने मोठी खळबळ उडवली आणि या हिंसाचाराची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली. ...सविस्तर बातमी
16:18 (IST) 3 Jun 2025

आणीबाणीतील बंदिजनांचा होणार सन्मान, मराठवाड्यातील ६८० जणांचा समावेश, महिन्याच्या १५ तारखेपर्यंत मानधन देण्याचे आदेश

मराठवाड्यातील ६८० जणांचा यात समावेश असून, त्यासाठी ४ कोटी ८३ लाख २५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...सविस्तर वाचा
15:58 (IST) 3 Jun 2025

नीतेश राणेंवर अल्पसंख्याक आयोग नाराज; काय म्हणाले प्यारे खान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे प्यारे खान यांनी म्हटले आहे.अलीकडे त्यांनी गोवंश बंदी आणि कुर्बाणी यावरून त्यांनी पुन्हा मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. ...सविस्तर बातमी
15:41 (IST) 3 Jun 2025

नवीन कुलगुरू नियुक्तीचा मुहूर्त निघाला, या विद्यापीठाला मिळणार नवीन कुलगुरू; समिती गठित

आठ महिन्यांपासून नवीन कुलगुरू निवडीसाठीची समिती गठित होत नव्हती. आता अखेर राज्यपालांनी समिती गठित केली आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून लवकरच कुलगुरू निवड प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. ...सविस्तर वाचा
15:36 (IST) 3 Jun 2025

कल्याण पूर्वेत ४४ टवाळखोर तरुणांवर पोलिसांची कारवाई

४४ टवाळखोर तरूणांंवर कोळसेवाडी पोलिसांनी रविवारी रात्री कारवाई केली. ...सविस्तर बातमी
15:00 (IST) 3 Jun 2025

गोंदिया जिल्हा बँकेची निवडणूक ; सत्तेची किल्ली ८९४ मतदारांच्या हाती, सर्व उमेदवारांचे अर्ज पात्र..

बँकेच्या सत्तेची किल्ली आपल्याकडे यावी, या अनुषंगाने राजकीय पक्षाचे पुढारीही कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे पॅनलने अद्यापही अधिकृत उमेदवारांचे पत्ते उघडले नसले तरी निवडणूक लढविणाऱ्यांनी मतदारांशी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. ...वाचा सविस्तर
14:41 (IST) 3 Jun 2025

यंदा दोन टप्प्यात रंगणार हिरव्या देवाची यात्रा; केवारवाडी आणि मासले बेलपाड्यात रंगणार यात्रा

५ जून रोजी मुरबाडच्या वेशीवर असलेल्या केवारवाडी येथे ही यात्रा संपन्न होईल. यजमान केवारवाडी गावात ग्रामस्थांनी सांभाळलेली देवराई, जंगल आहे. काळू नदीच्या बाजूला हा समृद्ध भाग आहे ...सविस्तर वाचा
14:39 (IST) 3 Jun 2025

BKC Metro Station: पावसाची भीती.. संपूर्ण मेट्रो स्टेशनच झाकून टाकलं!

मुंबईत संपूर्ण बीकेसी मेट्रो स्टेशन ताडपत्रीने झाकून टाकण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आचार्य अत्रे चौक स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते. या पार्श्वभूमीवर पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यास मेट्रो स्टेशनमध्ये पाणीगळती होऊ नये, यासाठी संपूर्ण स्टेशवरच ताडपत्री टाकण्यात आली आहे.

14:39 (IST) 3 Jun 2025

दिल्लीतील टॅटू आर्टिस्टची मूर्तिजापूर मध्ये हत्या; तब्बल ११ महिन्यानंतर मुंबईतून आरोपी गजाआड

रोजगारासाठी दिल्ली, मुंबई ते मूर्तिजापूर असा दोघांनी प्रवास केला. त्यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या वादातूनच प्रियकराने तिची निर्घृण हत्या केली. ...सविस्तर वाचा
14:20 (IST) 3 Jun 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची माहिती

प्रत्यक्षात भाजपची सत्ता आल्यानंतर गेल्या ११ वर्षांत यातील एकही आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले नाही. ...अधिक वाचा
14:05 (IST) 3 Jun 2025

गिरीश महाजन यांच्यामुळेच माझा भाचा सात वर्षे तुरूंगात…एकनाथ खडसे यांचा आरोप

सात वर्षे तुरूंगात काढल्यानंतर राजू पाटील याची एप्रिल महिन्यात पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. ...सविस्तर वाचा
14:01 (IST) 3 Jun 2025

शालार्थ आयडी घोटाळ्यात अंतरिम जामीन घेतलेल्या डॉ. शिवलिंग पटवेंकडे बोर्डाच्या अध्यक्षपदाची धुरा

विशेष म्हणजे शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर पटवे यांनी अटकेच्या भीतीने अंतरिम जामीन घेतला असताना त्यांच्याकडे अध्यक्ष पद सोपावण्यात आले आहे. ...सविस्तर बातमी
13:46 (IST) 3 Jun 2025

अमळनेर तालुक्यात तापीच्या पाण्यात बुडाल्याने दोन मुलांचा मृत्यू

ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. दोघांपैकी एकाचा मृतदेह त्याच दिवशी रात्री तर दुसऱ्या मुलाचा मृतदेह मंगळवारी सकाळी सापडला. ...सविस्तर वाचा
13:45 (IST) 3 Jun 2025

दोडामार्ग तालुक्यात हत्ती पकड मोहीम रखडली, प्रवीण गवस यांचे वन कार्यालयात ठिय्या आंदोलन

प्रवीण गवस यांनी हत्ती पकड मोहीम कधी होणार हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत आपले आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. ...सविस्तर बातमी
13:38 (IST) 3 Jun 2025

जालना : दर्शनास गेलेल्या तीन भावंडाचे मृतदेह शेततळ्यात आढळले

तिन्ही मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी पोलिस अधिक करीत आहेत. ...वाचा सविस्तर
13:34 (IST) 3 Jun 2025

वनखात्याला "आयएफएस" धोरणाचा विसर, वनमंत्री गणेश नाईक…

विभागात पदस्थापना करताना संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाचा विचार करुनच नियुक्ती करावी, असे धोरणात नमूद आहे. मात्र, या धोरणालाच तिलांजली देण्याचे काम होताना दिसत आहे. ...सविस्तर वाचा
13:29 (IST) 3 Jun 2025

कल्याण डोंबिवली पालिकेतील वैद्यकीय विभागाची आयुक्तांकडून बदल्या; अनेक वर्षानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या

वैद्यकीय विभागातील या बदल्यांमुळे पालिकेत विविध स्तरातील कर्मचारी समाधान व्यक्त करत आहेत. पालिकेच्या कल्याणमधील मुख्यालयात वैद्यकीय विभागात ठराविक सहा ते सात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मक्तेदारी होती ...वाचा सविस्तर
13:20 (IST) 3 Jun 2025

धुळे जिल्ह्यात २२ लाखांचे बोगस बियाणे जप्त; गुजरातकडून येणार्या खासगी बसमधून वाहतूक

सर्व बोगस बियाणे गुजरातमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणले जात होते, अशी माहिती कृषी विभागातील जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी दिली. ...सविस्तर बातमी
13:14 (IST) 3 Jun 2025

कल्याणमध्ये पर्यटन कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून कारागिरांची फसवणूक, नोकरीचे आमिष दाखवून ३० लाख ४६ हजार रूपयांची फसवणूक

सुमारे दीडशे कारागिरांचे पैसे जमा झाल्यानंतर त्यांना परदेशात नोकरीसाठी पाठवले नसून पर्यटन कंपनीतील कर्मचारी कार्यालयाला टाळे ठोकून पसार झाले आहेत. ...सविस्तर वाचा
13:10 (IST) 3 Jun 2025

ताडोबात हत्तींनी करून दिली वाघांना मोकळी वाट

ओडिशातून आलेल्या हत्तींनी ताडोबा-अंधारी व्याघरप्रकल्पातून काढता पाय घेतला आहे आणि आपला मोर्चा त्यांनी पोंभुर्णा गावाच्या दिशेने वळवला आहे. त्यामुळे ताडोबा प्रशासनासोबतच पर्यटक आणि लगतच्या गावकऱ्यांनी देखील सुटकेचा श्वास सोडला आहे. ...अधिक वाचा
12:44 (IST) 3 Jun 2025

बडनेरा- नाशिक मेमू कजगावला थांबेना;खासदारांचा पाठपुरावा व्यर्थ

भुसावळ विभागाकडून त्याबाबतची कार्यवाही अद्याप करण्यात आलेली नाही. कजगावला मेमू गाडी न थांबल्यास नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ...सविस्तर बातमी
12:17 (IST) 3 Jun 2025

कल्याण डोंबिवली पालिकेतील ठेकेदारांच्या मुदतवाढीला चाप - आयुक्तांचा निर्णय

ही पध्दत अत्यंत चुकीची असून ठेकेदारांची मुदत संपण्याच्या एक महिना अगोदर नवीन ठेकेदार नियुक्तीचे प्रस्ताव दाखल करावेत, अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी पालिकेतील सर्व विभागप्रमुखांना दिला आहे. ...सविस्तर वाचा
12:17 (IST) 3 Jun 2025

Sudhakar Badgujar News: नाशिकमध्ये ठाकरे गटात बंडाळी होणार?

मी स्वत:वरच नाराज आहे. पक्षात काही संघटनात्मक बदल झाले, तेव्हापासून विलास शिंदेसह दहा ते बारा लोकांची टीम नाराज आहे. पक्षप्रमुखांपर्यंत त्यांच्या भावना पोहोचवण्यात आल्या आहेत. संघटनेच्या काही गोष्टी मी स्पष्टपणे बोलू शकत नाही. पण तेव्हा झालेल्या संघटनात्मक बदल झाल्यापासून ही नाराजी पसरली आहे - सुधाकर बडगुजर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नाशिकमधील नेते

12:16 (IST) 3 Jun 2025

Sudhakar Badgujar Unhappy in Thackeray Shivsena: सुधाकर बडगुजर खरंच शिवसेनेत नाराज?

मी म्युनिसिपल कामगार सेनेचा अध्यक्ष आहे. कामगारांच्या काही मागण्यांसाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटलो. आमची सकारात्मक चर्चा झाली. माझ्याबद्दल नकारात्मक चर्चा कुणी केली ते मला माहिती नाही. माझं काम मी करत राहणार - सुधाकर बडगुजर, शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील नेते

11:51 (IST) 3 Jun 2025

अकोल्यात रक्तरंजित थरार; जामिनावरील गुंडाने एकाला संपवले

शहरातील रणपिसे नगरात सोमवारी रात्री हे थरारक हत्याकांड घडले. या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी फरार झालेल्या आरोपीला दोन तासांत अटक केली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. ...सविस्तर वाचा

Ajit Pawar On Sharad Pawar NCP

शरद पवार आणि अजित पवार, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

Latest Maharashtra News Live Today: मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी