Maharashtra Breaking News 15 October 2025: दिवाळी संपल्यानंतर महाराष्ट्रात महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आघाडी-युतीच्या चर्चा जोर धरू लागलेल्या असतानाच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारणही सुरू झालं आहे. त्यातच महाविकास आघाडी अधिक मनसे अशी विरोधकांची निवडणूक आयोगाविरोधात एकजूट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आघाडी वा युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचं सर्वच पक्षांनी जाहीर केल्यामुळे कुठे कुणाची युती तर कोण विरोधात याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
Maharashtra Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील सर्व राजकीय घडामोडींचा आढावा...
सेंद्रीय शेतीमाल खरोखरच सेंद्रीय आहे का? फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाचा महत्त्वाचा निर्णय!
Dada Bhuse : दादा भुसे आमचे भाऊ; दिवाळी त्यांच्या गावात साजरी करू.....मालेगावात कुणी धरला हेका?
PNG Jewellers Diwali Discount : ‘पीएनजी ज्वेलर्स’कडून दिवाळीनिमित्त भरघोस सवलतींचा वर्षाव
नाशिकमध्ये गुन्हेगारांविरोधात बुलडोझर.... लोंढे टोळीच्या साम्राज्याला सुरुंग
नारायण सुर्वे यांच्या साहित्यातून गरिबांना जगण्याचे बळ - संमेलनात सुशिलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन
आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात यांत्रिक पद्धतीने वस्त्र धुलाई!
जळगाव : तरूणाचा धरणात आणि प्रौढाचा गिरणा नदीत बुडाल्याने मृत्यू
निवडणूक आयोग ऐकत नसेल तर आंदोलन हाच पर्याय - सुशीलकुमार शिंदे यांचे मत
MPSC : ‘एमपीएससी’ला नियमित सचिव कोण येणार?, निकाल, परीक्षा सर्वांवर परिणाम होत असताना…
ठाण्यातील म्हाडाचा वृद्धाश्रम आणि महिला वसतिगृह अडचणीत, समूह पुनर्विकासात जागा गेल्याने आता नव्या भूखंडाचा शोध ?
Pawar Family Diwali Celebration : पवार कुटुंबाचा पाडवा होणार की नाही? - अजित पवारांनी दिलं उत्तर
महापालिका निवडणुका 'राष्ट्रवादी' स्वबळावर लढणार का? अजित पवार म्हणाले, 'अपेक्षा...'
CM Devendra Fadnavis Mocks Opposition in Solapur: मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षांना टोला!
मला कधीकधी आश्चर्य वाटतं. अतीवृष्टीसारख्या आपत्तीच्या वेळीही काही लोक राजकारण करतात. काही लोकांच्या डोक्यात तर इतका किडा गेलाय. सोलापुरात मला एक विधान ऐकायला मिळालं. त्यावर हसावं की रडावं मला कळत नाही. इथले एक नेते म्हणाले की सोलापूरमध्ये झालेला इतका पाऊस निसर्गामुळे नाही झाला, तर राज्य सरकारने आणला. हा महापूर राज्य सरकारने आणला. काही हरकत नाही. त्यांना एक फूल द्या आणि गेट वेल सून सांगा. कधीकधी असा मानसिक परिणाम होत असतो. काळजी करण्याचं कारण नाही. पण हे सरकार कितीही आपत्ती आली, तरी आपल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा विळखा; व्यापारी आणि फेरीवाल्यांमध्ये वाद; नागरिकांच्या तक्रारीनंतर कारवाई
डोंबिवलीत होम कुंडात तूप टाकताना ओढणी पेटून भाजलेल्या महिलेचा मृत्यू
वसई - विरार पालिकेच्या माजी आयुक्तांची अटक बेकायदा; ईडीला उच्च न्यायालयाचा तडाखा
काँग्रेसने 'ही' शताब्दी साजरी करायला हवी होती… कोण म्हणाले असे?
हे काय चाललंय नागपूरात…. पेट्रोलपंपावर भर दिवसा चाकू हल्ला, व्हिडिओ व्हायरल
श्रीरामपूर बसस्थानकाचे काम १ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; परिवहन मंत्र्यांचे आदेश
MVA Press Conference: निवडणूक आयोगाशी बैठकीनंतर मविआची संयुक्त पत्रकार परिषद, राज ठाकरेही उपस्थित
२०२४ नंतर आयोगानं संकेतस्थळावर यादी जाहीर केली ज्यात फक्त नावं आहेत. फोटो, पत्ता काहीही नाही. महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना मतदारयाद्या न दाखवण्यातून काय मिळणार आहे? यातून फक्त घोळ होणार आहेत. जोपर्यंत या निवडणुका सुधारल्या जात नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका ही आमची मागणी आहे. पाच वर्षं निवडणुका घेतल्या गेल्या नसतील, तर याद्या सुधारण्यासाठी आणखी ६ महिने गेले तर काय हरकत आहे? आता ते काय निर्णय घेतात ते आम्ही येत्या २-३ दिवसांत पाहू आणि त्यानुसार पुढचं धोरण ठरवू - राज ठाकरेंची भूमिका
संप स्थगितीच्या कारणावरून महावितरण- समितीत जुंपली… वाटाघाटीपूर्वीच पुनर्रचना…
जामखेडमध्ये धुडगूस घालणाऱ्या टोळक्यातील ७ जणांना अटक; गावठी कट्टा व ३ जिवंत काडतुसे हस्तगत
MVA Press Conference: निवडणूक आयोगाशी बैठकीनंतर मविआची संयुक्त पत्रकार परिषद, राज ठाकरेही उपस्थित
राज्य निवडणूक आयोग व केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर दुसरंच कुणीतरी चालवतंय अशी आम्हाला शंका आहे. दुसरंच कुणीतरी त्यात माहिती अपडेट करतंय असा याचा अर्थ आहे - जयंत पाटील यांची माहिती
MVA Press Conference: पत्रकार परिषदे राज ठाकरे व उद्धव ठाकरेंच्या मध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात
राज ठाकरेंच्या मविआ प्रवेशामध्ये काँग्रेसकडून हरकत घेण्यात आल्याचं प्रातिनिधिक चित्र आज मविआच्या पत्रकार परिषदेत दिसून आलं. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे व राज ठाकरेंच्या मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार बाळासाहेब थोरात यांना बसण्यास जागा देण्यात आली होती.
आज आम्ही निवडणूक आयोगाला काही पुराव्यांसह माहिती दिली. मतदार यादीत मतदारांचे पत्ते अपूर्ण, चुकीचे असल्याची बाब निदर्शनास आणून दिली - जयंत पाटील यांची माहिती
भीषण अपघातात पत्नीचे शीर धडापासून वेगळे; पती… ट्रकची दुचाकीला धडक
Video: महामार्गावरील कोंडीमुळे पालकमंत्र्यांचा उलट्या दिशेने प्रवास, नियम फक्त सर्वसामान्यांनाच?
द्रोणागिरी परिसरातील उड्डाणपूलावरील खड्ड्यांत वाढ; नवघर व बोकडवीरा उड्डाणपूलावरील खड्डे आणि काटेरी झुडपांनी प्रवासी त्रस्त
ठाणे महापालिका आयुक्त यांच्या आश्वासनानंतरही अनधिकृत बांधकाम; मनसेने धडक देऊन कारवाईस भाग पाडले
Supriya Sule on Diwali Festival: पवार कुटुंबात या वर्षी दिवाळी साजरी होणार नाही - सुप्रिया सुळे
आमच्या कुटुंबात एक दुर्दैवी घटना घडली. माझ्या भारती काकी आज आमच्यात नाहीत. त्यामुळे यावर्षी पवार कुटुंबात दिवाळी साजरी होणार नाही. आम्ही बारामतीत नेहमीप्रमाणे काही दिवस एकत्र भेटत राहू. पण आम्ही दिवाळी साजरी करणार नाही - सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार

Maharashtra Marathi News Live Updates: मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्या एका क्लिकवर
