Maharashtra Live News Updates, 27 October 2025 : आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रस्सीखेंच पाहायला मिळत आहे. तसेच फलटणच्या जिल्हा उपरुग्णालयात काम करणाऱ्या एका डॉक्टर तरुणीने तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या प्रकरणात देखील आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. याबरोबरच मागील आठवडाभरापासून विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या आणि इतरही राजकीय आणि गुन्हेगारी संबंधीत घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत.

Live Updates

Maharashtra Weather Today Live Updates : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

13:14 (IST) 27 Oct 2025

घोडबंदरच्या गायमुख घाटात पुढील महिन्यात पुन्हा दुरुस्ती

घोडबंदरच्या गायमुख घाटात पुन्हा दुरुस्तीची कामे सुरू होणार असून, नागरिकांमध्ये वाहतूक कोंडीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. ...वाचा सविस्तर
13:00 (IST) 27 Oct 2025

MPSC: ‘एमपीएससी’च्या स्वायत्ततेत राज्य सरकारचा हस्तक्षेप?, सरकारचा प्रतिनिधी आयोगात आल्याने लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षा, निकालावर परिणाम

आयोगाचे कामकाज मंत्रालयाच्या अधीन असल्यासारखे चालवले जात आहे. राज्यपालांची मान्यता न घेता परस्पर दोन पदावर एकाच अधिकाऱ्याची एमपीएससीमध्ये प्रतिनियुक्ती देण्यात आल्याचे थेट एमपीएससीच्या स्वायत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. ...अधिक वाचा
12:39 (IST) 27 Oct 2025

डोंबिवलीत ठाकरे गटाकडून जिल्हाध्यक्ष पदासाठी शोध सुरू, विद्यमान जिल्हाध्यक्ष भाजपच्या वाटेवर?

डोंबिवलीत ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला ऊत आला असून, ठाकरे गटाने नव्या जिल्हाध्यक्षाच्या शोधाला सुरुवात केली आहे. ...सविस्तर वाचा
12:33 (IST) 27 Oct 2025

"हे भ्रष्ट व्यवस्थेने केलेले खून आहेत, हे रोखणं कठीण नाही, पण..."; रोहित पवरांची पोस्ट चर्चेत

"संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे, वैष्णवी हगवणे आणि आता फलटन येथील महिला डॉक्टर हे किडलेल्या आणि भ्रष्ट व्यवस्थेने केलेले खून आहेत. सत्ता संवेदनशील आणि खमक्या हातात असेल तर हे रोखणं कठीण नाही, पण आज सत्तेचा वापर केवळ विरोधकाला संपवण्यासाठी आणि आपली दुकाने राखण्यासाठीच केला जातो. अशा वेळी सरकार जर आपली भूमिका योग्य पद्धतीने वठवत नसेल तर मग जनतेनेच सामूहिकपणे सरकारची वेसण ओढून वठणीवर आणण्याची गरज आहे. अन्यथा राज्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे बळी यापुढंही जात राहतील आणि आपल्याला केवळ मूकपणे बघत बसावं लागेल," अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केली आहे.

12:28 (IST) 27 Oct 2025

कोकण विभागाचे आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी थेट नाशिक जिल्ह्यातील अभ्यासिकेत…कारण पाहून तुम्ही कराल कौतुक…

कोकण विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ देवळा येथील अभ्यासिकेला २०० ग्रंथांची भेट देत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले. ...वाचा सविस्तर
12:22 (IST) 27 Oct 2025

नाराज विकास म्हात्रे म्हणतात ‘धन्यवाद भाजप’ माझ्या राजीनाम्यामुळे रस्ते कामे मार्गी लागली

भाजपचे गरीबाचावाडा प्रभागातील ज्येष्ठ माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपचे वरिष्ठ, स्थानिक नेते आपल्याकडे विकास कामे मार्गी लावण्यासाठी लक्ष देत नाहीत या कारणावरून भाजप सदस्यत्वाचा सपत्नीक राजीनामा दिला आहे. ...सविस्तर बातमी
12:13 (IST) 27 Oct 2025

जे पुण्यात घडले, ते कुठेही घडू शकते… नाशिकमधील मोर्चात जैन समाजाचा सूचक इशारा

पुण्यातील जैन बोर्डिग जमीन बेकायदेशीर विक्री व्यवहाराच्या विरोधात सकल जैन समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...सविस्तर बातमी
12:00 (IST) 27 Oct 2025

शहापूरच्या कन्येची इस्त्रोमध्ये झेप; परिवहन मंत्री, परिवहन विभागाकडून सन्मान

ठाणे शहरातील मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सुजाता मडके यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. ...सविस्तर वाचा
11:45 (IST) 27 Oct 2025

बालभारतीकडून पुस्तकांसाठी निकृष्ट दर्जाच्या कागदाचा वापर; जनहित याचिकेद्वारे आरोप, तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार

या याचिकेवर तातडीच्या सुनावणीची आवश्यकता नाही. परंतु, नियमित न्यायालयासमोर याचिका सुनावणीसाठी येईपर्यंत त्यात उपस्थित मुद्द्यांवर आणि सूचनांवर प्रतिवाद्यांनी विचार करावा, असे आदेशही न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या सुट्टीकालीन एकलपीठाने दिले. ...सविस्तर वाचा
11:33 (IST) 27 Oct 2025

शिक्षक म्हणून करिअर घडविण्याची इच्छा? मग, ही संधी तुमच्यासाठीच…

महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते आठवी वर्गांवर नियुक्ती असलेल्या शिक्षकांना टीईटी (टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट) म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा देणे अनिवार्य झाले आहे. टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ...सविस्तर वाचा
11:20 (IST) 27 Oct 2025

मुंबईत भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन; रोहित पवारांनी मागितले स्पष्टीकरण

"राज्यात जमीन घोटाळे जोमात असताना आज मुंबईत भूमिपूजन होत असलेल्या भाजपा कार्यालयाच्या जागेबाबत देखील वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. सदरील जागा महाराष्ट्र हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन ची ९९ वर्ष लीजवर घेतलेली जागा असून इमारत धोकादायक आहे असे दाखवून ती ताब्यात घेऊन पाडण्यात आली आणि त्या ठिकाणी भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन होत असल्याची चर्चा आहे. एकीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात मोठ्या प्रमाणात रोष असताना भाजपा कार्यालयाच्या जागेबाबतच चर्चा सुरु असतील तर जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो, त्यामुळे भाजपा नेत्यांनी यावर खुलासा करणे योग्य राहील, " असे रोहित पवार म्हणाले आहेत.


10:41 (IST) 27 Oct 2025

चंद्रपूर : कापसी कालवा नुतनीकरणात १० कोटींचे नुकसान; कंत्राटदाराच्या फायद्यासाठी अधिकाऱ्यांनी चक्क…

गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आसोलामेंढा प्रकल्पाच्या कापसी कालव्याच्या नुतनीकरणाची ४१ कोटीची निविदा होती. मात्र कंत्राटदारांच्या स्पर्धेत ३१ कोटींत हे काम संबंधित कंत्राटदारास देण्यात आले. ...सविस्तर वाचा
10:41 (IST) 27 Oct 2025

CIDCO: सिडकोच्या स्वप्नपूर्ती घरातील नागरिकांची स्वप्न पाण्यात….! ऐन दिवाळीत नागरिकांचे पाण्यावाचून हाल

सिडकोच्या वतीने पनवेल परिसरात खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा, उलवे या परिसरात एक लाख घरांची उभारणी केली आहे. याच सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीत महत्वाची भूमिका बजावली आहे. ...वाचा सविस्तर
10:41 (IST) 27 Oct 2025

जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वप्नातील रिंग रोड खड्ड्यात…!

राष्ट्रीय महामार्गावरील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावापासून सुरू होणारा प्रस्तावित रिंग रोड फुपनगरी, ममुराबाद, आसोदा, तरसोद, नशिराबाद, कुसुंबा, मोहाडी आणि सावखेडा मार्गे पुन्हा पाळधीला जोडला जाणार होता. ...अधिक वाचा
10:41 (IST) 27 Oct 2025

‘‘सध्या मराठीकडे दुर्लक्ष’’ भाजपच्याच खासदार असे का म्हणाल्या ?

राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी मराठी भाषेकडे वाढत्या दुर्लक्षाबद्दल चिंता व्यक्त करत, लिखित भाषेशी प्रामाणिक राहण्याचे आवाहन केले. ...सविस्तर वाचा
10:41 (IST) 27 Oct 2025

ठाण्यात शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांचे खुले आव्हान, म्हणाले, “आम्हाला सोडून गेलेल्यांचे पानिपत केल्याशिवाय...’’

कळव्यातील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची काही महिन्यांपूर्वी साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे कळव्यात शरद पवार गटाची ताकद कमी झाल्याचे चित्र होते. ...सविस्तर बातमी
10:40 (IST) 27 Oct 2025

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा कारभार एकचालकानुवर्ती…? विश्वस्त मंडळाच्या सभांवर सल्लागारांचा अंकुश

कार्यवाह सुरेश भटेवरा यांच्या राजीनाम्यामुळे प्रतिष्ठानचा कारभार चर्चेत आला आहे. ...सविस्तर वाचा
10:39 (IST) 27 Oct 2025

‘FTII’च्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ ? विद्यार्थ्यांनी केली मोठी मागणी

एफटीआयआय’ने १७ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या अंतिम गुणवत्ता यादीत आरक्षण धोरणाचे उल्लंघन झाले होते. ही बाब विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणल्यानंतर प्रशासनाने यादीत ‘लिपिकीय त्रुटी’ असल्याचे मान्य केले होते. ...सविस्तर बातमी
10:38 (IST) 27 Oct 2025

Panvel-Karjat Railway: पनवेल- कर्जत रेल्वे मार्ग केव्हा होणार सुरु, किती काम पूर्ण वाचा

रेल्वे विकास महामंडळाकडून कर्जत ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान काॅरिडाॅर निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...सविस्तर वाचा
10:38 (IST) 27 Oct 2025

लोंढे टोळीतील अकराव्या संशयिताला अटक - सातपूर गोळीबार प्रकरण

सातपूर येथील एका हॉटेलमध्ये लोंढे टोळीतील प्रमुख भूषण लोंढे याने गोळीबार करत दहशत माजविण्याचा प्रकार केला. यात एक जण जखमी झाला. ...अधिक वाचा
10:38 (IST) 27 Oct 2025

धंगेकर यांची भूमिका भाजपविरोधात नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, रवींद्र धंगेकर यांची भूमिका भाजपविरोधात नसून गैरसमजातून झाली असल्याने महायुतीत मतभेद नाहीत. ...सविस्तर बातमी
10:37 (IST) 27 Oct 2025

Pune Noise Pollution: दिवाळीत फटाक्यांचा आवाज जास्तच! गेल्या वर्षीच्या तुलनेत ध्वनिप्रदूषणात मोठी वाढ

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळीतील दुसऱ्या दिवशी २० ऑक्टोबर व तिसऱ्या दिवशी २१ ऑक्टोबरला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १४ ठिकाणी आवाजाच्या नोंदी घेतल्या. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीत आवाजाची पातळी जास्त नोंदविण्यात आली. ...सविस्तर वाचा
10:37 (IST) 27 Oct 2025

Pune Air Pollution : दिवाळीत वायुप्रदूषण कमी की जास्त?

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समीर उपयोजनवरील (ॲप) प्रदूषणाच्या नोंदी करणारी काही केंद्रे दिवाळीच्या काळात सक्रिय नसल्याचे उघड झाले आहे. यामुळे दिवाळीत वायुप्रदूषणात घट झाली होती का, असा सवाल विचारला जात आहे. ...अधिक वाचा
10:30 (IST) 27 Oct 2025
"अमित शाह कुदळ मारतील तेव्हा ते रहस्य बाहेर येईल", अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी संजय राऊतांचे विधान

भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईतील भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. अमित शाह मुंबईला येत आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन करण्यासाठी येत आहेत. समुद्रासमोर मरिन लाईन्सला भव्य आलीशान कार्यालय उभारण्याचे त्यांनी ठरवलं आहे. हजारो स्क्वेअर फूटचे ते कार्यालय आहे. प्रश्न इतका आहे की मरिन लाईन्सला अद्याप मराठी भाषा भवन होऊ शकलं नाही. भूमिपूजन होईन देखील मराठी भवन अडकून पडलं आहे. पण आज गृहमंत्री एका पंचतारांकित कार्यालयाचे भूमिपूजन करण्यासाठी येत आहेत. त्यांचे स्वागत आहे, असे राऊत म्हणाले.

मी अमित शाहांना किती वेगाने काम केलं जात आहे याबद्दल पत्र लिहिलं आहे. राफेलच्या वेगाने फाईल हलतेय आणि काही तासांमध्ये सर्व अडथळे दूर करून ती महापालिकेची जागा भारतीय जनता पक्षाला देण्यात आली. साडेतीन वर्ष मुंबई महापालिकेत प्रशासन आहे. त्या प्रशासकाच्या माध्यमातून हा संपूर्ण व्यवहार करून घेतला. महापालिकेत नागरी सुविधांच्या फायली हालत नाहीत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल हललेली नाही. पण भारतीय जनता पक्षाच्या पंचतारांकित हेडक्वार्टरची फाईल ज्या राफेलच्या वेगाने हलली ते रहस्य त्या जमिनीखाली दडलेलं आहे. त्याचं भूमिपूजन अमित शाह करत आहेत.

संजय राऊत पुढे म्हणाले की, अमित शाह जेव्हा कुदळ मारतील तेव्हा ते रहस्य बाहेर येईल. मी फक्त देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना कळवल आहे की तुम्ही जी कुदळ मारत आहात त्याचं सहस्य समजून घ्या. आपण ज्या जमिनीवर भूमिपूजनाची कुदळ मारताय त्या जमिनीखाली महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी पुरलेलं कोणतं रहस्य आहे याचा अभ्यास त्यांनी करावा अशी माझी मागणी आहे असे संजय राऊत म्हणाले.

10:29 (IST) 27 Oct 2025

रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Raigad Rain : अवकाळी पावसाच्या धसक्याने शेतकऱ्यांनी भातकापणीची कामे थांबवली आहेत, तर खराब हवामानामुळे गेटवे-मांडवा जलवाहतूक सेवा बंद झाली आहे. ...सविस्तर बातमी

Maharashtra Weather Today Live Updates : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर