Maharashtra Mumbai Live News Updates, 31 October 2025 : राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यातच फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केलं होतं. त्यानंतर अखेर राज्य सरकारने २०२६ मध्ये कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि मतचोरीविरोधात महाविकास आघाडीचा निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मोर्चा होणार आहे. या मोर्चात पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र दिसणार आहेत. याचबरोबर मुंबईमधील पवई या ठिकाणी एका फिल्म स्टुडिओमध्ये गुरुवारी दुपारी रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीने १७ मुलांसह दोघांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, पोलिसांनी अवघ्या ३५ मिनिटांत १७ पीडितांची सुटका केली. या कारवाईत आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाला. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Maharashtra Mumbai Weather Today Live Updates : राज्यातील राजकीय इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
जि. प. ॲपवर हजेरी न नोंदविणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात
आदिवासी कीडा प्रबोधिनी स्थापन करणार - मंत्री डाॅ. अशोक उईके यांची ग्वाही
प्रारंभ कला अकॅडमीच्या ‘आम्ही साऱ्याजणी’ महोत्सवाचे यंदाचे १३ वे वर्षे
रिक्षा चालविताना मोबाईल वापरल्याने अपघात, तीन अल्पवयीन मुले जखमी
“शेतकऱ्यांना न झुलवता कर्जमुक्त करा”, उद्धव ठाकरे आक्रमक; पत्राद्वारे सरकारला विचारले ‘हे’ पाच महत्वाचे सवाल
Uddhav Thackeray On Farmers Loan Waiver : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्यासह काही शेतकरी नेत्यांनी नागपूरमध्ये मोठं आंदोलन केलं. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या पार्श्वभूमीवर एक समिती स्थापन करण्यात आल्याचा निर्णय सरकारने घेतला. तसेच या समितीच्या अहवालानंतर आणि ३० जून २०२६ च्या आधी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं. मात्र, तूर्तास तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचं आंदोलन; पुण्यात कार्यालयाबाहेर शाब्दिक वाद
डांबरीकरणासाठी शहाड पूल पुन्हा बंद; सकाळ, संध्याकाळ पाच पाच तास वाहतूक बंद, पुन्हा कोंडीची शक्यता
रोहित आर्य विषयी खासदार अमोल कोल्हेंनी सरकारला धरलं जबाबदार; म्हणाले, "त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे…"
ठाणे रेल्वे स्थानकातील तीन फलाटांची लांबी वाढणार, गर्दीवरील नियंत्रणासाठी तसेच भविष्यात १५ डब्याच्या रेल्वेगाड्यांसाठी नियोजन
मुंबईतील १४० झोपु योजनांना ‘काम बंद’ नोटिसा! भाडे थकबाकी, प्रदूषणामुळे प्राधिकरणाकडून कारवाई
पुण्यात डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी काँग्रेसचे आंदोलन; भाजपच्या विरोधात काय दिल्या घोषणा?
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी देशव्यापी सर्वेक्षण! वैद्यकीय आयोगाचे महाविद्यालयांना आवाहन…
साईबाबा साकारणारे अभिनेते सुधीर दळवी यांच्या उपचारार्थ शिर्डीकरांचा मदतीचा हात
आर्या याच्या एन्काऊंटरवरून आव्हाडांची सरकारवर गंभीर टीका, म्हणाले "संस्थात्मक मर्डर..."
नितीन गडकरींची नाराजी: वन खात्याच्या अडथळ्यांमुळे महामार्ग विकास ठप्प
कोल्हापूरमध्ये सतेज पाटलांच्या नेतृत्वाची कसोटी
'सरकारने कर्जमाफीची तारीख असली तरी...', बच्चू कडू यांचा सरकारला पुन्हा इशारा
प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्यासह आदी शेतकरी नेत्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये आंदोलन केलं. त्यानंतर बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा पार पडली. यावेळी ३० जून २०२६ च्या आधी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलं. दरम्यान, यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'सरकारने कर्जमाफीची तारीख दिली असली तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत आम्ही सरकारला शांत बसू देणार नाही', असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंनी सलग दुसऱ्यांदा माथाडी मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने शिलेदार अडचणीत
Video: कल्याणमधील चक्कीनाका येथे वाहतूक पोलिसांना उल्हासनगरच्या मद्यपी चालकाची धक्काबुक्की
"माझ्या पतीच्या हत्येत त्यांचाही सहभाग" आत्मसमर्पित नक्षल नेत्यांवर मृत नक्षल नेत्याचा पत्नीचे गंभीर आरोप…
Video: Big Boss 19: जर तू जलद विरार लोकलने प्रवास… लोकलच्या प्रवासाबाबत प्रणित मोरेने सांगितलेला ‘हा’ अलिखित नियम
Video: दीपेश म्हात्रेंच्या तुऱ्यात ‘कमळ’…डोंबिवलीचा उगवता सूर्य, जनसेवक म्हणून बॅनरबाजी
बच्चू कडू म्हणाले, "तारखेपासून पळणाऱ्या सरकारला तारखेवर आणले, फासावर जाण्यासही…"
आयआयएम मुंबईच्या विद्यार्थ्यांना आंतरवासितासाठी ४.८ लाख रुपये मानधन
लोकमान्यनगर पुनर्विकास प्रकल्पाच्या वादात आदित्य ठाकरे यांची उडी; प्रकल्पाला स्थगिती कशासाठी ? ठाकरे यांची विचारणा
Gold-Silver Price : लग्नसराई सुरू होण्यापूर्वी सोने, चांदीत ‘हा’ बदल… जळगावमध्ये आता काय स्थिती ?
Jalgaon Politics: जळगावमध्ये ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का… ‘हे’ मोहरे भाजपच्या गळाला…!
‘‘मी कधीच विचार केला नव्हता की तो इतक्या टोकाला जाईल…’’ रोहित आर्याचे पुण्यातील शेजारी काय सांगतात?
गोंदिया जिल्ह्याला परतीच्या पावसाचा पुन्हा फटका; धानाचे नुकसान, शेतकरी चिंताग्रस्त…
शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! 'या' शेतमालांची हमीभावाने शासकीय खरेदी, ऑनलाईन नोंदणीला प्रारंभ

 रोहित आर्यने ओलीस ठेवलेल्या १७ मुलांना काय सांगितलं होतं? मुलीने सांगितला सुटकेचा थरार! म्हणाली, “आधी आम्हाला…”, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
