Maharashtra Mumbai News Live Updates, 01 October 2025: २ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या निमित्ताने एकीकडे सणासुदीचं वातावरण असताना दुसरीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा मेळावा नेस्को सेंटरला होणार आहे. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त दसऱ्याला होणाऱ्या मेळाव्याचीही चर्चा आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये या मेळाव्यांवरून जुंपली असून मेळाव्यासाठी होणाऱ्या खर्चाच्या आकडेवाऱ्या दोन्ही बाजूंनी दिल्या जात आहेत.

Live Updates

Marathi News Live Update: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा...

14:14 (IST) 1 Oct 2025

टीईटी परीक्षा सक्तीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रद्द करणार ?

यासंदर्भात सर्व शिक्षकांना आता महाराष्ट्र सरकार हा एकमेव आधार वाटत आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे निवेदनाव्दारे सर्व परिस्थिती मांडली आहे. ...वाचा सविस्तर
13:54 (IST) 1 Oct 2025

VIDEO: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबरला, अदानींची पोस्ट चर्चेत...

Gautam Adani Post : उद्घाटनापूर्वी गौतम अदानी यांनी अपंग, बांधकाम कामगार, महिला कर्मचारी आणि अभियंत्यांना भेटून भावनात्मक पोस्ट शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली. ...सविस्तर वाचा
13:53 (IST) 1 Oct 2025

Video: संतापजनक : भररस्त्यात तरुणीला मारहाण, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

पुणे शहरातील के.के मार्केट ते चव्हाणनगर रोड दरम्यान मंगळवारी रात्रीच्या सुमारास भररस्त्यात तरुणीला एकजण लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत असल्याची घटना घडली आहे. ...वाचा सविस्तर
13:47 (IST) 1 Oct 2025

जळगावात अजित पवार गटाच्या ताब्यातील जिल्हा बँकेचा मालमत्ता विकण्याचा धडाका...!

एकनाथ खडसे यांच्यासारख्या विरोधी पक्षातील ज्येष्ठ संचालकांनी जिल्हा बँकेच्या निर्णयाला कडाडून विरोध सुद्धा केला आहे. ...सविस्तर वाचा
13:31 (IST) 1 Oct 2025

नवरात्रात नवा थरार; ‘अवकाश स्थानका’च्या दर्शनाचे ‘चार वार’

अवकाशात नवरात्रात नवा थरार अनुभवण्याची संधी उपलब्ध होत आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे सलग चार दिवस दर्शन होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाश प्रेमींसाठी मोठी संधी उपलब्ध झाली. ...सविस्तर वाचा
13:29 (IST) 1 Oct 2025

मुंबईकरांसाठी भाताची लोंबी... सोनालूची फुले...

दररोज पहाटे नाशिकहून रेल्वेने निघालेल्या काही महिला हातात भाताच्या लोंबी आणि सोनालूच्या फुलांच्या जुड्या घेऊन दसऱ्यानिमित्त दादर फुलबाजारात दाखल होत आहेत. ...वाचा सविस्तर
13:21 (IST) 1 Oct 2025

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ‘कवच’च्या यशस्वी लोको चाचण्या

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील पनवेल - रोहा मार्गावरील सोमटणे, आपटा आणि जीते स्थानकांवर ‘कवच’ची नुकतीच यशस्वी चाचणी केली. ...वाचा सविस्तर
13:21 (IST) 1 Oct 2025

नालासोपाऱ्यात इमारतीच्या ९ व्या मजल्यावर लागली भीषण आग; शहरात आगीचे सत्र सुरूच

नालासोपारा पूर्वेच्या भागात लंबोदर अपार्टमेंट नावाची इमारत आहे. या इमारतीत मोठ्या संख्येने कुटुंब राहतात. बुधवारी अचानक नवव्या मजल्यावर असलेल्या एका बंद सदनिकेला आग लागली होती. ...वाचा सविस्तर
13:20 (IST) 1 Oct 2025

Abu Azmi on Marathi in Bhiwandi: सपा नेते अबू आझमी यांनी मराठीच्या मुद्द्यावर केलेल्या विधानाची चर्चा

मराठी और हिंदी में फर्क क्या है? मी मराठी बोलू शकतो, पण ही भिवंडी आहे. इथे मराठीची गरज काय? - सपा नेते अबू आझमी यांच्या विधानाची जोरदार चर्चा

13:01 (IST) 1 Oct 2025

महाराष्ट्रात चोरांचे सरकार, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा घणाघात; मलिदा कमी होऊ नये म्हणून…

महाराष्ट्रात चोरांचे सरकार आहे निविदा प्रक्रियेतून मिळणारा मलिदा कमी होऊ नये म्हणून ओला दुष्काळ जाहीर करण्यात सत्ताधारी टाळाटाळ करीत आहेत,असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. ...सविस्तर वाचा
12:54 (IST) 1 Oct 2025

मिरा रोड येथे गरबा खेळत असताना फेकली अंडी ? नेमके घडले तरी काय…

मिरा रोड येथे जे. पी. इन्फ्रा नावाची उचभ्रू इमारत आहे. या इमारतीत सोसायटी पदाधिकाऱ्यांनी नवरात्रीचे आयोजन केले होते. रात्री सोसायटी प्रांगणात गरबा खेळण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. ...सविस्तर वाचा
12:49 (IST) 1 Oct 2025

मुख्यमंत्री साहेब, आता गांजा लागवडीसह किडनी विक्रीची परवानगी द्या, शेतकरी का करताय ही मागणी ?

दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला गांजा लागवड करण्याची अन स्वतःची किडनी विकण्याची परवानगी द्यावी अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. ...अधिक वाचा
12:44 (IST) 1 Oct 2025

आळंदी: पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आळंदी देवस्थानचा मदतीचा हात; २१ लाखांचा धनादेश..

मराठवाड्यात अतिमुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेती, घरे, जनावरे सर्व काही शेतकऱ्याने गमावले आहे. ...अधिक वाचा
12:39 (IST) 1 Oct 2025

" फडणवीस विरोधी पक्षनेता असताना होती 'ओला दुष्काळ' संकल्पना, आता नाही' वडेट्टीवार यांचा उपरोधिक सवाल

सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करत आहे. यावरून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...अधिक वाचा
12:29 (IST) 1 Oct 2025

राजुरा बोगस मतदार नोंदणी प्रकरण : एफआयआरमध्ये नोंद असलेले ‘ते’ सात भ्रमणध्वनी क्रमांक कोणाचे?

राजुरा विधानसभा मतदारसंघातील ६ हजार ८५३ बोगस मतदार नोंदणीप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवाल अर्थात ‘एफआयआर’मध्ये सात भ्रमणध्वनी क्रमांकांची नोंद आहे. याच क्रमांकांवरून बोगस मतदार नोंदणी झाल्याचा संशय आहे. ...सविस्तर वाचा
12:20 (IST) 1 Oct 2025

चंद्रपूर : ताडोबा दरवाढीविरोधात खासदार धानोरकर यांचे आंदोलन, सात दिवसांत तोडगा ?

ताडोबाच्या वाढीव दराविरुद्ध काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज भल्या पहाटे थेट मोहर्ली प्रवेश द्वारावर आंदोलन केल्याने ताडोबा व्यवस्थापनाने नमती भूमिका घेतली. तसेच सात दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. ...सविस्तर बातमी
12:20 (IST) 1 Oct 2025

समाधानकारक जागा न मिळाल्यास रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस स्वबळावर लढणार; काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांचा इशारा

​काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस नेते रमेश कीर यांनी पक्षाची आगामी रणनीती आणि राज्यातील व स्थानिक प्रश्नांवर भाष्य केले. ...सविस्तर वाचा
12:19 (IST) 1 Oct 2025

लातूरमध्ये मध्यरात्री भूगर्भातून आवाज; भयाने नागारिक रस्त्यावर; प्रलयंकारी भूकंपाच्या आठवणी जाग्या

निलंगा तालुक्यातील कलांडी, डांगेवाडी, निटूर आदी गावांमधील भूगर्भातून २९ सप्टेंबर रोजी रात्री नऊपासून आवाज येण्यास सुरुवात झाली. ३० सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत सात वेळा आवाज आल्याचा स्थानिक नागरिकांचा दावा आहे. ...सविस्तर वाचा
12:11 (IST) 1 Oct 2025

शेगावात एकाच वेळी दोन तलाठी एसीबीच्या जाळयात!

शेगाव तालुक्यातील दोन तलाठ्यांनी वाळू वाहतुकीचे वाहने कारवाई न करता सोडून देण्याकरिता ५० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. मंगळवारी ३० सप्टेंबर रोजी संध्याकाळी उशिरा त्यांना रंगेहात पकडण्यात आले. ...सविस्तर बातमी
12:01 (IST) 1 Oct 2025

अमिताभ बच्चन, नितीन गडकरी आणि शंकर महादेवन मुंबईमध्ये जेवायला बसले असताना घडला चमत्कार, संघगीते स्वरबद्ध…

अमिताभ बच्चन, नितीन गडकरी आणि शंकर महादेवन एकदा मुंबईमध्ये जेवायला बसले होते. जेवण करत असतानाच त्यांना शताब्दी वर्षांमध्ये संघ गीतांना शंकर महादेवन यांच्या आवाजात स्वरबद्ध करावे अशी कल्पना आली. ...अधिक वाचा
11:55 (IST) 1 Oct 2025

पीक पंचनाम्यांची जालना जिल्हयात कूर्मगती !

जालना जिल्हा प्रशासनाच्यावतीने एक ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनुसार जून ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात ३ लाख ३७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यापैकी ५३ हजार ९१७ हेक्टर म्हणजे १५.९८ टक्के पंचनामे आतापर्यन्त झाले आहेत. ...सविस्तर वाचा
11:54 (IST) 1 Oct 2025

एपीएमसीला पावसाचा फटका; भाज्यांच्या दरात ३०-४० टक्क्यांनी वाढ

मुंबई एपीएमसीतील व्यापाऱ्यांच्या मते, पालेभाज्यांचे दर २०-२५ टक्क्यांनी वाढले आहेत. पालक, कोथिंबीर, मेथी, पुदिना यांसह टोमॅटो, कारली, भेंडी यांचे दरही ३०-४० टक्क्यांनी वाढले आहेत. ...अधिक वाचा
11:54 (IST) 1 Oct 2025

अटल सेतूला जोडणारा मार्ग खड्ड्यात; चिर्ले येथून वाहतूक धोकादायक

उरणमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सिडको, जेएनपीए आदी विभागांच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांचे जाळे पसरले आहे. ...वाचा सविस्तर
11:54 (IST) 1 Oct 2025

विजेच्या एका झटक्याने स्वप्नवेड्या शुभमचे आयुष्य उद्धवस्त

शुभमचे भवितव्य अधांतरी आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी कामावर गेलेल्या या अल्पवयीन मुलाला सुरक्षा साधने न देता कामावर लावल्याबद्दल मंडपवाल्याविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात रविवारी (२८ सप्टेंबर) गुन्हा दाखल झाला आहे. ...सविस्तर वाचा
11:54 (IST) 1 Oct 2025

सिडको घरांच्या किंमतीबाबत लवकरच तोडगा; सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे एकनाथ शिंदे यांचे आदेश

घरे उभारणीसाठी झालेला खर्च आणि विक्री किंमत याचे गणित मांडून यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव मला सादर करण्यास सांगितले आहे. हा प्रस्ताव तयार होताच यासंबंधी बैठक घेऊ, असे मी स्पष्ट शब्दांत सिंघल यांना सांगितल्याचे शिंदे म्हणाले. ...सविस्तर वाचा
11:53 (IST) 1 Oct 2025

सिडको, पालिकेच्या सूचनांनंतरही दस्त घोटाळा; प्रशासनाच्या पत्रांना सहनिबंधक कार्यालयांच्या वाटाण्याच्या अक्षता

सदनिका खरेदी तसेच हस्तांतरण नोंदणी करण्यास तातडीने प्रतिबंध करावा असे पत्र ॲागस्ट महिन्यात सिडको तसेच नवी मुंबई महापालिकेने मुद्रांक जिल्हाधिकारी यांना पाठविले होते. ...अधिक वाचा
11:53 (IST) 1 Oct 2025

वादळी वातावरणामुळे भात पीक भुईसपाट; शेतकरी चिंताग्रस्त, सर्वेक्षण सुरू

पालघर जिल्ह्यात ७९१४८.८२ हेक्टर क्षेत्रफळावर भात पिकाची लागवड झाली असून त्यापैकी २५ ते ३० हजार हेक्टर लागवड मध्ये ९० ते १०० दिवसात तयार होणाऱ्या हळव्या वाणांच्या भात लागवड क्षेत्राचा समावेश आहे. ...सविस्तर बातमी
11:51 (IST) 1 Oct 2025

राज्यातील पहिली पाळीव प्राण्यांसाठीची स्मशानभूमी अखेर सुरु

मिरा भाईंदर शहरात मोकाट फिरत असलेल्या श्वान, मांजर आणि जनावरांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता पालिकेकडून उत्तन येथे निर्बीजीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. ...अधिक वाचा
11:51 (IST) 1 Oct 2025

मिरा भाईंदरच्या उड्डाण पुलाखाली उद्यान; पालिकेकडून ठराव मंजूर

यात जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तसेच लहान मुलांसाठी खेळणी बसवली जाणार असल्याची माहिती शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिली. ...अधिक वाचा
11:51 (IST) 1 Oct 2025

सावंतवाडी: ओंकार हत्तीचा धुमाकूळ, शेतीचे मोठे नुकसान; ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत

​गेल्या चार दिवसांपासून ओंकार हत्तीमुळे सावंतवाडी तालुक्यातील मडुरा, कास आणि सातोसे परिसरातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. हत्तीने शेतातील उभी पिके मोठ्या प्रमाणात तुडवली असून, शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अक्षरशः पायाखाली तुडवला गेला आहे. ...अधिक वाचा

Beed district hit by heavy rain again

बीड जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा; शाळा आणि पोलीस ठाण्यातही पुराचे पाणी (संग्रहीत छायाचित्र)

Marathi News Live Update: मराठवाड्यातील पूरस्थितीसंदर्भातील सर्व महत्त्वाच्या बातम्या.