Marathi News Today : राज्य सरकारने नुकतंच १०० दिवसांचं रिपोर्ट कार्ड जाहीर केलं आहे. यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चालू झालं आहे. दुसऱ्या बाजूला, काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याबाबत राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तसेच केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. बिहार निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याची टीका विरोधक करत आहे. तर, पुण्यातील परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावरून महायुतीत नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. या कार्यक्रमावरून उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांच्यातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

तसेच, शिवसेना (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू आहे. मात्र, ही चर्चा पुढे सरकलेली नाही. या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

Live Updates

Mumbai-Pune News Live Today 2 May 2025 : महत्त्वाच्या राजकीय बातम्या वाचा एकाच क्लिकवर.

19:25 (IST) 2 May 2025

आरटीईच्या प्रवेशाकडे पालकांनी फिरवली पाठ , जिल्ह्यात २५७ तर रत्नागिरी तालुक्यात १२६ जागा रिक्तच

आरटीईच्या एकूण ७९७ रिक्त जागांपैकी आतापर्यंत ५४० प्रवेश निश्चित झाले आहेत. ...वाचा सविस्तर
18:45 (IST) 2 May 2025

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी सांगितली महत्वाची माहिती

एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? याकडे लाडक्या बहि‍णींचे लक्ष लागलेलं असतानाच आता मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्वाची माहिती सांगितली आहे. ...सविस्तर वाचा
17:58 (IST) 2 May 2025

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचा १५ मार्चच्या शासन निर्णयाविरोधात एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

या मोर्च्यात जिल्ह्यातील विद्यार्थी,माध्यमिक व प्राथमिक शाळांमधील शिक्षक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शासन व प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली. ...अधिक वाचा
17:34 (IST) 2 May 2025

एनएचएमच्या कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारला इशारा, वेतन न दिल्यास १४ मेपासून आमरण उपोषण

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) राज्यात कार्यरत असलेले ३४ हजार ५०० कर्मचारी मागील चार महिन्यांपासून विनावेतन काम करीत आहेत. ...अधिक वाचा
17:14 (IST) 2 May 2025

वर्दळीच्या रस्त्यावर चोरट्यांने भरदिवसा लांबवले ४० तोळ्याचे सुवर्णालंकार

शहरातील अत्यंत वर्दळ असलेल्या कर्मवीर चौकामध्ये अज्ञात तरूणांने हिसडा मारून ४० तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी हातोहात लंपास करण्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. ...सविस्तर बातमी
16:15 (IST) 2 May 2025

खारेगाव खाडी पूलाच्या कामासाठी पहाटे एकेरी वाहतुक

मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव पूलावर शनिवारी पहाटे तुळई बसविण्याचे काम केले जाणार आहे. ठाणे वाहतुक पोलीस या कामासाठी खारेगाव पूलावर पहाटे दोन ते चार या दोन तासांच्या कालावधीत एकेरी पद्धती वाहतुक सोडणार आहेत. ...वाचा सविस्तर
16:13 (IST) 2 May 2025

नाशिक : सराईताची हत्या; संशयित स्वत: पोलीस ठाण्यात दाखल

वर्षभरापासून शहरात किरकोळ वादातून हत्यांचे सत्र सुरू आहे. कधी टोळीयुध्द तर कधी बदल्याच्या उद्देशाने गुन्हेगार भररस्त्यात दहशत माजवत आहेत. ...वाचा सविस्तर
15:57 (IST) 2 May 2025

"तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो", संजय राऊतांची मोदींवर खरमरीत टीका

पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानविरोधात कारवाईसाठी लष्कराला फ्री हॅन्ड दिला असल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. यावर शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो, असाच हा प्रकार आहे.

15:53 (IST) 2 May 2025

पालघरचे 'सीडबॉल मॅन' दीपक देसले यांचा हरित क्रांतीचा निर्धार, महाराष्ट्र दिनी पाच लाख सीड बॉल निर्मितीचा संकल्प

बिया विद्यार्थ्यांच्या हातून शेकडो शाळांमध्ये सीड बॉलमध्ये रूपांतरित होणार आहेत. या उपक्रमाची सुरुवात टोकेपाडा, घोलवड येथे झाली होती. ...वाचा सविस्तर
15:33 (IST) 2 May 2025

जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वी देखील धमक्या आलेल्या आहेत. शुक्रवारी दुपारी त्यांना पुन्हा एकदा व्हाॅट्सॲप या समाजमाध्यमावर एक संदेश प्राप्त झाला ...वाचा सविस्तर
14:38 (IST) 2 May 2025

"मी हिंदू आहे हे सांगण्यासाठी कुठल्या महाजनची गरज नाही", जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य चर्चेत

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. महाजन म्हणाले होते की "शरद पवार म्हणले लहानपणी देवपूजा करत होतो, AI तंत्रज्ञान एवढं पुढं गेलंय की उद्या ते त्यांची मुंज झालेली पण दाखवू शकतात ! कारण त्यांच्या लक्षात आलंय की हिंदू धर्मापासून दूर जाऊन राजकारण करता येत नाही! आव्हाडांना तुळजाईचं मंदिर बांधावं लागलं ही हिंदूंची ताकद!" यावर आता आमदार आव्हाडांनी पलटवार केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, यात ताकदीचा काय प्रश्न आहे? आपणा सर्वांच्या माहितीकरिता सांगू इच्छितो, २००४ साली हे मंदिर उभं राहिलं परंतु हे रहदारीच्या रस्त्यात असल्याकारणाने तत्कालीन महापालिका आयुक्त व माननीय न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार सदर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा मानस गेली अनेक वर्ष माझ्या मनात होता. कदाचित हे राज्यातील पहिले असे मंदिर असेल ज्यात बांधकामाची तसेच मंदिर वापराची परवानगी घेतली आहे.त्यामागे माझी नितांत श्रद्धा आहे आई तुळजाभवानी मातेवर.

आमदार आव्हाड म्हणाले, "समस्त बहुजनांचे उभ्या महाराष्ट्राचे कुलदेवी असलेल्या तुळजाभवानी आईचे हे प्रतितुळजापूर देऊळ असंख्य भक्तांचे शक्ती स्थान ठरेल. इतिहास साक्षी आहे छत्रपती शिवरायांचे देखील तुळजाभवानी मंदिर प्रेरणास्थान होते. आई तुळजाभवानीनेच उभ्या महाराष्ट्राला मोगलाई विरोधात उभे ठाकण्याची ताकद दिली. आमच्यासारख्या बहुजनांना तुमच्यासारख्यांनी पिढ्यानपिढ्या वंचित ठेवलं.शिक्षण ,पाणी ,न्याय आणि हक्कांसाठी आम्हासारख्यांना मुंज करण्याची आवश्यकता नाहीये. ते तुम्हालाच लखलाभ असू द्या. आणि हो आपणही संपूर्ण कुटुंबासहित उभ्या महाराष्ट्राचे कुलदेवी असणाऱ्या तुळजाभवानी आईच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आपले मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे स्वागतच असेल. जय तुळजाभवानी! तसेच, मी हिंदू आहे हे सांगण्या साठी कुठल्या महाजन ची गरज नाही"

14:01 (IST) 2 May 2025

येऊर जंगलात वन्यप्राण्यांसाठी नैसर्गिक पाणवठा खुला, स्वराज्य सामाजिक संस्था आणि जीवोहम ट्रस्टचा उपक्रम

बिबट्या, सांबर, हरीण, वानर, ससे, भेकर यांसारख्या वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी मानवी वस्तीकडे वळावे लागत होते. जे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकते. ...अधिक वाचा
12:47 (IST) 2 May 2025

सहा महिन्यांपूर्वी बांगलादेशातून ‘वागळे इस्टेट’ मध्ये; दोन महिला ताब्यात

या महिलांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले असुन त्यांच्याविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...सविस्तर वाचा
12:36 (IST) 2 May 2025

हापूसचा हंगाम आणखी दहा दिवसांचाच

कोकणच्या हापूस आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात असून, पुढील केवळ दहा दिवस हा सुगंधी आणि चवदार आंबा बाजारात उपलब्ध असेल, अशी माहिती एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी दिली ...वाचा सविस्तर
12:21 (IST) 2 May 2025

डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात महिला, प्रवाशांचा सोन्याचा ऐवज लुटणाऱ्या महिलेला अटक

वैशाली सचदेव (२७) असे या चोरट्या महिलेचे नाव आहे. ती पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. ...सविस्तर वाचा
12:06 (IST) 2 May 2025

नाव बदलून १२ वेळा UPSC परिक्षा दिल्याच्या आरोपावर पूजा खेडकर म्हणाली, "मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या नावात..."

मी नाव बदलून परिक्षा दिल्याचा आरोप खोटा आहे. माझं नाव पूजा खेडकरच आहे. याच नावाने मी परिक्षा दिली आहे. माध्यमांना व सरकारी अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली गेली आहे. चुकीची माहिती पसरवली जात आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या नावात आईचं नाव लावलं आहे. मग मी तसं केलं असेल तर गुन्हा झाला का? आपल्या नावात आईच्या नावाचा समावेश करणं हा कधीपासून गुन्हा होऊ लागलाय?

12:04 (IST) 2 May 2025

वाडा उपजिल्हा रुग्णालय कागदोपत्रीच रखडले, ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या सोयी - सुविधांमुळे रुग्ण सेवेवर परिणाम

वाडा तालुक्याला सत्ताधारी पक्षातील तीन आमदार व एक खासदार व विरोधी पक्षातील एक खासदार हे महत्वाचे चार लोकप्रतिनिधी लाभून देखील या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. ...अधिक वाचा
11:26 (IST) 2 May 2025

वाढवण बंदर प्रकल्पाच्या पर्यावरणीय मूल्यांकनासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) ची नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयाने २८ फेब्रुवारी२०२५ रोजी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासंदर्भात बंदर मंत्रालयाने १ मे रोजी या संदर्भातील कार्यालयीन निवेदन जारी केले. ...अधिक वाचा
11:10 (IST) 2 May 2025

डोंबिवली रेल्वे स्थानकातील रखडलेल्या सरकत्या जिन्याच्या कामाला प्रारंभ

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चार वरील रखडलेल्या सरकत्या जिन्याच्या कामाला रेल्वे प्रशासनाने सुरूवात केली आहे. मागील सहा महिन्यांपासून हे काम रखडल्याने फलाटावरील प्रवाशांना वळसा घेऊन जिन्यावर जावे लागत होते. ...वाचा सविस्तर
10:40 (IST) 2 May 2025

“देशावर संकट अन् पंतप्रधान नट-नट्यांबरोबर व्यस्त”, संजय राऊतांचा टोला

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, "काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. पाकिस्तान कुरापती करतोय, देशावर मोठं संकट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत नट-नट्यांबरोबर व्यस्त आहेत. ते मुंबईत कार्यक्रमांना हजेरी लावतायत, बिहारमध्ये जाऊन प्रचार करत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचा लवलेश नाही.