Maharashtra Live News Updates, 28 October 2025 : “महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला आता कोणत्याही कुबड्यांची गरज उरलेली नसून आमचा पक्ष स्वबळावर मजबूत आहे आणि आमचा पक्ष राज्यात ताकदीने उभा आहे”, असं परखड मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (२७ ऑक्टोबर) व्यक्त केलं. यावरून आता विरोधकांनी म्हटलं आहे की “भाजपाला आता कुबड्यांची म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गरज राहिलेली नाही.” शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “अजित पवार व एकनाथ शिंदेंमध्ये थोडा जरी स्वाभिमान असेल तर त्यांनी आता सरकारमधून बाहेर पडायला हवं.”

दुसऱ्या बाजूला, “कुबड्या म्हणजे मित्र नव्हे”, असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे. अमित शाह यांच्या या वक्तव्यावरून राज्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे. या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

भाजपाचा आता बारामतीकडे मोर्चा : रोहित पवार

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या चौकशीच्या आदेशांवर राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे की भाजपाने आता बारामतीकडे मोर्चा वळवला आहे. कदाचित हा त्यांचा कुबड्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न आहे.

जैन बोर्डिंगच्या जमिनीचं प्रकरण : “गोखले बिल्डर्सचे २३० कोटी रुपये गोठवावे”, धंगेकरांची मागणी

दरम्यान, पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या व्यवहाराचं प्रकरण अजूनही चर्चेत आहे. याप्रकरणी गोखले बिल्डरने व्यवहार रद्द केला असला तरी सदर विषय लावून धरणारे शिवसेनेचे (शिंदे) नेते रवींद्र धंगेकर यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला आहे. ते म्हणाले, “सदर व्यवहारात गोखले बिल्डरने केलेल्या करारात म्हटलं आहे की कोणीही माघार घेतल्यास संबंधित रक्कम परत देता येणार नाही. त्यामुळे त्यांनी दिलेली २३० कोटी रुपये ही रक्कम गोठवली जावी. तसेच या जमिनीचा व्यवहार करणाऱ्या बोर्डिंगच्या विश्वस्त मंडळातील सदस्यांना बरखास्त करावं.”

तसेच या प्रकरणी धंगेकर आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची भेट घेणार आहेत. या विषयीच्या सर्व घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. तसे राज्यातील इतर राजकीय व सामाजिक बातम्यांवर आपलं लक्ष असेल.

Live Updates

Maharashtra Weather Today Live Updates : राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

13:24 (IST) 28 Oct 2025

सकाळी मोटारीसह अपहरण, रात्री सुटका....शहाद्यातील सराफी व्यावसायिकाला मारहाण

शहादा शहरात राहणारे सराफी व्यावसायिक रितेश पारेख हे सोमवारी शहादा येथील घरुन सोने,चांदीच्या वस्तू घेवून म्हसावद येथील दुकानाकडे मोटारीने निघाले होते. ...वाचा सविस्तर
13:19 (IST) 28 Oct 2025

हंगामापूर्वी साखरपट्ट्यातील वातावरण तापले

काही साखर कारखान्यांनी ऊसतोड सुरू केली आहे. मात्र ती सुरू होताच ऊस दरावरून शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. ...अधिक वाचा
13:16 (IST) 28 Oct 2025

Mumbai BMC Hospitals Staff Shortage : मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील ४५ टक्के जागा रिक्त

BMC Hospitals : त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याबरोबरच असलेल्या कर्मचाऱ्यांवरील ताणही वाढला आहे. ...सविस्तर वाचा
13:15 (IST) 28 Oct 2025

अनिलकुमार पवार यांच्या सुटकेला ईडीचे आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस...

Anil Kumar Pawar, ED, Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने अनिलकुमार पवार यांच्या सुटकेला आव्हान देणाऱ्या अर्जावर नोटीस बजावली असून, नोव्हेंबरमध्ये पुढील सुनावणी होणार असल्याने पवार यांच्यावर पुन्हा अटकेची टांगती तलवार आहे. ...वाचा सविस्तर
13:14 (IST) 28 Oct 2025

Gold-Silver Price : सोने, चांदीचे दर धड्डाम कोसळले... जळगावमध्ये आता ‘इतके’ स्वस्त !

Gold Silver Price Today : लग्नसराईचा हंगाम जवळ येत असताना सोने आणि चांदी अचानक स्वस्त झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे तर व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. ...सविस्तर बातमी
13:13 (IST) 28 Oct 2025

गुरूजींची नोंदणी आता 'ऑनलाईन'; मतदार नोंदणी प्रक्रियेला….

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ यांच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्यात येत असून, नोंदणीसाठी पात्र असलेल्या प्रत्येकाने ६ नोव्हेंबरपर्यंत नमुना १९ मध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ...सविस्तर वाचा
13:06 (IST) 28 Oct 2025

Heena Gavit : माजी खासदार डाॅ. हिना गावित यांचा 'या' पक्षात प्रवेश

Heena Gavit Returns to BJP : मंगळवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या त्यांच्या घरवापसीमुळे नंदुरबार जिल्ह्यात भाजपची ताकद अधिक बळकट होणार आहे. ...अधिक वाचा
13:03 (IST) 28 Oct 2025

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार अखेर रद्द होत आहे. या व्यवहाराविरोधात लढणारे शिवसेनेचे (शिंदे) नेते व माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. काही कथित पुरावे देखील सादर केले होते. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांच्या कारभारावर शंका उपस्थित केली गेली. मात्र, अचानक धंगेकर यांनी मोहोळ यांचा उल्लेख करणं टाळलं. त्यामुळे धंगेकर यांच्यावर कोणाचा दबाव आहे का असा प्रश्न उपस्थित केला गेला. मात्र, आता धंगेकर यांनी स्पष्ट केलं की त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मित्रपक्षांवर टीका न करण्यास सांगितलं होतं. मात्र, पुणेकरांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत राहा अशा सूचनाही केल्या.

रवींद्र धंगेकर म्हणाले, "पुणेकरांची भूमिका हीच माझी भूमिका आहे. मी जो काही लढा देत आहे. त्या लढ्याला आमच्या पक्षाच्या प्रमुखांनी कायम सहकार्य केलं आहे. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. मी पक्षप्रवेश केल्यापासून आमचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या पाठिशी आहेत. मी खरं बोलतो म्हणून ते मला पाठिंबा देतात. त्यांनी मला सांगितलं की तू मित्रपक्षांवर काही बोलायचं नाही. परंतु, पुण्यातील गुन्हेगारीविरोधात, पुणेकरांच्या प्रश्नांसाठी लढत राहा."

12:53 (IST) 28 Oct 2025

VIDEO : ‘मी जिवंत आहे; माझ्या निधनाची बातमी…’ माजी मंत्री वसुधाताई देशमुख यांचा खुलासा!

वसुधाताई देशमुख यांनी एक व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारीत केला आहे. त्यात त्यांनी आपण सकुशल असल्याचे म्हटले आहे. ...सविस्तर बातमी
12:35 (IST) 28 Oct 2025

पुण्यातील जैन बोर्डिंग होस्टेलच्या जागेत १८ मजले इमारत उभारण्याची मान्यता, कोणी केला आरोप ?

आता या जागेच्या विकसनासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता १८ मजल्यांच्या इमारतींचे नकाशे मंजूर करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...अधिक वाचा
12:19 (IST) 28 Oct 2025

बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम, तर ट्रॅक्टर मोर्चा रामगिरीवर धडकेल!

दरम्यान आंदोलन दुपारी ४ वाजेपर्यंत नागपूर सीमेवर मंत्री यांची प्रतीक्षा करणार आहेत. राज्य शासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास हा ट्रॅक्टर मोर्चा मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान रामगिरीकडे कुच करणार आहे, अशी माहिती आंदोलकांनी दिली आहे. ...अधिक वाचा
12:02 (IST) 28 Oct 2025

नाशिकच्या कुंभ मेळाव्यात पाचशे भाविकही स्नान करणे अशक्य, कुंभमेळा होणार कसा? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले…

कुंभमेळाव्यामध्ये शाही स्नानाला महत्त्व असते. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळाव्यात शाही स्नान त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त कुंडात आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीकाठी रामकुंडात होईल. ...सविस्तर बातमी
11:55 (IST) 28 Oct 2025

विद्यार्थी आधार कार्ड अपडेटचा गोंधळ; शाळेत असूनही १० लाख विद्यार्थी 'शाळाबाह्य' ठरण्याचा धोका, अध्यापक भारतीने केली 'ही' मागणी....

यू डायस प्लस पोर्टलवरील माहितीनुसार राज्यातील २ कोटी १४ लाख विद्यार्थ्यांपैकी ५ लाख ७८ हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरल्याने, शिक्षणहक्क कायद्याशी विसंगत अशी स्थिती निर्माण झाली आहे. ...सविस्तर बातमी
11:54 (IST) 28 Oct 2025

नगरमध्ये सकल जैन समाजाचा निषेध मोर्चा ; पुण्यातील जमीन विक्री प्रकरणात दोषींवर कारवाईची मागणी

कापड बाजारातील जैन मंदिरापासून मोर्चास सुरुवात झाली. डाळ मंडई, आडते बाजार, धरती चौकमार्गे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तेथे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. ...अधिक वाचा
11:52 (IST) 28 Oct 2025

गोगावलेंचा युतीचा प्रस्ताव तटकरेनी धुडकावला

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ...सविस्तर बातमी
11:47 (IST) 28 Oct 2025

माता- पिता दोघेही नशेत, अन मुलांची भुकेने होरपळ

रोज दारू पिऊन भांडणे करणारे हे जन्मदाते पोटच्या मुलांवर क्रूर अन्याय करत होते. याची सुचना मिळताच कामठी पोलिसांच्या सहकार्याने बाल संरक्षण मंचने ही कारवाई केली. मंचने सोडवेल्या बालकांपैकी ११ आणि ७ वर्षीय मुलगी आणि एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. ...सविस्तर वाचा
11:46 (IST) 28 Oct 2025

वाघ-मानव संघर्षावर मुख्यमंत्र्यांच्या काकूने सुचविला उपाय

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या ३५० पेक्षा अधिक आहे. ताडोबा कोर क्षेत्रापेक्षा बफर क्षेत्रात वाघांची संख्या अधिक आहे. या जिल्ह्यातील मानव वन्यजीव संघर्ष कमी करायचा असेल तर येथील वाघ तातडीने इतर जिल्ह्यात पाठविणे आवश्यक झाले आहे. ...अधिक वाचा
11:34 (IST) 28 Oct 2025

नाशिकचे मंत्री काय कामाचे? गिरीश महाजन मदतीचे...आमदार हिरामण खोसकर यांचा दावा

तोडगा काढण्यासाठी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे मदतीला धावल्याकडे लक्ष वेधत आ. खोसकर यांनी स्थानिक मंत्र्यांनी हा विषय गांभिर्याने घेतला नसल्याची अस्वस्थता व्यक्त केली. ...सविस्तर वाचा
11:28 (IST) 28 Oct 2025

नागपूर विमानतळावर सापडले सुपर स्लिम सिगारेट्सचे घबाड

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शारजाहहून आलेल्या प्रवाशांच्या बॅगा तपासताना मोठ्या प्रमाणावर विदेशी ब्रँडच्या सिगारेटच्या पाकिटांचा साठा आढळून आला. या सिगारेट भारतात विक्रीस बंदी असलेल्या प्रकारातील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ...सविस्तर बातमी
11:25 (IST) 28 Oct 2025

World Stroke Day 2025 : मेंदूविकाराचा झटका वेळेत ओळखलात तरच वाचाल! भारतात दरवर्षी १८ लाख रुग्णांची नोंद, पाचपैकी एकाचा मृत्यू...

Brain Stroke : हृदयरोगानंतर जगभरातील मृत्यूंचे दुसरे सर्वात मोठे कारण ठरलेला ‘मेंदूविकाराचा झटका’ म्हणजेच स्ट्रोक आज सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. ...अधिक वाचा
11:12 (IST) 28 Oct 2025

‘स्थानिक’च्या निवडणुका स्वबळावर; काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सूर

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली. ...वाचा सविस्तर
11:11 (IST) 28 Oct 2025

संगमनेरमध्ये मतदार यादींवर हरकतींचा पाऊस

काही हरकती निकाली काढण्यात आल्या असून उर्वरित सुमारे १ हजार हरकतींवर प्रांताधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे. ...सविस्तर बातमी
11:11 (IST) 28 Oct 2025

“…तर शिंदे-पवारांनी स्वाभिमानाने सरकारमधून बाहेर पडावं”, ठाकरे गटाचा सल्ला

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, "अमित शाह म्हणालेत की त्यांना आता कुबड्या नको. याचा अर्थ त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की त्यांना महाराष्ट्रात आता कोणाचीच गरज नाही. त्यामुळे या अपमानानंतर आता एकनाथ शिंदे अजित पवार यांनी सरकारमधून बाहेर पडावं."

"अमित शाहांच्या वक्तव्यातून स्वाभिमानाची ठिणगी पेटत असेल तर ती पेटली पाहिजे. काल अमित शाह यांनी कुबड्या असा उल्लेख करत गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिंदे व पवार या दोघांमध्ये थोडा जरी स्वाभिमान असेल तर त्यांनी आता मराठा स्वाभिमान दाखवावा आणि राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडावं."

11:06 (IST) 28 Oct 2025

Video: रात्रीचे बारा आणि बच्चू कडू म्हणतात, “काढा रे चिवडा”... एक दिवसाचा पाहुणा नाही तर….

वर्धा : बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील महाएल्गार आंदोलनात उत्साह उसळला असून, कडू स्वतः ट्रॅक्टर चालवत कार्यकर्त्यांसोबत प्रवास करत आहेत. "काढा रे चिवडा, लागा कामाला," असे आवाहन करत त्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन न थांबवण्याचा निर्धार व्यक्त केला. ...वाचा सविस्तर
11:06 (IST) 28 Oct 2025

मिहानप्रमाणे शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये ; ‘नवीन नागपूर’ प्रकल्पावर इशारा

हिंगणा तालुक्यातील प्रस्तावित ‘नवीन नागपूर’ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची जमीन घेतली जाणार असल्याने त्यांचीही अवस्था मिहान प्रकल्पात जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांप्रमाणेच होईल, असे भाकित मिहान संघर्ष समितीचे समन्वयक बाबा डवरे यांनी केले. ...अधिक वाचा
11:04 (IST) 28 Oct 2025

'कव्हर फायरिंग’ की ‘क्रॉस फायरिंग’? मतदार यादीच्या घोटाळ्यावर राजकीय गोळीबार

सर्व विरोधी पक्षाकडून काढण्यात येणारा मोर्चा म्हणजे आगामी निवडणुकामध्ये पराभवाची भीती वाटत असल्याने केले जाणारे ' कव्हर फायरिंग' आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात केली. ...वाचा सविस्तर
11:03 (IST) 28 Oct 2025

बारामती नगरपरिषदेत दोन्ही ‘राष्ट्रवादी’त चुरस

राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर बारामतीकरांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान केले होते. आता नगरपरिषदेच्या माध्यमातून तिसऱ्यांदा हे मतदार मतदान करणार आहेत. ...वाचा सविस्तर
11:03 (IST) 28 Oct 2025

Maharashtra Economy 2047 : सविस्तर : महाराष्ट्राचे सध्याचे आर्थिक चित्र काय सांगते? २०४७ मध्ये किती दूर भरारी?

Maharashtra Economic Growth 2047: महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान २०२८ पर्यंत एक लाख कोटी डॉलर्सकरण्याचे उद्दिष्ट आधी ठेवण्यात आले होते. पण त्यात येणाऱ्या अडचणी लक्षातघेता आता ही मुदत २०३० पर्यंत ठरवून देण्यात आली आहे. ...सविस्तर वाचा
11:01 (IST) 28 Oct 2025

Eknath Khadse : एकनाथ खडसेंना मोठा धक्का... जळगावमधील बंगल्यावरून लाखोंच्या ऐवजाची चोरी !

७० ते ८० ग्रॅम सोने तसेच ३५ हजार रूपयांची रोख रक्कम मिळून तब्बल ९० लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची माहिती स्वतः खडसे यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. ...अधिक वाचा