राज्यात आज दिवसभरात ३३ हजार ९१४ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ८६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, ३० हजार ५०० जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील अॅक्टीव्ह केसेसची संख्या ३,०२,९२३ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजपर्यंत राज्यात ७१,२०,४३६ रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९४.०७ टक्के आहे. तर, मृत्यू दर १.८७ टक्के आहे.

प्रयोगशाळेत तपासणी झालेल्या ७,३६,८४,३५९ नमुन्यांपैकी आजपर्यंत ७५,६९,४२५ नमूने कोविड पॉझिटिव्ह(१०.२७ टक्के) आढळले आहेत. सध्या १६,२०,३७१ जण गृह विलगिकरणात तर ३ हजार ३५८ जण संस्थात्मक विलगिकरणात आहेत.

आज राज्यात १३ ओमायक्रॉनबाधित आढळले. आजपर्यंत एकूण २ हजार ८५८ ओमायक्रॉनबाधितांची राज्यात नोंद झालेली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra reported 33914 new covid cases msr
First published on: 25-01-2022 at 21:50 IST