मुंबई: राज्यात रविवारी ८४ रुग्ण नव्याने आढळले आहेत, तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. रविवारी १७२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ९९५ रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईत ९२ नवीन रुग्ण

रविवारी मुंबईत ९२ नवीन रुग्ण आढळले असून शून्य मृत्यू नोंदवला गेला. रविवारी मुंबईत ७,८५६ करोना चाचण्या घेण्यात आल्या. यात ९२ रुग्ण आढळले असून यातील केवळ तीन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली आहे. ९२ पैकी ८९ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. रविवारी ९२ रुग्ण आढळले असतानाच मुंबईत एकही रुग्ण दगावलेला नाही. त्याच वेळी ७३ रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असा आहे. सध्या रुग्णवाढीचा दर ०.००८ टक्के असा आहे. सध्या मुंबईत एकही चाळ वा झोपडपट्टी प्रतिबंधित नाही.

ठाणे जिल्ह्यात रविवारी १९ करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. ठाणे जिल्ह्यात आढळून आलेल्या १९ रुग्णांमध्ये नवी मुंबई शहरातील १२, ठाणे शहरातील चार, कल्याण-डोंबिवली शहरातील दोन आणि ठाणे ग्रामीण भागातील एका रुग्णाचा समावेश आहे. तर, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.