शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२१ च्या परीक्षेच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. नवीन वेळापत्रकानुसार परीक्षा आता २१ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. शिवाय, परीक्षेसाठी नवीन प्रवेशपत्र २६ ऑक्टोबर २०२१ पासून अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल. परीक्षेला बसलेले उमेदवार mahatet.in ला भेट देऊन सूचना पाहू शकतात आणि इतर सर्व महत्वाची माहिती मिळवू शकतात.

देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक डोळ्यासमोर ठेवून परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुका होणार आहेत. यापूर्वी टीईटी २०२१ परीक्षा या महिन्यात ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार होती. परीक्षेसाठी प्रवेशपत्रे अधिकृत संकेतस्थळावर आधीच जारी देखील करण्यात आली होती.

दरम्यान उमेदवारांना आता परीक्षेला बसण्यासाठी नवीन प्रवेशपत्र डाउनलोड करावे लागेल जे पुढील आठवड्यात अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल. उमेदवार mahatet.in ला भेट देऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी त्यांच्या लॉगिन आयडी आणि पासवर्डसह लॉग इन करणे आवश्यक आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उमेदवारांना प्रवेशपत्राच्या प्रिंटसह परीक्षा केंद्रावर जावे लागते. प्रवेशपत्रासह उमेदवारांना त्यांचा ओळखपत्रही परीक्षा केंद्रावर घेऊन जावे लागेल. पेपर I आणि पेपर II साठी १५० मिनिटांच्या कालावधीसाठी परीक्षा घेतली जाईल. TET २०२१ परीक्षा योग्य कोविड मार्गदर्शक तत्त्वांसह आयोजित केली जाईल.