राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडतंय. नागपूर, पालघर, धुळे, नंदूरबार, अकोला आणि वाशिमच्या जिल्हा परिषदेसाठी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांसाठी हे मतदान होत आहे. याशिवाय राज्यातील १४४ पंचायत समितीच्या जागांसाठीही निवडणूक होतेय. उद्या (६ ऑक्टोबर) मतमोजणी होऊन निकाल लागेल. या जागांच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोरोना संसर्ग आणि ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्रातील या ६ जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका होत आहेत.

जिल्हानिहाय जिल्हा परिषदेच्या जागा

नागपूर – १६
धुळे – १५
अकोला – १४
वाशिम – १४
नंदूरबार – ११
पालघर – ०२

जिल्ह्यानिहाय पंचायत समिती जागा

नागपूर – ३१
धुळे – ३०
अकोला – २८
वाशिम – २७
नंदूरबार – १४

नंदूरबार

नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या ११ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या १४ गणांसाठी मतदान होतंय. या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसं झाल्यास वाढलेली टक्केवारी नेमके कुणाच्या बाजूने राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अकोला

अकोला जिल्ह्यात १४ जिल्हा परिषद जागा आणि २८ पंचायत समिती गणात पोटनिवडणूक पार पडतेय. या निवडणूकीत ३ लाख ७१ हजार ६९० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १४ निवडणूक विभागांमध्ये ६८ उमेदवार तर पंचायत समितीच्या २८ गणांमध्ये ११९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

वाशिम

वाशिम जिल्हा परिषदेच्या १४ गटासाठी तर पंचायत समितीच्या २७ गणासाठी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या १४ गटासाठी ८२ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. पंचायत समितीच्या 27 गणांसाठी 135 उमेदवार रिंगणात आहेत.

“शेतकऱ्याच्या विरोधात जाणार त्याचा पराभव होणार”, अमरावती जिल्हा बँक विजयानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया

धुळे आणि नंदूरबार

खान्देशात २५ गट, ४१ गणांसाठी मतदान होत आहे. धुळे आणि नंदुरबार दोन्ही जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होतेय. दोन्ही जिल्ह्यातील २५ गटांसाठी ८३ उमेदवार तर ४१ गणांसाठी १११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra zp election 2021 latest updates 85 zilla parishad seats and 144 panchayat samiti voting pbs
First published on: 05-10-2021 at 11:50 IST