कराड : नगरपालिकांच्या निवडणुका चुरशीने होत असताना, मलकापूर नगरपालिकेच्या नगरसेवकपदाच्या २२ जागांपैकी भाजपचे पाच जागांवरील उमेदवार बिनविरोध झाले. तर, भाजपचे आणखी काही उमेदवार बिनविरोध होण्याची शक्यता आहे. विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या करिष्म्यामुळे मलकापूरमध्ये ‘सब कुछ भाजप’चे चित्र असून, मलकापूरमध्ये पहिल्यांदाच भाजपला अशा भरघोस यशासह एकहाती सत्ता मिळण्याची चिन्हे आहेत.

नगरसेवकपदाच्या २२ जागांसाठी १३४ इच्छुकांचे अर्ज दाखल असून, विशेष म्हणजे भाजपचे प्रभाग क्रमांक सात आणि नऊमधील सर्व चारही उमेदवार आणि प्रभाग चारमधील एक असे पाच उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्जच दाखल नसल्याने बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

प्रभाग क्रमांक सातमधून हणमंत निवृत्ती जाधव (सर्वसाधारण), सुनीता राहुल पोळ (नागरिकांचा मागास प्रवर्ग). प्रभाग क्रमांक नऊमधून ज्योत्स्ना अभिजित शिंदे (नागरीकांचा मागास प्रवर्ग), दिपाली विजयकुमार पवार (सर्वसाधारण महिला) व सुनील प्रल्हाद खैरे (अनुसूचित जाती- जमाती) असे पाच उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

मलकापूरच्या नगराध्यक्षपदासाठी १५ अर्ज दाखल असून, त्यात भाजपतर्फे तेजस शेखर सोनवले, काँग्रेसकडून संजय तुकाराम तडाखे, शिवसेना शिंदे गटाचे अक्षय संदीप मोहिते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आर्यन सविनय कांबळे यांची प्रमुख उमेदवारी आहे.

भाजपचे उमेदवार असे

नगराध्यक्षपदासाठी तेजस शेखर सोनवले.

  • प्रभाग १- अश्विनी मोहन शिंगाडे (नागरिकांचा मागास प्रवर्ग- महिला), प्रशांत शिवाजी चांदे (सर्वसाधारण).
  • प्रभाग २- गीतांजली शहाजी पाटील (सर्वसाधारण महिला), विक्रम अशोक चव्हाण ऊर्फ दिनेश रेनाक (सर्वसाधारण).
  • प्रभाग ३- धनंजय लक्ष्मण येडगे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), रंजना अशोक पाचुंदकर (सर्वसाधारण महिला).
  • प्रभाग ४- सुनील प्रल्हाद खैरे (अनुसूचित जाती- जमाती), कल्पना नारायण रैनाक (सर्वसाधारण महिला).
  • प्रभाग ५- शुभांगी रघुनाथ माळी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), सुरज शंकर शेवाळे (सर्वसधारण).
  • प्रभाग ७- सुनीता राहुल पोळ (नागरिकांचा मागास प्रवर्ग- महिला) हणमंत निवृत्ती जाधव (सर्वसाधारण).
  • प्रभाग ८- स्वाती समीर तुपे (अनुसूचित जाती- जमाती, शरद उमाकांत पवार (सर्वसाधारण).
  • प्रभाग ९- ज्योत्स्ना अभिजित शिंदे (नागरीकांचा मागास प्रवर्ग), दिपाली विजयकुमार पवार (सर्वसाधारण महिला).
  • प्रभाग १०- प्रमोद माणिकराव शिंदे (नागरीकांचा मागास प्रवर्ग), डॉ. स्वाती रणजीत थोरात (सर्वसाधारण महिला).
  • प्रभाग ११- राजश्री नितीन जगताप (सर्वसाधारण महिला) आणि मनोहर भास्करराव शिंदे (सर्वसाधारण).