लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : परगावी असलेली नोकरी सोडून सासरी येऊन राहात नाही म्हणून चिमुकल्या मुलीच्या देखत पत्नीचा खून करून नंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार अकलूजजवळ घडला.

आफरीन फिरोज काझी (वय ३७) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील मैनोद्दीन कासम शेख (रा. सांगोला) यांनी याबाबत अकलूज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी आफरीन ही सांगोल्यात नोकरी करून माहेरीच राहायची. अधुनमधून सासरी अकलूजमध्ये यायची. तिने नोकरी सोडून सासरी येऊन राहावे, असा पती फिरोजचा हट्ट होता.

आणखी वाचा-सोलापुरात काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी राम नवमीचा मुहूर्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परंतु नोकरी सोडण्यास आफरीन तयार नव्हती. याच कारणातून फिरोज याने अकलूजजवळ पत्नी आफरीन आणि मुलगी जोया यांना दुचाकीवर बसवून नेताना वाटेत फिरोज याने भांडण काढले आणि रागाच्या भरात आफरीनवर सशस्त्र हल्ला केला. मुलगी जोया हिच्या डोळ्यांदेखत वडिलांनी आईचा खून केला. नंतर फिरोज याने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.