वाई: आपल्याला कर्करोग झाला असून, तो आपल्या मुलासही होईल, या भीतीतून एकाने आपल्या दहा वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आली आहे. वाठार पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त तपासात खुनाचे धागेदोरे उलगडले. विजय खताळ असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याला २९ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

हिवरे (ता. कोरेगाव) येथे कुंभारकी नावाच्या शिवारात विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ या अल्पवयीन मुलाचा अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केला होता. याबाबत वाठार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा >>> करोना रुग्णांच्या संख्येत वाढ, राज्यात करोनाचे ३७ नवे रुग्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस पथकाने मृत मुलाच्या खुनासंदर्भात तपशिलवार माहिती घेतली. तसेच जवळपासच्या साक्षीदारांकडे कसून चौकशी करण्यात आली. गुन्हा हा त्याच्या वडिलांनी केल्याबाबतचा संशय बळावला. मुलाच्या वडिलांनी दिलेली माहिती आणि साक्षीदारांनी दिलेली माहिती यामध्ये तफावत आढळून येत होती. त्यानुसार खून विजय खताळ यांनीच केल्याचा संशय बळकट झाला होता. खताळ यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनीच हा खून केल्याची धक्कादायक कबुली दिली. आपल्याला कर्करोग झाल्याच्या संशयाने खताळला पछाडले होते. तोच त्रास आपल्या मुलाला झाल्यास आपल्या पश्चात त्याचे पुढे कसे होईल, या काळजीतूनच त्यांनी कुंभारकी शिवारामध्ये त्याचा गळा आवळून खून केला. वाठार पोलिसांनी खताळ याला अटक केली आहे.