मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण हवं आहे ही मागणी लावून धरत आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या छातीत दुखू लागलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर आंतरवली सराटीत उपचार सुरु करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजी नगर मधल्या खासगी रुग्णालयातले डॉक्टर आंतरवली सराटीत पोहचले आहेत. रात्री १० वाजता आणि त्यानंतर रात्री १.३० च्या सुमारास मनोज जरांगेंचा ईसीजी काढण्यात आला. डॉक्टरांनी यानंतर महत्त्वाची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
छातीत दुखू लागल्याने उपचार
डॉक्टरांनी आंतरवली सराटीत मनोज जरांगेंवर उपचार केले. मागच्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना बरं वाटू लागल्याने शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला होता. ज्यानंतर मनोज जरांगे हे आंतरवलीला पोहचले होते. मात्र रात्रीच त्यांच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर त्यांचा ईसीजी काढण्यात आला. मनोज जरांगेंना अॅसिडीटी होऊ लागल्याने छातीत दुखू लागल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
मनोज जरांगे यांचा ईसीजी काढण्यात आला
मनोज जरांगेंची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांच्या छातीत दुखू लागले होते. त्यांच्यावर खाजगी डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले आहेत. यावेळी त्यांचा ईसीजी (ECG) काढण्यात आला.तर, ईसीजी नॉर्मल असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना रात्री उशिरा सलाईन लावण्यात आले आहेत. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
हे पण वाचा- मविआकडून जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले…
ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीवर ठाम…
सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाच्या देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. जोपर्यंत ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही आणि सगेसोयरे कायद्याची अमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे जरांगे यांनी म्हटले आहेत. सध्या परीक्षा सुरु असल्याने आपण आंदोलन स्थगित केले आहे. मात्र, आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेला लढा सुरूच राहणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. पुढील काही दिवस सरकारच्या भूमिकेकडे फक्त लक्ष ठेवा, त्यानंतर आपण पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू असे अवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहेत.