मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत. अशातच कथित किर्तनकार अजय बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या दोघांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज (२५ फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांनी बारसकर-वानखेडेंच्या आरोपांना उत्तरं दिली. तसेच या दोघांमागे देवेंद्र फडणवीस आहेत असा गंभीर आरोप केला. हे राज्य एकनाथ शिंदे किंवा अजित पवार नव्हे तर देवेंद्र फडणवीस चालवत आहेत. ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीसच आहेत, असंही मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा कट रचला आहे. १० टक्के आरक्षण घेऊन मी गप्प बसावं अन्यथा मला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मी शांत बसावं अन्यथा माझा गेम करावा लगेल, अशी योजना फडणवीसांनी आखली आहे. फडणवीस त्यांच्या लोकांना सांगतायत की, मनोज जरांगेला बदनाम करा, त्याला सलाईनमधून विष देऊन मारा किंवा त्याचा एन्काऊंटर करा. मी उपोषण करताना मरावं यासाठी त्यांनी इतके दिवस मला झुलवत ठेवलं आहे. मी या ना त्या मार्गाने मरावं असं फडणवीसांचं स्वप्न आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

मनोज जरांगे म्हणाले, फडणवीसांना वाटतं की, ते मला संपवून टाकतील आणि मग मराठा समाज विस्कटेल. त्यांनी जसे इतर पक्षांमधील नेते संपवले आहेत, तसेच ते मलाही संपवतील असं त्यांना वाटतंय. त्यांना आता मराठ्यांची एकजूट मोडायची आहे. मी संपलो की मराठ्यांची एकजूट संपेल, असं त्यांना वाटतंय. ते मला एखाद्या गुन्ह्यात अडकवू पाहत आहेत. मला विष देऊन मारण्याचा त्यांचा डाव आहे. किंवा एन्काऊंटर करून मारण्याचा प्रयत्नदेखील ते करतील. माझं फडणवीसांना अव्हान आहे की मीच आता मुंबईला येतो. तुमच्या सागर बंगल्यावर येतो. तुमच्या पोलिसांना सांगा, की मनोज जरांगे आल्यावर त्याला गोळ्या घाला.

हे ही वाचा >> “फडणवीसांचं ऐकलं नाही तर काय होतं ते सांगतो” म्हणत जरांगे पाटलांनी घेतली ‘या’ भाजपा नेत्यांची नावं!

दरम्यान मनोज जरांगे पाटील हे पायीच मुंबईच्या दिशेने निघाले होते. परंतु, सर्व कार्यकर्त्यांनी आणि मराठा आंदोलकांनी त्यांना अडवलं. त्यामुळे ते एका कारमध्ये बसले. या कारमधूनच त्यांनी आंदोलकांशीदेखील संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मी मुंबईला जाऊन मराठा आरक्षणाचा गुलाल घेऊन येईन किंवा फडणवीस मला मारून टाकतील. मला मारून टाकलं तर मराठा समाज त्यांना स्वतःची एकजूट दाखवेल. फडणवीस त्यांचा बामणी कावा करत आहेत आणि एकनाथ शिंदे, अजित पवार त्यांना सहकार्य करत आहेत. फडणवीस माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. त्यामुळे आता एक तर मी मरेन किंवा फडणवीसांना तरी मारेन. माझं फडणवीसांना आव्हान आहे मी मुंबईला आल्यावर त्यांनी मला आडवावं.

Story img Loader